Alexei Navalny Death : रशियातील सर्वात प्रभावी विरोधक, अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाल्याचे तेथील तुरुंगाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जर हा खून असेल, तर राजकीय विरोधकांना नामशेष करण्याच्या पुतिन यांनी सुरू केलेल्या सूडसत्रातील ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची हत्या मानायला हरकत नाही. रशियामध्ये यंदा निवडणूक असली, तरी तिचा निकाल आतापासूनच सर्वांना ठाऊक आहे. अशा स्थितीत नवाल्नी यांचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अलेक्सी नवाल्नी कोण होते?

पेशाने वकील असलेले नवाल्नी सत्ताधाऱ्यांमध्ये फोफावलेल्या भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आवाज उठवत राहिले. २०००च्या दशकात राष्ट्रवादी मोर्चामध्ये त्यांनी भाग घेतला. स्थलांतरावर निर्बंध आणावेत, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यांच्या या राष्ट्रवादी विचारसरणीमुळे उदारमतवादी याब्लोको या विरोधी पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतरही ते पुतिन यांच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेला भ्रष्टाचार, त्यांची विलासी जीवनशैली यावर आवाज उठवत राहिले. आपल्या ब्लॉग्जमधून त्यांनी पुतिनधार्जिण्या उच्चभ्रूंवर टीकेची झोड उठविली. २०११ साली झालेल्या निवडणुकीत फसवणुकीने पुतिन विजयी झाल्याचा आरोप करून रशियाभर निदर्शने झाली. त्यावेळी सुरुवातीलाच अटक करण्यात आलेल्यांपैकी नवाल्नी एक होते. पुतिन यांच्या एककल्ली कारभारामुळे रशियामध्ये पुन्हा क्रांती होईल, असे भाकीत वर्तवणारे नवाल्नी पुतिन यांच्या घशातला काटा बनले नसते, तरच नवल. सायबेरिया येथे कथितरित्या विषप्रयोग झाल्यानंतर त्यांच्यावर जर्मनीमध्ये उपचार केले गेले. २०२१ साली ते विपरीत परिस्थितीत मायदेशी परतले आणि पुतिनविरोधकांच्या गळ्यातील ताईत बनले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे तुरुंगास भोगत होते. वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्यांचा संशयास्पदरित्या झालेला मृत्यू रशियातील परिस्थितीचा निदर्शक आहे.

hardeep singh nijjar death certificate canada
हरदीप सिंह निज्जरचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास कॅनडाचा नकार; राष्ट्रीय तपास संस्थेला प्रमाणपत्र का हवेय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
political twist in the suicide of a professional DJ
भंडारा : डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येला राजकीय वळण
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
India-Canada
India-Canada : ‘निज्जरचा खून आणि पन्नूच्या हत्येचा प्रयत्न एकाच कटाचा भाग’, कॅनडाच्या माजी राजदूताचा मोठा दावा
The case revolved around the the alleged assassination plot of pro-Khalistan separatist Gurpatwant Singh Pannun.
अमेरिकेने आरोप केलेला ‘रॉ’चा गुप्तचर अधिकारी विकास यादव आहे तरी कोण?
yahya sinwar killed video
Video: “मी त्याच्याकडे पाहिलं..एक लहान, विचित्र आणि…”, याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायली अधिकाऱ्यानं शेअर केला तो प्रसंग!
Yahya Sinwar
Yahya Sinwar Killed : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार, IDF ने दिला दुजोरा; इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम लागणार?

हेही वाचा : सिंधू लिपीचा द्रविडीयन लिपीशी संबंध आहे का? काय सांगते नवीन संशोधन? 

जगभरातून कोणत्या प्रतिक्रिया उमटल्या?

‘आर्क्टिक सर्कल तुरुंगा’मध्ये चक्कर येऊन पडल्यामुळे नवाल्नी यांचा मृत्यू झाला, असे शुक्रवारी रशियाच्या तुरुंगाधिऱ्यांनी जाहीर केले आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. पाश्चिमात्य राष्ट्रांनी ही राजकीय हत्याच असल्याचा आरोप स्वाभाविकपणे केला. रशियात नेमके काय घडले, हे माहिती नाही… परंतु नवाल्नी यांच्या मृत्यूला पुतिन हेच जबाबदार आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ म्हणाले, की आजच्या रशियात मुक्तपणे वागणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते व नंतर मृत्युदंड दिला जातो. ‘हत्या’ या एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली ती नोबेलविजेते रशियन संपादक दिमित्री मुराटोव्ह यांनी. पुतिन यांनीच नवाल्नी यांना ठार केले, असा थेट आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला. जर्मनीचे चँसेलर ओलाफ श्लोत्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सेला व्हॉन देर लेवेन, ‘नेटो’चे महासचिव जेन्स स्टोलेनबर्ग यांनीही कमी-अधिक प्रमाणात पुतिन यांनाच या मृत्यूसाठी जबाबदार मानले आहे.

आरोपांवर रशियाचे म्हणणे काय?

अर्थातच, रशियाने हे आरोप फेटाळले आहेत. नवाल्नी यांच्या मृत्यूबद्दल पुतिन यांना माहिती देण्यात आल्याचे ‘क्रेमलिन’ने जाहीर केले. मुळातच नवाल्नी यांना ‘अतिरेकी’ ठरवून तुरुंगात टाकण्यात आले होते. ते अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएच्या हातचे बाहुले आहेत, असा प्रचार पुतिनधार्जिण्यांनी केला होता. त्यांचे अनेक सहकारी युरोपात आश्रय घेऊन राहिल्याचेही सातत्याने अधोरेखित केले जात होते. त्यांना रशियात अनेकवेळा अटक झाली होती. राजकीय खटल्यांबरोबरच भ्रष्टाचार, घोटाळे, फसवणूक असे आरोपही त्यांच्यावर केले गेले. गेल्याच वर्षी एका फौजदारी खटल्यात त्यांना १९ वर्षांची अतिरिक्त शिक्षा देण्यात आली होती. मात्र तुरुंगात राहूनही ‘बातम्यां’मध्ये असलेले नवाल्नी पुतिन यांना धोकादायक वाटत नसतील, तरच नवल. त्यांचा मृत्यू अपघात की घातपात याची चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप होतच राहतील. मात्र रशियामध्ये अशा प्रकारे ‘अपघाती’ मृत्यू झालेले ते पहिलेच पुतिनविरोधक नाहीत, हेदेखील खरेच.

हेही वाचा : विश्लेषण : फुटबॉल जगज्जेते, ऑलिम्पिक जेते ब्राझील पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र का ठरले? ‘सांबा’ला घरघर? 

संशयास्पद मृत्यू झालेले अन्य पुतिनविरोधक कोण?

२०२२च्या डिसेंबर महिन्यात पुतिन यांच्याच पक्षाचे नेते आणि रशियन उद्योजक पावेल अँटॉव्ह तसेच व्लादिमिर बुडानोव्ह यांचा ओदिशामध्ये दोन दिवसांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाला. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘ल्यूकऑईल’ या रशियन कंपनीचे अध्यक्ष राविल मेगानोव्ह मॉस्कोमधील एका रुग्णालयाच्या खिडकीतून पडून मृत्युमुखी पडले. त्याआधी काही दिवस त्यांनी युक्रेनवरील हल्ल्यामुळे पुतिन यांच्यावर टीका करून युद्ध तातडीने थांबवण्याची मागणी केली होती. ऑगस्टमध्ये युक्रेन युद्धाचे आणखी एक टीकाकार, उद्योगपती डॅन रॅपोपोर्ट अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात मृत अवस्थेत आढळून आले. २००३ ते २०१६ या काळात पुतिन यांच्यावर जाहीर टीका केल्यानंतर किमान ९ प्रसिद्ध रशियन व्यक्तींना ‘अकस्मिक’पणे जगाचा निरोप घ्यावा लागला होता, हे विशेष. यामध्ये आता ‘रशियाचे नेल्सन मंडेला’ अशी ख्याती असलेल्या अलेक्सी नवाल्नी यांच्या नावाची भर पडली आहे. कधीतरी तुरुंगातून बाहेर येतील आणि रशियाला पुतिन यांच्या राजवटीतून मुक्तता देतील, हे त्यांच्या पाठिराख्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

amol.paranjpe@expressindia.com