Apple आणि Google सारख्या मोठ्या कंपन्यांनी जनरेटिव्ह AI च्या मैदानात प्रवेश केला आहे (जनरेटिव्ह एआय हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे, जे मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि सिंथेटिक डेटासह विविध प्रकारची सामग्री निर्माण करू शकते). Apple आणि Google या दोन्ही कंपन्यांनी स्मार्टफोनमध्ये एआयची वैशिष्ट्ये असलेली उत्पादने बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा की, आपण कदाचित आपल्या मोबाईल फोनच्या मदतीने बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि त्यामुळे आपले बरेचसे काम हलके होणार आहे. अर्थात, हे खरे असले तरी त्याबरोबर काही यासंदर्भात काही जोखिमांना देखील सामोरे जावे लागणार आहे.

तुमचा मोबाईल फोन AI च्या वैशिष्ट्यांसह काय करू शकतो?

१० जून रोजी, Apple ने ‘Apple Intelligence’ चे अनावरण केले. अ‍ॅपल इंटेलिजन्स हा अ‍ॅपल इंक द्वारे विकसित केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म आहे. Apple Intelligence हे iPhones, iPads आणि Mac मध्ये जनरेटिव्ह AI च्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध असेल. वापरकर्ता म्हणून या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही रेकॉर्ड केलेले कॉल ट्रान्स्क्राइब (प्रतिलेखन) करू शकता, ईमेल लिहू शकता आणि नोट्सचे सारांशाने संकलन करू शकता, प्रतिमांमधून ऑब्जेक्ट्स/वस्तू मिटवू शकता, इच्छेनुसार चित्रे, ॲनिमेशन आणि इमोटिकॉन तयार करू शकता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, Google ने अशाच वैशिष्ट्यांचे अनावरण केले होते, ज्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगचे थेट प्रतिलेखन देखील समाविष्ट होते. सॅमसंग देखील या रिंगणात आहे. या कोरियन इलेक्ट्रॉनिक्स फर्मने ऑडिओ रेकॉर्डिंग आणि फोन कॉल्सवर प्रक्रिया करण्यासाठी तसेच वेबपेजेसचा सारांश देण्यासाठी त्याच्या फ्लॅगशिप डिव्हाइसवर चालणारे नेटिव्ह AI मॉडेल उत्पादनांमध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

अधिक वाचा: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

ही सर्व वैशिष्ट्ये स्थानिक पातळीवर चालतात का?

सर्वच वैशिष्ट्ये स्थानिक पातळीवर चालत नाहीत. Apple ने स्पष्ट केले की सिरी, त्याचा ऑन-डिव्हाइस डिजिटल सहाय्यक, तुमच्या डिव्हाइसवर मूलभूत प्रश्नांवर प्रक्रिया करून उत्तर देऊ शकतो, तर व्यापक प्रश्नांसाठी OpenAI च्या ChatGPT च्या GPT-4o एआय मल्टीमॉडेलची आवश्यकता आहे. Google चे Pixel फोन हे त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी क्लाउड सर्व्हरवर होस्ट केलेल्या मोठ्या AI मॉडेल्ससाठी इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असतात. सॅमसंग देखील याच मार्गाने जाते आहे. सॅमसंग कंपनी एक सेटिंग ऑफर करते जिथे वापरकर्ते फक्त स्थानिक AI वैशिष्ट्ये वापरण्याचा पर्याय निवडू शकतात उदाहरणार्थ, व्हॉईस नोट लाइव्ह ट्रान्स्क्राइब करणे किंवा रेकॉर्ड केलेल्या व्हॉइस नोट्सचा सारांश मिळवण्यासाठी ऑन-क्लाउड एआय मॉडेलचा वापर करणे.

लवकरच सर्व फोनवर जनरेटिव्ह AI सुविधा असेल का?

Apple चे AI वैशिष्ट्ये सध्या फक्त त्याच्या ‘प्रो’ iPhones मध्ये असणार आहेत. Google चे सर्व नवीन मोबाईल फोन त्याच्या AI चॉप्सना सपोर्टिव्ह आहेत. सॅमसंगकडे फक्त त्याच्या फ्लॅगशिप Galaxy S24 मालिकेत AI आहे, परंतु पुढील महिन्यात नवीन डिव्हाइसेसवर त्याचा विस्तार होऊ शकतो. हे सर्व तुमच्या मोबाईल फोनच्या प्रोसेसरवर अवलंबून आहे. सध्या , फक्त Qualcomm आणि MediaTek चे फ्लॅगशिप प्रोसेसर AI प्रोसेसिंगची क्षमता राखतात.

खरी चिंता नेमकी कसली?

परंतु महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांनी डेटाच्या गोपनीयते संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. वापरकर्त्यांचा कुठलाही वैयक्तिक डेटा किती सुरक्षित आहे याबद्दल निश्चित काहीही सांगता येत नाही. ॲपलचा दावा आहे की, कोणताही वैयक्तिक ‘संदर्भीय डेटा’ ऑनलाइन हस्तांतरित केला जाणार नाही आणि OpenAI च्या सर्व्हरवर गोपनीयता राखली जाईल. Google आणि Samsung दावा करतात की ते स्मार्टफोनवरून कोणतीही संवेदनशील माहिती गोळा करत नाहीत, परंतु ते ‘अनामिक मेटाडेटा’ घेतात. परंतु या संदर्भात ऑडिट होणे बाकी आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?

फक्त गोपनीयतेचीच काळजी आहे का?

एआयला चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते, तर स्थानिक एआय मॉडेल्समध्ये विशिष्ट भाषेतील डेटाच कमी उपलब्ध असल्याने संपूर्ण संदर्भ समजू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याद्वारे देण्यात आलेली माहिती वा मजकूर आणि प्रतिमा लक्षणीयरीत्या वेगळ्या किंवा प्रसंगी चुकीच्याही असू शकतात. स्थानिक एआय मॉडेल्सना इंटरनेटची आवश्यकता नसते. परंतु इंटरनेटशिवाय चुकीचे किंवा संदर्भहीन निर्णय घेण्याऱ्या ब्लॅक बॉक्स सारखा अनुभव वापरकर्त्यांना येऊ शकतो. त्याचप्रमाणे, गोपनीयता ही एक प्रमुख चिंता असेल. म्हणूनच बहुतेक कंपन्या मूलभूत वैशिष्ट्यांसह सुरक्षित मदत करणाऱ्या एआयसह बाजारपेठेत उतरल्या असून या AI मॉडेल्सना उपयुक्तता मूल्य असले तरी मर्यादाही आहेत.

Story img Loader