Ajmer Sharif Dargah is a Shiva Temple?: सध्या उत्तर प्रदेशमधील संभल येथील जामा मशीद आणि राजस्थानमधील अजमेर दर्गा विशेष चर्चेत आहेत. या दोन्ही ठिकाणी पूर्वी असलेल्या हिंदू मंदिरावरून वाद उफाळला आहे. संभल येथील स्थानिक न्यायालयाने सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर झालेला हिंसाचार ताजा असताना आता अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणाचा विषयही जोर धरू लागला आहे. बुधवारी अजमेरच्या न्यायालयाने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), आणि अजमेर दर्गा समितीला नोटिसा बजावून प्रसिद्ध दर्गा शरीफचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या मागणीसंदर्भात उत्तर मागितले आहे. या कायदेशीर याचिकेत हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी दावा केला आहे की, १३ व्या शतकातील सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा मकबरा मूलतः एक शिवमंदिर होते. त्याच पार्श्वभूमीवर गुप्ता यांनी दिलेल्या पुराव्यांमधून आणि अजमेरवरील पुस्तकांमधून कोणते संकेत मिळतात? याचा घेतलेला हा आढावा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अधिक वाचा: Sambhal mosque dispute:संभल विषयीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? मंदिर खरंच बाबराने नष्ट केले होते का?

गुप्ता यांनी याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे? Vishnu Gupta on Ajmer Sharif Dargah

आपल्या याचिकेत गुप्ता यांनी अजमेर दर्ग्याला ‘संकट मोचन महादेव मंदिर’ घोषित करण्याची मागणी केली असून त्या ठिकाणी ‘हिंदू धर्मानुसार पूजा पुन्हा सुरू करण्याची’ विनंती केली आहे. केलेल्या मागणीला आधार देण्यासाठी गुप्ता आणि त्यांचे वकील योगेश सिरोजा यांनी हर बिलास सारडा (१८६७-१९५५) यांच्या पुस्तकाचा दाखला दिला आहे. हर बिलास सारडा हे अजमेरमधील न्यायाधीश होते. त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला होता. गुप्ता यांनी आरोप केला आहे की, सारडा यांनी १९१० च्या एका प्रकाशनात दर्ग्याखाली हिंदू मंदिर असल्याबाबत लिहिले होते. या संदर्भात गुप्ता यांनी ज्या हर बिलास सारडा यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, ते पुस्तक आणि त्या पुस्तकात लेखकाने केलेली निरीक्षणे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबरीने अजमेर आणि त्याच्या प्रसिद्ध दर्ग्याच्या इतिहासाचा आढावा घेणारी इतर पुस्तके अजमेर दर्ग्याविषयी काय सांगतात हेही पाहणे गरजेचे ठरते.

हर बिलास सारडा यांचे पुस्तक अजमेर दर्ग्याविषयी काय सांगते?

विष्णू गुप्ता यांनी उल्लेख केलेले हर बिलास सारडा यांचे ‘अजमेर: हिस्टॉरिकल अँड डेस्क्रिप्टिव’ हे पुस्तक १९१० साली लिहिले गेले तर १९११ साली स्कॉटिश मिशन इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आले होते. अजमेरचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक एखाद्या विश्वकोशाप्रमाणे काम करते. या पुस्तकात सारडा यांनी अजमेर दर्ग्यातील एका भूमिगत गुप्त खोलीचा आणि महादेवाशी संबंधित असलेल्या परंपरेचा उल्लेख केला आहे. सारडा लिहितात: “जसे आधी सांगितले गेले आहे, ख्वाजांचे अवशेष एका भूमिगत गुप्त खोलीत आहेत, ही खोली काही वीटांनी झाकलेली आहे आणि ही समाधीच्या काही फूट खाली आहे. समाधी पांढऱ्या संगमरवर दगडात बांधलेली असून त्यावर रंगीत दगडांचे इनले (कोरीव काम) काम आहे. असे म्हणतात की, ज्या ठिकाणी हृदय आहे तिथे आठ आण्याच्या चांदीच्या नाण्याएवढ्या आकाराचा लालसर रंगाचा एक दगड लावलेला आहे.” ते पुढे लिहितात: “परंपरेनुसार, या गुप्त खोलीत महादेवाची मूर्ती आहे, ज्यावर दररोज एका ब्राह्मण कुटुंबाकडून चंदन लावले जाई आणि अजूनही दर्गा ती परंपरा ‘घरह्याली’ म्हणून जपतो.” मात्र, सारडा यांनी या देवस्थान नाहीसे होण्याबद्दल अधिक प्रकाश टाकलेला नाही.

महादेवाचे मंदिर, पानांखाली झाकोळलेले शिवमंदिर, १८४१ सालचे पुस्तक नक्की काय संदर्भ सांगते?

ब्रिटीश इतिहासकार पी.एम. करी यांनी त्यांच्या १९८९ साली प्रकाशित झालेल्या ‘The Shrine and Cult of Mu’in al-din Chishti of Ajmer’ या पुस्तकात अजमेर दर्ग्याच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला आहे. करी यांनी आर.एच. आयर्विन यांच्या ‘Some Account of the General and Medical Topography of Ajmeer (१८४१)’ या कामाचा उल्लेख केला आहे. त्यांनी पुस्तकाच्या तळटिपेत सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या काळात अस्तित्वात असलेल्या ‘महादेवाच्या प्राचीन पवित्र स्थळा’चा उल्लेख केला आहे. करी लिहितात: “एका ठिकाणी महादेवाला पवित्र मानले जाणारे प्राचीन मंदिर होते, हे लिंग झाडाच्या पाना-पाचोळ्यांनी झाकोळलेले होते. या झाडांच्या जंगलात ख्वाजा ४० दिवस चिंतन करण्यासाठी गेले होते. ते दररोज पाण्याचा एक छोटा मसा (चामड्याचा पिशवी-mussuq of water) त्या लिंगाच्या वर असलेल्या झाडाच्या फांदीवर टांगत असत. ज्यातून पाणी सतत लिंगावर पडत असे. अखेर महादेव पावला आणि या संताच्या पवित्रतेचे व अप्रत्यक्ष अर्पणाचे कौतुक केले. त्या दगडातून आवाज आला आणि संताच्या गुणांचे कौतुक केले. या परंपरेनुसार ( एका विद्वान खादिमांनी सांगितल्या प्रमाणे), हिंदू आणि मुस्लिम समानतेने ख्वाजांचा आदर करतात,” करी यांनी आर.एच. आयर्विन यांच्या कामाचा संदर्भ देत लिहिले आहे. त्यानंतर करी यांनी या कथेसाठी दुसरा दृष्टिकोन दिला: “लेखकाला (आयर्विन) याच कथेसाठी आणखी एक आवृत्ती ऐकायला मिळाली; यावेळी लिंग मोईनुद्दीन यांच्या कबरखाली असल्याचे सांगितले गेले,” करी यांनी नमूद केले, त्यांनी आयर्विनच्या १८४१ च्या संदर्भ ग्रंथाचा उल्लेख केला. मात्र, दर्ग्याच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी याचिका करणाऱ्यांनी या दस्तऐवजाचा उल्लेख केलेला नाही.

अजमेर दर्ग्याच्या बुलंद दरवाज्यात हिंदू स्थापत्याचे नमुने

हर बिलास सारडा यांनी १९११ च्या त्यांच्या ‘Ajmer: Historical And Descriptive’ या पुस्तकात अजमेरच्या बुलंद दरवाजाच्या (फतेहपूर सिक्री, आग्रा येथील बुलंद दरवाजा वेगळा आहे) ७५ फूट उंचीच्या गेटच्या उत्तर बाजूला हिंदू स्थापत्याचे नमुने दिसल्याचा उल्लेख केला आहे. सारडा लिहितात: “बुलंद दरवाजा जमिनीपासून दोन छत्र्यांपर्यंत ७५ फूट उंच आहे. उत्तरेकडे या दरवाजाला दोन बाजूंनी कोरलेल्या तीन मजली दगडी छत्र्यांनी आधार दिलेला आहे. या छत्र्या काही प्रमाणात हिंदू वास्तूचे अवशेष असल्याचे संकेत देतात. त्यांच्या कोरीव कामाच्या उत्कृष्ट नमुन्यांवरून त्यांचा हिंदू उगम स्पष्टपणे दिसून येतो. मात्र, हे सुंदर कोरीव काम पांढऱ्या रंगाच्या थराखाली झाकलेले असल्याने त्याची चमक लपली आहे आणि तो थर काढण्याची गरज आहे. असेही मानले जाते की या छत्र्या, गेट (जे लाल वाळूच्या दगडांचे असून नंतर मुस्लिम कालखंडात उंच केले आणि कमानीच्या स्वरूपात बदलले), तसेच त्याचा पूर्वेकडील भाग, हा एका प्राचीन जैन मंदिराचा भाग होते, जे नष्ट करण्यात आले होते.” सारडा पुढे लिहितात की, ११९२ मधील दुसऱ्या तराइनच्या युद्धानंतर अजमेर आणि उत्तर भारताचा मोठा भाग मोहम्मद घोरीच्या ताब्यात गेला. १२०६ मध्ये घोरीच्या मृत्यूनंतर भारताच्या काही भागांवर राज्य करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या गुलामांनी थेट सत्तास्थापना केली. गुलाम वंशाचे संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक होता.

अजमेर दर्ग्याच्या बांधकामाला ममलूक सुलतान इल्तुतमिश (१२११-१२३६) यांच्या कारकिर्दीत सुरुवात झाली होती, तर मुघल सम्राट हुमायून आणि शाहजहान यांच्या राज्यकाळात त्यात विविध बांधकामे आणि सुधारणा करण्यात आल्या. हीच वादग्रस्तता अनेक दशकांपासून सुरू असून, ती विष्णू गुप्ता यांच्या याचिकेमुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. जगप्रसिद्ध अजमेर दर्ग्याचा वार्षिक उर्स जानेवारी महिन्यात आयोजित केला जाणार असून तो श्रद्धाळूंसाठी विशेष आकर्षण ठरतो. सर्व धर्म आणि समुदायातील लोकांनी भेट दिलेला हा दर्गा भारतातील धार्मिक एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. अजमेर दर्ग्यावर सर्वेक्षणासाठी गुप्ता यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी ठरली आहे.

अधिक वाचा: 2,100-Year-Old Temple: इजिप्तमध्ये सापडला गुप्त मंदिराचा दरवाजा; २१०० वर्षं जुन्या मंदिराचं रहस्य उघड!

संदर्भ/ Book References:

Currie, P. M., The Shrine and Cult of Mu’in al-Din Chishti of Ajmer. Delhi: Oxford University Press, 1989.
Sarda, Har Bilas, Ajmer: Historical and Descriptive. Ajmer: Scottish Mission Industries Co. Ltd., 1911.
Majumdar, R. C., The History and Culture of Indian People: The Delhi Sultanate. Bombay: Bharatiya Vidya Bhavan, 1960.
Chandra, Satish, A History of Medieval India. New Delhi: Orient BlackSwan, 2007.
Shrivastava, K. M., Hindu-Muslim Syncretic Architecture. Jaipur: Rawat Publications, 2003.