OpenAI ने एक नवीन एआय मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल त्यांच्या ‘प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी’ या प्रकल्पाचा एक भाग आहे. नवीन OpenAI o1 हे पहिले असे मॉडेल आहे, जे विज्ञान, कोडिंग आणि गणितातील अवघडातून अवघड समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे, “आम्ही या मालिकेतील पहिले मॉडेल चॅट जीपीटी आणि आमच्या एपीआयमध्ये लाँच करत आहोत. हे मॉडेल त्याच्या सुरुवातीच्या स्वरूपात आहे. आम्ही यात अधिकाधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच मॉडेलचा अधिक विकसित व्हर्जनदेखील येणार आहे; ज्याचे काम अद्याप सुरू आहे. OpenAI चे नवे मॉडेल कसे कार्य करते? हे मॉडेल गेमचेंजर आहे का? याचा नोकऱ्या आणि संशोधनावर कसा परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

नवीन मॉडेल कसे कार्य करते?

OpenAI मते, नवीन मॉडेल उत्तर देण्यापूर्वी प्रश्नांचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्यासाठी डिझाइन केले आहे. एखाद्या कठीण समस्येचे निराकरण करताना माणूस जसा विचार करतो, तसेच हे मॉडेलदेखील विचार करू शकते. कंपनीने सांगितले की, प्रशिक्षणाद्वारे मॉडेल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समस्यांना कसे पाहायचे, त्याचा निष्कर्ष कसा तपासायचा आदी सर्व बाबींचा विचार करू शकते. विशेष म्हणजे हे मॉडेल माणसाप्रमाणेच चुकांमधून शिकते आणि आणखी सक्षम होत जाते. त्यांच्या चाचण्यांवर आधारित, OpenAI ने सांगितले की, याच मालिकेतील पुढील मॉडेल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये, तसेच पीएचडी विद्यार्थ्यांना मदत करू शकेल आणि गणित व कोडिंगसाठी अत्यंत प्रभावी ठरेल.

Orange Peel Theory What is the Orange Peel Theory Why is this theory trending in 2024
Orange Peel Theory : ऑरेंज पील थेअरी काय आहे? २०२४मध्ये का ट्रेंड होत आहे ही थेअरी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
mahabaleshwar strawberries will reach every household through post with special stamp
स्ट्रॉबेरी आता सचित्र टपाल शिक्क्यावर
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये
Mahesh Kharade warns of agitation as Rajarambapu Sugar Factorys Rs 3200 installment is invalid
राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
नवीन OpenAI o1 हे पहिले असे मॉडेल आहे, जे विज्ञान, कोडिंग आणि गणितातील अवघडातून अवघड समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : पोर्ट ब्लेअर शहराच्या नावामागचा इतिहास काय? केंद्र सरकारने का केले शहराचे नामकरण?

परंतु, OpenAI ने म्हटले आहे की, o1 मॉडेल ही प्रारंभिक आवृत्ती आहे आणि अद्याप यात वेब ब्राउझ करणे किंवा फाइल्स आणि छायाचित्र व्यवस्थापित करणे यांसारखी वैशिष्ट्ये नाहीत. हे मॉडेल अधिकाधिक अवघड समस्या सोडवण्यासाठी योग्य आहे. ही AI तंत्रज्ञानातील एक मोठी झेप असल्याचे सांगितले जात आहे. OpenAI ने म्हटले आहे की, o1 अतिशय कठीण कोडिंग करण्यास सक्षम आहे. कंपनीने डेव्हलपर्ससाठी OpenAI o1-Mini देखील लाँच केले आहे. OpenAI o1-Mini हे मॉडेल वेगवान, स्वस्त आणि तर्कसंगत डेटा प्रदान करण्याकरिता कोडिंगसाठी अत्यंत प्रभावी आहे. o1-Mini हे o1 preview पेक्षा ८० टक्के स्वस्त आहे.

नवीन मॉडेल कठीणातील कठीण समस्यांचे निराकरण करू शकत असल्याने, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण, कोडिंग, गणितीय मॉडल्स यांसारख्या कार्यांचा समावेश असलेल्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हे मॉडेल वापरण्यास सुरक्षित आहे का?

OpenAI ने म्हटले आहे की, हे मॉडेल वापरण्यास सुरक्षित असावे यासाठी त्यांनी प्रशिक्षणाचा एक नवीन मार्ग अवलंबला आहे. ही नवीन पद्धत मॉडेलला त्याच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा वापर करण्यास, मार्गदर्शक तत्त्वांचे अधिक प्रभावीपणे पालन करण्यास, सुरक्षा नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांचे पालन करण्यास मदत करते. OpenAI ने चाचणीही केली की, वापरकर्त्यांनी एआयचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यावरही (एआय जेलब्रेकिंग) हे मॉडेल सुरक्षिततेच्या नियमांचे किती चांगले पालन करू शकते.

कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी केलेल्या एका कठीण चाचणीत एआयच्या पूर्वीच्या आवृत्तीने १०० पैकी २२ गुण मिळवले आणि नवीन आवृत्तीने ८४ गुण मिळवले आहेत, त्यामुळे यात लक्षणीय सुधारणा झाली असल्याचे कंपनीचे सांगणे आहे. OpenAI ने ब्रिटन आणि अमेरिका सरकार आणि त्यांच्या एआय सुरक्षा संघांबरोबर जवळून काम करून सुरक्षा प्रयत्नांमध्ये सुधारणा केली आहे. OpenAI चा विश्वास आहे की, ही भागीदारी भविष्यातील मॉडेल्सची चाचणी आणि सुधारणा करण्यास मदत करेल.

याचा नोकऱ्या आणि संशोधनावर कसा परिणाम होणार?

नवीन मॉडेल कठीणातील कठीण समस्यांचे निराकरण करू शकत असल्याने, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण, कोडिंग, गणितीय मॉडेल यांसारख्या कार्यांचा समावेश असलेल्या नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विचार करणे किंवा समस्येवर मार्ग काढणे हे एक बौद्धिक कार्य आहे आणि ते स्वयंचलित केल्यास माणसाच्या सहभागाची गरज कमी होण्याची शक्यता आहे. आयटी, वित्त आणि अभियांत्रिकीसारख्या उद्योगांवर याचा परिणाम होऊ शकतो. पीएचडी विद्यार्थ्यांना या मॉडेलचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. अशा मॉडेलमुळे एआय सुरक्षितता, एआयचा नैतिक वापर यामध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. संशोधकांचा विचार केल्यास, OpenAI o1 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रात सहाय्यक ठरू शकते, कारण या मॉडेलमुळे समस्या सोडवण्यास गती मिळू शकते. मोठ्या डेटासेटचे विश्लेषण करण्याची मॉडेलची क्षमता संशोधकांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा : ‘कौमार्य चाचणी’ आणि ‘समलैंगिकता’ विषयाबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमात एकाच महिन्यात दोनदा बदल; कारण काय?

OpenAI-o1 कसे वापरावे?

OpenAI o1 मॉडेल आजपासून चॅट जीपीटी प्लस आणि एपीआय वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. मॉडेल पिकर वापरून o1-Preview आणि o1-Mini या मॉडेलची निवड केली जाऊ शकते. हे मॉडेल लॉन्च करताना OpenAI ने सांगितले की, याचा साप्ताहिक दर o1-Preview साठी ३० संदेश आणि o1-Mini साठी ५०, असा असेल. कंपनी सध्या हे दर वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. चॅट जीपीटी एंटरप्राइज आणि एज्युकेशन वापरकर्त्यांना पुढील आठवड्यापासून हे मॉडेल वापरता येणार आहे.

Story img Loader