अल्झायमर्स आणि कर्करोगावर या वर्षात नवीन उपचारपद्धती भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठा बदल घडणार आहे. कार-टी पेशी अथवा रोगप्रतिकारक पेशींचा वापर रक्ताच्या कर्करोगावरील उपचारासाठी करण्याची उपचार पद्धती स्वस्तात जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे. देशात योनीमार्गाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम आखण्यात आला आहे. यासह इतर अनेक उपचार पद्धती या वर्षात क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या ठरणार आहेत. नेमक्या कोणत्या आहेत या उपचार पद्धती?

कर्करोगासाठी एमआरएनए लस?

एमआरएनए लशींना पहिल्यांदा करोना संकटाच्या काळात परवानगी मिळाली. संशोधक या लशींचा वापर कर्करोगावरील उपचारासाठी वापर करण्यावर संशोधन करीत आहेत. मात्र, कर्करोगावरील प्रमाण उपचारपद्धती म्हणून त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असले तरी सुरुवातीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्यांचे चांगले परिणाम हाती आले आहेत. एमआरएनए आधारित लशींचा वापर फुप्फुस, स्वादुपिंड, त्वचा, चेता पेशी, डोके, मान आणि प्रोस्ट्रेटच्या कर्करोगांवर करण्याच्या सुमारे २५ हून अधिक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. या लशींमुळे कर्करोग होण्यापासून बचाव होत नाही. मात्र, कर्करोगाच्या पेशींच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मिळते. त्यामुळे पुन्हा कर्करोग होण्याचा धोका या उपचारामुळे कमी होण्यास मदत होते.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी

हेही वाचा : विश्लेषण : ऑनलाइनसाठी चॅटजीपीटीला ‘चोरी’ महागात पडणार? न्यूयॉर्क टाइम्सने खटला का दाखल केला?

‘अल्झायमर्स’वर नवीन उपचार पद्धती?

‘अल्झायमर्स’वरील लिकेनमॅब औषधाला मागील वर्षात मंजुरी देण्यात आली आहे. या रोगावर आतापर्यंत कोणतेही औषधोपचार उपलब्ध नव्हते. या रोगाचे मूळ शोधण्याचे काम संशोधक अद्याप करीत आहेत. ‘अल्झायमर्स’च्या रुग्णांमध्ये बिटा-अमायलॉइड प्रथिनाचे प्रमाण कमी होत असल्याचे एमआरआय तपासण्यांमध्ये स्पष्ट दिसून येते. हे औषध हे प्रथिन कमी होण्याची प्रक्रिया रोखते. याचबरोबर एली लिली कंपनीचे डोनॅनमॅब हे औषधही हीच क्रिया करते. मात्र, त्याच्या अजूनही वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. याचबरोबर सिनॅप्टिक प्लास्टिसिटी (चेतीपेशी समूहांच्या परस्पर संबंधांत सुधारणा करणे), चेतापारेषण रिसेप्टर्स आणि शरीराचा प्रतिकारशक्ती प्रतिसाद या उपचार पद्धतींवर सध्या संशोधन सुरू आहे. तसेच वजन कमी करण्याचे सेमॅग्लुटिड औषध चेतापेशी, प्रतिकारशक्ती प्रतिसाद आणि रक्तवाहिन्यांची स्थिती यात सुधारणा करण्यासाठी वापरता येईल का, यावरही संशोधन सुरू आहे.

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराचा गोंधळ नेमका काय? गुपचूप करवाढ, मग माघार?

सिकल सेल आणि थॅलेसिमिया…

मागील वर्षी नोबेल पुरस्कार विजेत्या क्रिस्पर तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतीला मंजुरी मिळाली. सिकल सेल आणि बेटा थॅलेसिमिया यांच्यावरील उपचारासाठी क्रिस्परचा वापर होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतींची ही केवळ सुरुवात आहे. क्रिस्पर थेरपॅटिक्स कंपनी टाईप-१ मधुमेह, हृदयविकार यावरील उपचारासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर काम करीत आहेत. या जनुकीय रचनेत बदल करण्याच्या रचनेतून कर्करोगावरील कार-टी उपचार विकसित केले जाऊ शकतात. सध्या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी काढून तिच्यावर प्रयोगशाळेत सुधारणा केली जाते. कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांना नष्ट करता येईल, अशा प्रकारे ही सुधारणा केली जाते. मात्र, ही उपचार पद्धती प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्रपणे करावी लागत असल्याने ती खर्चिक आहे. क्रिस्परमुळे वैश्विक कार-टी उपचार पद्धती विकसित होऊ शकतात.

भारतात कर्करोगावर कार-टी उपचार पद्धती?

आयआयटी मुंबई आणि टाटा मेमोरिअयल रुग्णालयाने विकसित केलेल्या कार-टी पेशी उपचार पद्धतीला भारत सरकारने मंजुरी दिली आहे. अनेक रुग्णालयांकडून या पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा कर्करोगाचा धोका निर्माण होणाऱ्या रुग्णांमध्ये अधिकाधिक प्रमाणात या पद्धतीने उपचार या वर्षात होताना दिसतील. याचबरोबर इतर देशांच्या तुलनेत भारतात हे उपचार स्वस्त आहेत. मोठ्या रुग्णालयांत हे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे तपशील १५ वर्षे जतन केले जाणार आहेत. त्यांच्यावर या उपचाराचे कोणते दुष्परिणाम होतात का, हे तपासण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे.

हेही वाचा : विश्लेषण: राज्याच्या साखर उत्पादनात वाढ होणार?

एचपीव्ही लसीकरण कशासाठी?

सिरम इन्स्टिट्यूटने मानवी पॅपिलोमा विषाणूविरोधात विकसित केलेली ही लस आहे. लैंगिक संबंधातून पसरणारा हा विषाणू असून, योनीमार्गाचा कर्करोग होण्यास हा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. ही लस स्वस्त असून, ती लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. सरकारकडून लवकरच हे लसीकरण सुरू होणार आहे. हे लसीकरण ९ ते १४ वयोगटातील मुलींमध्ये टप्प्याटप्प्याने केले जाईल.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader