संदीप कदम

मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’ स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघातील त्याच्या स्थानाबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेले वर्षभर भारतीय संघाबाहेर असलेल्या रहाणेला पुन्हा संधी मिळेल का, त्याच्यासमोर कोणते पर्याय आहेत, याचा घेतलेला हा आढावा.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
maharashtra assembly election 2024 in chandrapur nagpur will narendra modi sabha rally benefit to the mahayuti candidate or not
मोदींच्या सभेचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का?

सध्याच्या ‘आयपीएल’ हंगामातील रहाणेची कामगिरी कशी?

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सध्या सुरू असलेल्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांत रहाणेला खेळण्याची संधी मिळाली नाही. मोईन अली आजारी असल्याने अजिंक्यला मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळण्यास मिळाला. या संधीचा पुरेपूर फायदा घेत रहाणेने २७ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ७ चौकार व तीन षटकार मारले. यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध रहाणेने १९ चेंडूंत ३१ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध त्याने २० चेंडूंत ३७ धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अजिंक्यला केवळ ९ धावाच करता आल्या. मात्र कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्याने निर्णायक खेळी केली. त्याने अवघ्या २९ चेंडूंत नाबाद ७१ धावा चोपल्या. या खेळीत त्याने सहा चौकार व पाच षटकार लगावले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांत ५२.२५च्या सरासरीने एकूण २०९ धावा जलदगतीने केल्या आहे.

या हंगामापूर्वी रहाणेची स्थिती कशी होती?

रहाणेसाठी ‘आयपीएल’चे गेले काही हंगाम निराशाजनक राहिले. त्याने २०२०च्या हंगामातील ९ सामन्यांत ११३ धावा केल्या. २०२१च्या हंगामातील दोन सामन्यांत केवळ आठ आणि २०२२च्या सात सामन्यांत त्याला १३३ धावाच करता आल्या. भारताला ऑस्ट्रेलियात अनेक आघाडीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीतही कसोटी मालिका विजेतेपद मिळवून देणाऱ्या रहाणेला गेल्या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी संघातूनदेखील स्थान गमवावे लागले. गेले काही वर्षे भारताकडून तो केवळ कसोटी सामने खेळत होता. आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी रहाणेने स्थानिक क्रिकेटकडे मोर्चा वळवला. मात्र, तेथेही त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. एक वेळ ‘आयपीएल’ संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेला २०२३च्या लिलावात ५० लाख आधारभूत किंमत ठेवण्यात आली होती. याच किमतीवर लिलावामध्ये चेन्नईने त्याला आपल्या संघात घेतले. आपल्या कामगिरीच्या बळावर रहाणेने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले. कोणालाही त्याच्याकडून या कामगिरीची अपेक्षा नसेल. मात्र, चेन्नईच्या विजयात तो सध्या निर्णायक भूमिका पार पाडत आहे.

भारतीय संघात रहाणेला संधी कशी मिळू शकते?

‘आयपीएल’मुळे अनेक क्रिकेटपटूंच्या आयुष्यात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या लीगच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळते. त्यासोबतच अनुभवी खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधीही उपलब्ध होते. या वेळी रहाणेलाही एकदिवसीय संघात स्थान मिळवण्याची संधी निर्माण होताना दिसत आहे. वर्षाअखेरीस भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. २०१९प्रमाणेच या वर्षीही भारतासमोर चौथ्या स्थानासाठीची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत श्रेयस अय्यरने चौथ्या स्थानावर चांगली कामगिरी करताना आपले स्थान पक्के केले होते. मात्र, अय्यरला नुकतीच कंबरेच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागली. विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो तंदुरुस्त होईल का याबाबत साशंकता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्चमध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमारला संधी दिली होती. मात्र, कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय अपयशी ठरला. सूर्यकुमारला तिन्ही सामन्यांत आपले खाते उघडता आले नाही. सूर्यकुमारने आतापर्यंत २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, त्याला २४च्या सरासरीने ४३३ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे सूर्यकुमारच्या जागी चौथ्या स्थानावर रहाणेच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

रहाणे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार ठरतो का ?

रहाणे हा भारतीय क्रिकेटमधील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याची दावेदारी प्रबळ समजली जात आहे. अजिंक्यने २०१८ मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. रहाणेच्या एकदिवसीय कारकीर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्याने ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये ८७ डावात ३५च्या सरासरीने २९६२ धावा केल्या आहे. रहाणेने तीन शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत. रहाणे मधल्या फळीतील एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो. शिवाय अनेक कठीण परिस्थितीत त्याने भारताला सावरत विजयही मिळवून दिले आहेत. रहाणेला स्थान मिळाल्यास भारताचे क्षेत्ररक्षणही सुधारेल. रहाणेची एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही ओळख आहे. एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार असून रहाणेला भारतातील जवळपास सर्वच खेळपट्ट्यांवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचा फायदाही संघाला होऊ शकतो.