स्मार्टफोननंतर काय हा प्रश्न सर्वसामान्य वापरकर्त्यांना पडत आहे, त्याच्या कितीतरी आधीपासून तंत्रज्ञान क्षेत्र त्यावर उत्तर शोधत आहे. भ्रमणध्वनीपासून ते स्मार्टफोनपर्यंत झालेल्या संपर्क-संवादाच्या तंत्रज्ञान क्रांतीनंतर ‘वेअरेबल’ उपकरणांनी हे उत्तर बनण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यांच्या मर्यादा अल्पकाळातच स्पष्ट झाल्या आहेत. अशा वेळी स्मार्टफोनच्या क्षमतेच्या जवळपास जाऊ शकेल, असे एक उपकरण गेल्या आठवड्यात जगासमोर सादर झाले. ‘एआय पिन’ असे त्याचे नाव. आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या साह्याने स्मार्टफोनची अनेक कामे करू शकणारे हे उपकरण कसे आहे आणि त्याचा शोध लावणारे इम्रान चौधरी कोण, याचा हा वेध.

एआय पिन काय आहे?

एआय पिन हे साधारणपणे हाताच्या तीन बोटांच्या दोन पेरांइतक्या आकाराचे चौकोनी डिव्हाइस आहे. यामध्ये एक प्रोसेसर संगणक, एक बॅटरी आणि या दोघांना जोडणारे हूक असे तीन मुख्य भाग आहेत. हे उपकरण शर्टच्या कॉलरजवळ किंवा छातीजवळ कपड्यावर लावता येते. उपकरणाच्या दर्शनी भागावर स्पर्श करताच ते कार्यान्वित होते. त्यानंतर तुम्ही बोटांच्या हालचाली किंवा आवाजी सूचनेद्वारे हे उपकरण हाताळू शकता.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

एआय पिन काय करू शकते?

एखाद्या ब्लूटूथ इअरबड्सच्या पेटीच्या आकाराच्या या उपकरणाला कोणताही डिस्प्ले वा बटण नाही. मात्र हे उपकरण १३ मेगापिक्सेल क्षमतेची छायाचित्रे टिपू शकते. याशिवाय हे उपकरण आवाजी सूचनेद्वारे अक्षरी संदेशही पाठवू शकते. तसेच आवाजी सूचनेद्वारे कॉल लावू अथवा घेऊही शकते. या उपकरणात एक लेझर प्रोजेक्टर असून त्याची प्रतिमा तळहातावर घेऊन आलेल्या कॉलची किंवा संदेशाची माहिती आपल्याला पाहता येते.

हेही वाचा…. विश्लेषण: वित्तीय व्यवस्थेला लॉकबीटचा धोका?

शिवाय हे उपकरण संगीत ऐकण्याचा आनंदही लुटता येतो. या उपकरणात व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही व्यवस्था आहे. यामध्ये अंतर्गत चॅट जीपीटी ही यंत्रणाही सक्रिय करण्यात आली असून त्याद्वारेही सर्च करणे, परिसराची माहिती मिळवणे आदी क्रिया करता येतात.

एआय पिन सतत कार्यान्वित राहते?

एआय पिन कार्यान्वित करण्यासाठी त्याला बोटांनी स्पर्श करावा लागतो. त्यानंतर त्याच्या दर्शनी भागातील एलईडी सुरू होतो. त्यामुळे हे उपकरण सुरू आहे की नाही, हे वापरणाऱ्याबरोबरच समोरील व्यक्तीलाही समजते. या उपकरणाचा वापर छुप्या पद्धतीने व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी किंवा छायाचित्रणासाठी होऊ नये, अशी त्यामागची मूळ संकल्पना आहे.

एआय पिन स्मार्टफोनला पर्याय?

एआय पिन या उपकरणामध्ये संपर्क, संवाद साधण्याची तसेच संगीत ऐकण्याची, छायाचित्रणाची, शोध घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे हे उपकरण स्मार्टफोनच्या अनेक क्रिया करते. मात्र, यामध्ये विविध ॲप हाताळण्याची सुविधा नाही. शिवाय वेबसाइट पाहणे किंवा चित्रपट पाहण्याची व्यवस्था नाही. अर्थात ही उपकरणाची प्रथम आवृत्ती असून त्यामध्ये येत्या काळात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. या उपकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, स्मार्टफोनवरील कोणतीही क्रिया करताना त्याच्या डिस्प्लेवर नजर खिळवावी लागते. एआय पिन वापरताना यातून सुटका होते. या उपकरणासमोर एखादी वस्तू धरताच ती स्कॅन करून त्याचा इंटरनेटवर शोध घेण्याचे कामही हे उपकरण करते. एवढेच नव्हे तर त्या वस्तूची ऑनलाइन किंमत तपासून ऑनलाइन ऑर्डर करण्याची सुविधाही या उपकरणातून मिळते.

एआय पिनची किंमत?

एआय पिन अमेरिकेत १६ नोव्हेंबरपासून विक्रीस उपलब्ध झाले आहे. याची अमेरिकेतील किंमत ६९९ डॉलर इतकी असून त्यावर दरमहा २४ डॉलर हे शुल्क डेटा नेटवर्कसाठी आकारण्यात येणार आहे. पुढील वर्षीपासून आणखी काही देशांत हे उपकरण उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे.

एआय पिनचे निर्माते काेण?

ह्यूमन या कंपनीने एआय पिनची निर्मिती केली असून इम्रान चौधरी आणि बेथनी बाँजोर्नो हे तंत्रज्ञ दाम्पत्य या कंपनीचे संस्थापक आहे. ब्रिटिश-अमेरिकन असलेले इम्रान चौधरी हे १९९५ मध्ये ॲपल कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीला लागले. तिथेच ॲपलच्या डिझाइन विभागाचे संचालक बनले. त्यांच्याकडे ॲपलच्या विविध उत्पादनांची रचना ठरवण्याची जबाबदारी होती. मूळ आयफोनच्या इंटरफेसची रचना करण्याचे श्रेय चौधरी यांच्याकडे जाते. आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल टीव्ही या उत्पादनांतील शंभरहून अधिक पेटंट चौधरी यांच्या नावावर आहेत. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर चौधरी यांचे नवीन सीईओ टीम कूक यांच्याशी पटेनासे झाले आणि त्यांनी त्यांच्या पत्नी बेथनी यांच्यासह ॲपलला सोडचिठ्ठी देऊन ‘ह्यूमन’ची स्थापना केली. ‘एआय पिन’ हे ह्यूमनचे पहिलेच उत्पादन.

Story img Loader