गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) धोरण उद्यापासून म्हणजेच ११ मे पासून बदलणार आहे. यामध्ये एक बदल म्हणजे अँड्रॉइडवरील कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद करणे. म्हणजेच, तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप्ससह अँड्रॉइड (Android) स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. कंपनीने याबाबत आधीच सांगितले आहे.

कारण काय?

सुरक्षेमुळे कॉल रेकॉर्डिंग अॅप्स बंद करण्यात येत आहेत. कंपनीने म्हटले आहे की कॉल रेकॉर्डिंग अॅप्स अनेक अॅप वापरताना वापरकर्त्यांकडून अनेक परवानग्या घेतात ज्याचा अनेक डेव्हलपर्स चुकीचा फायदा घेतात. याशिवाय कॉल रेकॉर्डिंग अॅप्सबाबतचा कायदाही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा आहे. त्यामुळे कंपनी त्यात बदलही करत आहे. गुगलच्या नवीन धोरणामुळे उद्यापासून कॉल रेकॉर्डिंग अॅप्स पूर्णपणे बंद होतील. या धोरणामुळे ट्रूकॉलरने (Truecaller) देखील पुष्टी केली आहे की यापुढे ट्रूकॉलरवर कॉल रेकॉर्डिंग शक्य होणार नाही.

MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’ योजना? याचा लाभ कसा घेता येणार?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच…
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
tulsi gabard trump ministry
हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Congress president Mallikarjun Kharge.
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय?

इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अॅप्स कार्यरत राहणार?

परंतु, ज्या फोन्सना आधीच कॉल रेकॉर्डिंग फंक्शनॅलिटी देण्यात आली आहे ते काम करत राहतील. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अॅप असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ते पूर्वीप्रमाणेच काम करत राहतील.

समस्या अशा लोकांना येईल ज्यांच्या फोनमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग अॅप नाही आणि ते कोणत्याही थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅपद्वारे कॉल रेकॉर्ड करतात. Samsung, Vivo, Reality आणि इतर कंपन्यांचे बहुतेक फोन इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर्ससह येतात.नवीन धोरणापूर्वीही कंपनीने असे प्रयत्न केले आहेत. कंपनीने Android 10 मध्ये कॉल रेकॉर्डिंग बंद ठेवले होते. हे निर्बंध हटवण्यासाठी, अॅप्सनी ऍक्सेसिबिलिटी API वापरून कॉल रेकॉर्ड करणे सुरू केले. आता गुगलच्या नव्या धोरणानंतर हे शक्य होणार नाही.