जगभरातील कोट्यवधी लोक हवामान बदलामुळे त्रस्त आहेत. हवामान बदलाचे अनेक घातक परिणाम मानवावर होताना दिसत आहेत. हवामानातील बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी, सरकार, शास्त्रज्ञ, अभियंते सातत्याने जीवाश्म इंधनाचा पर्याय शोधत आहेत. हवाई वाहतूक उद्योग हे असेच एक क्षेत्र आहे; ज्याचा हवामान संकटात वाटा आहे. अहवालात असे म्हटले आहे की, २०२२ मध्ये जागतिक ऊर्जासंबंधित कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनामध्ये या उद्योगाचा दोन टक्के इतका वाटा होता. कंपन्या जेट इंधन किंवा पूर्णपणे विद्युतीकृत पर्याय विकसित करण्याचा शाश्वत मार्ग शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता हवाई प्रवासाचे भविष्य म्हणून एअरशिपचा म्हणजेच वातनौकांचा पुनर्विचार केला जात आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीसही एअरशिप ही नियंत्रित शक्तीवर चालणारी उड्डाणे असल्याचे मानले जात होते; ज्याचा वापर वाहतूक आणि प्रवासासाठी केला जाऊ शकतो. परंतु, विमानांच्या जलद विकासामुळे एअरशिप कधीही उड्डाण करू शकली नाहीत. एअरशिप म्हणजे नक्की काय? ते कसे कार्य करते? त्यांचा भविष्यात काय फायदा होणार? एअरशिप्स खरोखरच विमानांची जागा घेणार का? त्याविषयी जाणून घेऊ.
एअरशिप म्हणजे काय?
एअरशिप विमानापेक्षा वजनाने अगदी हलके असते. एअरशिप हे सभोवतालच्या हवेपेक्षा कमी दाट असलेल्या उत्तेजक वायूंचा वापर करून उड्डाण करते. तांत्रिकदृष्ट्या, “एअरशिप उडत नाही; ते तरंगते,” असे एरोस्टॅट स्टार्टअप फ्लाइंग व्हेलचे एअरशिप पायलट ऑलिव्हर जेगर यांनी ‘बिल्ट इन’ला सांगितले. एअरशिपचे तीन मुख्य प्रकार आहेत आणि ते म्हणजे नॉन रिजिड, सेमी रिजिड व रिजिड. सामान्यतः एअरशिप बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे असते, जे हेलियम किंवा हायड्रोजन वायूने भरलेले असते. ते दिसायला अगदी फुग्यासारखे असते. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या लोकप्रियतेदरम्यान एअरशिप्सचा वापर प्रामुख्याने लक्झरी प्रवास, कार्गो वितरण व लष्करी रसद यांसाठी केला जात असे. आता ते अधिकतम प्रमाणात जाहिराती, फोटोग्राफी, पर्यटन यांसाठी वापरले जाते.
हेही वाचा : ‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
h
एअरशिप्स कसे कार्य करतात?
पूर्वी हायड्रोजन वायूचा वापर केला. कारण- हायड्रोजन अगदी किफायतशीर, उत्पादनास सोपे व हलके होते. परंतु, हायड्रोजन वायू अत्यंत दाहक असल्यामुळे पुढे एअरशिपमध्ये हेलियम वायूचा वापर केला जाऊ लागला. हेलियम वायू ज्वलनशील नसला तरी, पृथ्वीवर हा वायू दुर्मिळ आहे. एक किलो वजन उचलण्यासाठी एक घनमीटर वायूची आवश्यकता असते, ज्याची किंमत सुमारे ३५ डॉलर्स आहे. ‘द बिल्ट इन’ला गुडइयर टायर अॅण्ड रबर कंपनीचे माजी एअरशिप पायलट एडविन अलमंजार यांनी मोठ्या एअरशिप चांगल्या असतात, असे स्पष्ट केले. हायब्रीड एअर व्हेइकल्स, फ्लाइंग व्हेल व एलटीए रिसर्चसारख्या नवीन युगातील स्टार्टअप्सकडून एअरशिप तयार करण्याचा विचार केला जात आहे.
एअरशिप्स हवामान अनुकूल असू शकतात?
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, “सौरऊर्जेवर चालणाऱ्या एअरशिप्समुळे वाहतूक खर्च आणि हवाई प्रवासातील कार्बन डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन या दोन्हींमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. जर्मनीतील एर्लांगेन-न्युरेमबर्ग विद्यापीठाच्या अहवालानुसार एअरशिप्स पूर्णपणे हवामानास अनुकूल आहेत. कारण- एअरशिप अत्यंत हलके, अत्यंत कार्यक्षम व पातळ असते, जे उड्डाणादरम्यान पुन्हा रिचार्ज होते. परिणामी, एअरशिप उडत असताना कोणतेही ज्वलनसंबंधित उत्सर्जन निर्माण होत नाही.” संशोधकांचा असा विश्वास आहे की, सौरऊर्जेवर चालणाऱ्या एअरशिपच्या वापरामुळे हवाई वाहतुकीचा खर्च कमी होऊ शकतो. सौरऊर्जेवर चालणाऱ्या एअरशिपच्या ऊर्जेचा खर्च पारंपरिक विमानांपेक्षा कमी आहे.
एअरशिपसमोरील इतर आव्हाने
- वादळ किंवा जोरदार वाऱ्याच्या परिस्थितीत एअरशिप चालवणे कठीण आहे.
- एअरशिपचा आकार आणि हेलियम किंवा हायड्रोजन वायूचा वापर यांमुळे ते तयार करणे आणि चालवणे महाग असू शकते.
- एअरशिपला हेलियम वायूची गरज पडू शकते, ज्याचा स्रोत अत्यंत मर्यादित आहे.
- एअरशिप विमानापेक्षा हळू प्रवास करते आणि त्यामुळे प्रवासाच्या वेळेत वाढ होऊ शकते.
१९३७ मध्ये LZ127 एअरशिप क्रॅश झाले होते. या लक्झरी प्रवासी हवाई जहाजाच्या अपघातामुळे ३६ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर लोकांचा एअरशिपवरील विश्वास उडाला.
एअरशिप विमानाची जागा घेऊ शकणार का?
स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी त्यात थोडे वजन जोडल्यास ‘एअरशिप बॉयन्सी’ची समस्या सोडवली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘फ्लाइंग व्हेल’ या फ्रेंच कंपनीने LCA60T नावाची २०० मीटर लांबीची ‘फ्लाइंग क्रेन’ हीलियम एअरशिप तयार केली आहे, जी रॉकेट आणि पॉवरलाइन टॉवर्सची वाहतूक करण्यास सक्षम आहे. ही एअरशिप ६० टन माल वाहून नेऊ शकते आणि हेलिकॉप्टरपेक्षाही कमी कार्बन उत्सर्जन करते.
हेही वाचा : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीवरून हिंदूंमध्ये संताप; नेमके प्रकरण काय?
h
लॉस एंजेलिस येथील एरोस ही कंपनी जाहिरातींसाठी एअरशिप तयार करते. काहींचा असा विश्वास आहे की, अशी कॉम्प्रेशन सिस्टीम व्यावहारिक होणे आव्हानात्मक आहे. यूकेस्थित हायब्रीड एअर व्हेइकल्स कंपनी एअरलँडर नावाची डबल बॅरल एअरशिप विकसित करीत आहेत. त्याचे प्रमुख मॉडेल हे कार्बन उत्सर्जन ९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. एअरशिप १० टन वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यात १०० प्रवासी पाच दिवस राहू शकतात. कंपनीने २०२६ मध्ये या दृष्टीने व्यावसायिक सेवेत प्रवेश करण्याची योजना आखली आहे. आता ही बाब कितपत प्रभावी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.