Alexei Navalny Death : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सर्वात मोठे टीकाकार आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवाल्नी यांच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूनंतर देशाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, अलेक्सी नवाल्नींची पत्नी युलिया नवलनाया यांनी पतीच्या मृत्यूनंतर प्रथमच केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. युलिया नवलनाया यांनी अलेक्सी नवाल्नींबरोबर घालवलेल्या एका सुंदर क्षणाचा फोटो त्यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नवलनाया यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे तुझ्यावर प्रेम आहे.” अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात गूढ मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूचे वर्णन षड्यंत्र म्हणून केले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी रशियन विरोधी पक्षनेत्याचे प्रवक्ते किरा यार्मिश यांनी अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूची खात्री केली आणि मृतदेह तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याची मागणी केली. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, यार्मिश यांनी रशियन अधिकाऱ्यांनी प्रक्रियेला विलंब करण्यासाठी खोटे बोलल्याचा आरोपही केला. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे टीकाकार अलेक्सी नवाल्नी यांचे शुक्रवारी तुरुंगात फिरताना अस्वस्थ वाटल्याने जमिनीवर कोसळून मृत्यू झाला, असं यार्मिशने सांगितले आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पत्नी युलिया आता यांच्याकडे रशियातील विरोधी पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे त्या राजकारणात सक्रिय होतात हे लवकरच समजणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा