5 Things To Know About Alzheimer’s disease: अल्झायमर हा मज्जातंतूला हानी पोहोचवणारा आजार आहे ज्यामुळे स्मृतिभ्रंश होतो, जगभरातील ५५ दशलक्षाहून अधिक लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे मात्र अद्यापही यावर ठोस उपाय मिळालेला नाही. दरवर्षी २१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर्स जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘अल्झायमर्स अॅण्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया’ या संघटनेच्या माहितीप्रमाणे भारतातील साठ वर्षांवरील वयोगटात सुमारे ५३ लाख नागरिकांना अल्झायमर्सचे निदान झाले आहे. २०३० पर्यंत यात सुमारे २० लाखांची वाढ दिसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अल्झायमर्स हा आजार नेमका कसा होतो? त्याची लक्षणे काय व त्यावर कशी मात करता येईल? या संदर्भात अनेकांना माहिती नसल्याने या आजाराचा प्रसार अधिक झाला आहे असे तज्ज्ञ सांगतात. आज अल्झायमर्स जनजागृती दिवसाच्या निमित्ताने आपण अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि ब्रिटिश लेखक टेरी प्रॅचेट यांनी या आजाराबद्दल सोप्या पाच मुद्द्यांमधून केलेले सविस्तर विश्लेषण जाणून घेऊयात.
अल्झायमर्स हा आजार काय आहे?
जर्मन डॉक्टर अलॉइस अल्झायमर यांनी १९०६ मध्ये हा आजार जगासमोर आणला होता. या आजाराने ग्रस्त प्रथम रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याच्या मेंदूतील प्लेक्स आणि गुंता शोधून काढला. अल्झायमर हळूहळू मेंदूच्या ऊतींचा नाश करतो, व स्मरणशक्ती हिरावून घेतो, यामुळे मन व मेंदू विचलित होते. अनेकदा या रुग्णांना साधी दैनंदिन कामे सुद्धा करता येत नाहीत. अनेकदा अशा रुग्णांचे सतत मूड स्विंग होत असतात केवळ कामातच नाही तर संवाद साधतानाही त्यांना बराच अडथळा येतो.
अल्झायमर्स रुग्णांची आकडेवारी
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार , जगभरात ५५ दशलक्षाहून अधिक लोक डिमेन्शियाने ग्रस्त आहेत, त्यापैकी अल्झायमर हा सर्वात सामान्य प्रकार आहे. डिमेंशियाच्या ६० ते ७० टक्के किंवा ३० दशलक्षाहून अधिक रुग्णांमध्ये अल्झायमर रुग्ण सर्वाधिक आहेत. सद्य:स्थितीत साठ वर्षांवरील दर २७ नागरिकांमागे एक जण अल्झायमरचा सामना करत आहे. ग्रामीण भागातही अल्झायमरचे प्रमाण लक्षणीय आहे’ २०५० पर्यंत अल्झायमर असलेल्या लोकांची संख्या तिप्पट होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे कुटुंबांवर आणि आरोग्य सेवा प्रणालींवरचा भार वाढेल.
अल्झायमर आजार कशामुळे होतो?
अल्झायमर हा स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, परंतु तो नेमका कशामुळे होतो किंवा तो कसा वाढतो याबद्दल अद्याप ठोस शोध लागलेला नाही. अल्झायमर रोगामध्ये, दोन प्रमुख प्रथिने – टाऊ आणि एमायलोइड-बीटा — यांचा मेंदूत गुंता होतो व प्लेक्स तयार होतात. यामुळे मेंदूच्या पेशी मरतात आणि मेंदू संकुचित होतो.
२०२१ मध्ये एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी सांगितले की विषारी प्रोटीन क्लस्टर्स मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लवकर पोहोचतात आणि जमा होतात ज्यामुळे अल्झायमरचा धोका वाढतो.
अल्झायमरची लक्षणे
अल्झायमर रुग्णांना वेळ व काळ याचे भान राहत नाही. नेहमीच्या जागा व वस्तू विसरण्यापासून याची सुरुवात होते. बोलताना सतत अडखळणे, शब्द न सुचणे, सर्वांची नावे विसरणे असे सामान्य लक्षण या रुग्णांमध्ये दिसून येते. वृद्धांचं बाबत अनेकदा वयोमानानुसार असं होत असावं असे अंदाज बांधून दुर्लक्ष केलं जातं मात्र त्यामागे अल्झायमर हे मुख्य कारण असू शकतं.
अल्झायमरचा धोका ‘यांना’ असतो…
फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्च (Inserm) च्या मते, अल्झायमरचा मुख्य जोखीम घटक म्हणजे वय: वयाच्या ६५ नंतर आजार होण्याची शक्यता असते, तर वयाच्या ८० वर्षानंतर हे प्रमाण अधिकच वाढते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब, जेव्हा मध्यम वयात हाताळले जात नाही त्यामुळेही अल्झायमरवाढीचा धोका असतो.
अल्झायमरमागे बैठी जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे. संशोधकांच्या माहितीनुसार बॉक्सर आणि रग्बी खेळाडूंनाही अल्झायमरचा धोका अधिक असतो. अभ्यास, उत्तेजक कार्य आणि सक्रिय सामाजिक जीवन या सर्वांमुळे प्रथम लक्षणे आणि त्यांची तीव्रता दिसण्यास विलंब होतो.
अनेक दशकांच्या संशोधनानंतरही अल्झायमरचा नेमका उपचार सापडलेला नाही. गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठी प्रगती २०२१ मध्ये आली जेव्हा युनायटेड स्टेट्सने अडुहेल्म नावाच्या औषधाला मान्यता दिली होती मात्र त्याची परिणामकारकता मर्यादित असल्याने याच्या वापराचा सल्ला दिला जात नाही.