मद्यपान नियमितपणे केलं किंवा काही खास प्रसंगी केलं तरीही त्याचा परिणाम शरीरावर होतोच. तुमचा मेंदू, हृदय, फुप्फुस ते स्नायूंपर्यंत, तसेच तुमचे जठर आणि तुमच्या रोगप्रतिकार शक्तीपर्यंत मद्यपानाचा तुमच्या आरोग्यावर व्यापक दुष्परिणाम होतो. त्यामध्ये कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. अमेरिकेत मद्यपान हे कर्करोगाचे तिसरे प्रमुख प्रतिबंधात्मक कारण आहे. कर्करोगग्रस्त एक लाख रुग्णांपैकी दरवर्षी २० हजार जणांच्या मृत्यूसाठी कर्करोग हेच कारण आहे. या तुलनेत मद्यपानामुळे वाहन अपघातांत अमेरिकेत दरवर्षी सुमारे १३ हजार ५०० जणांचा मृत्यू होतो. १९८० च्या सुरुवातीला मद्यपानामुळे कर्करोग होऊ शकतो, असा संशय संशोधकांना होता. त्यावर केलेल्या अभ्यासात असे आढळले की, तोंडाची पोकळी, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, मोठे आतडे व गुदाशय, तसेच स्तनाच्या कर्करोगासाठी मद्यपान कारणीभूत आहे. तसंच आणखी एका अभ्यासात दीर्घकालीन आणि जास्त प्रमाणात मद्यपान स्वादुपिंडाच्या कर्करोगास कारणीभूत असल्याचे आढळले.
२००० मध्ये यूएस नॅशनल टॉक्सिरोलॉजी प्रोग्रामअंतर्गत असा निष्कर्ष काढला गेला की, मद्ययुक्त पेय पिणे हे कर्करोगाचे ज्ञात कारण आहे. २०१२ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा भाग असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने मद्यपानाला ग्रुप-१ कार्सिनोजेनिकमध्ये वर्गीकृत केलं आहे. त्याचे सर्वोच्च वर्गीकरण असे सांगते की, एखाद्या पदार्थामुळे लोकांना कर्करोग होणं हे वरील निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसे आहेत.
रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्रे, तसेच राष्ट्रीय आरोग्य संस्था याच्याशी सहमत आहेत की, मद्यपानामुळे वेगवेगळ्या प्रकारचा कर्करोग होऊ शकतो याचे निर्णायक पुरावे आहेत. कमी प्रमाणात मद्यसेवन किंवा दिवसातून एकदा केलेले मद्यसेवन यांमुळेही कर्करोगाचा धोका वाढू शकतो. असे असले तरी अनेक अमेरिकी नागरिकांना मद्यपानामुळे कर्करोग होऊ शकतो हे माहीतच नाही. २०१९ च्या सर्वेक्षणात असे आढळले की, ५० टक्क्यांहून कमी अमेरिकन प्रौढ नागरिकांना मद्यपानामुळे होणाऱ्या कर्करोगाच्या धोक्यांबाबत माहिती आहे. २०२३ च्या औषध वापर आणि आरोग्याच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात असे आढळले की, १२ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या २२४ लाखांहून अधिक अमेरिकन लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी मद्यपान केले आहे. कोविड-१९ या आजारापूर्वीही मद्यसेवनाचे प्रमाण वाढत होते, जी एक अतिशय गंभीर आरोग्य समस्या होती.
मद्यपानाचा कर्करोगाशी कसा संबंध?
शरीरात जेव्हा पेशी अनियंत्रितरीत्या वाढू लागतात तेव्हा कर्करोगाचा धोका निर्माण होतो. मद्यपानामुळे डीएनएचे नुकसान होऊन ट्यूमर म्हणजे गाठी होऊ लागतात. त्यामुळे म्युटेशन (उत्परिवर्तन) होऊ शकते, जे सामान्य पेशींच्या विभाजन आणि वाढीमध्ये अडथळा आणते. संशोधकांनी मद्यपान आणि कर्करोगासंबंधित अनेक घटक ओळखले आहेत. यूएस सर्जन जनरलच्या २०२५ मधील अहवालात मद्यपानामुळे कर्करोग होऊ शकतो आणि याचे चार वेगवेगळे मार्ग अधोरेखित केले गेले आहेत. ते म्हणजे मद्य चयापचय, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ, संप्रेरक पातळीत बदल आणि तंबाखूच्या धुरासारख्या इतर कार्सिनोजेनशी संपर्क.
मद्य चयापचय ही अशी प्रक्रिया आहे की, ज्याद्वारे शरीर मद्याचे विघटन करते आणि काढून टाकते. जेव्हा मद्याचे विघटन होते तेव्हा त्यातून एसीटाल्डिहाइडचे उत्पादन होते. हे एक रसायन आहे, जे स्वत: कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले जाते. संशोधकांना असेही आढळले आहे की, काही आनुवंशिक म्युटेशन (उत्परिवर्तन) शरीराला मद्य जल गतीने विघटित करण्यास प्रवृत्त करू शकते. परिणामी एसीटाल्डिहाइडचे प्रमाण वाढते.
मद्यपान शरीराला फ्री रॅडिकल्स नावाचे हानिकारक रेणू सोडण्यास प्रवृत्त करू शकतात याचेही बरेच पुरावे आहेत. हे रेणू ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या प्रक्रियेत पेशींमधील डीएनए, प्रथिने व लिपिड्सचे नुकसान करू शकतात. मद्यसेवनाने तयार होणारे फ्री रॅडिकल्स पेशी किती चांगल्या प्रकारे प्रथिने तयार होतात आणि शरीराला त्याचा होणारा फायदा यांवर थेट परिणाम करू शकतात, असे एका प्रयोगात आढळले आहे. परिणामी असामान्य प्रथिने तयार होतात, जी ट्यूमर निर्मितीला अनुकूल असलेल्या जळजळीला प्रोत्साहन देतात.
मद्यपान हार्मोन्सच्या पातळीवरही थेट परिणाम करू शकते. त्यामुळेही कर्करोगाचा धोका उद्भवतो. याचे उदाहरण म्हणजे इस्ट्रोजेन स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. मध्यम प्रमाणात मद्यपान केल्यास इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि मद्यपानही वाढू शकते. मद्य ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी करून, स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवते. ‘अ’ जीवनसत्त्व हे इस्ट्रोजेन नियमन करणारे एक संयुग आहे.
जे लोक मद्यपान आणि धूम्रपान करतात त्यांना तोंड, घसा आणि स्वरयंत्राचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. मद्य शरीराला सिगारेट आणि ई-व्हेप्समधील कार्सिनोजेन्स शोषण्यास मदत करते. तु्म्ही धूम्रपान करीत असाल, तर जळजळ होऊ शकते आणि डीएनएला नुकसान करणारे फ्री रॅडिकल्सदेखील निर्माण होऊ शकतात.
एक प्यालाही ठरू शकतो धोकादायक
तु्म्हाला मद्यपान करताना असा प्रश्न पडत असेल की, किती प्रमाणात मद्यपान सुरक्षित आहे किंवा त्याचे नुकसान कसे टाळता येईल. महिलांनी दिवसातून एकापेक्षा जास्त आणि पुरुषांनी दोनपेक्षा जास्त मद्य असलेली पेये पिऊ नयेत, सांगितले जाते. रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्रे आणि अमेरिकन आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये हा सल्ला नमूद करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अल्कोहोल अॅब्युज अँड अल्कोहोलिझम आणि अमेरिकन सर्जन जनरलमध्ये मद्यसेवन मर्यादित करण्यासाठी समान तत्त्वे आहेत.
मद्यसेवन हे कर्करोगाचे एक अत्यंत प्रतिबंधात्मक कारण आहे. असे असूनही मद्यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका निश्चितपणे आहे हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक व्यक्तीची आनुवंशिक पार्श्वभूमी, जीवनशैली, आहार आणि इतर आरोग्य घटक हे सर्व मद्याच्या ट्यूमर निर्मितीवर परिणाम करू शकतात. मद्यपान करण्याच्या सवयींचा पुनर्विचार केल्यास आरोग्याचे संरक्षण होण्यास आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.