पंजाबाचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी १९ सप्टेंबर रोजी त्यांच्या समर्थकांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद समर्थपणे सांभाळले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यामुळे त्यांनी अगोदर वेगळा पक्ष स्थापन केला आणि आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अमरिंदर सिंग यांच्या भाजपा प्रवेशानंतर पंजाबमधील राजकारणात काय बदल होणार? भाजपाला त्याचा काय फायदा होणार? तसेच अमरिंदर सिंग यांचे राजकीय भवितव्य काय असणार यावर एक नजर टाकुया.

हेही वाचा>>> विश्लेषण : नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर कारवाई का?

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत

भाजपा प्रवेशामुळे अमरिंदर सिंग यांना काय फायदा होणार?

अमरिंदर सिंग सध्या ८० वर्षांचे आहेत. भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांचा राजकीय पुनर्जन्म होईल असे म्हटले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी काँग्रेसची साथ सोडत आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पंजाब लोक काँग्रेस (PLC) या नव्या पक्षाची स्थापन केली होती. हा पक्ष विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करू शकला नाही. PLC पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलेले अमरिंदर सिंग यांच्यासहित सर्वच उमेदवार पराभूत झाले होते. या निवडणुकीनंतर अमरिंदर सिंग पंजाबच्या राजकारणात दिसेनासे झाले होते. मात्र आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीस नवसंजीवनी मिळाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा>>> कर्नाटक : भाजपामधील नाराजी चव्हाट्यावर! मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने माजी मंत्र्याने केले नेतृत्वाला लक्ष्य

अमरिंदर सिंग यांच्या वयाचा विचार केला तर त्यांनी निवडणुका आणि राजकारणात सक्रिय भूमिका मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यांची मुलगी जय इंदर कौर यांना भाजपा पक्षातर्फे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. जय इंदर कौर या पटियाला भागात राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी दिली जाऊ सकते. तर दुसरीकडे अमरिंदरस सिंग यांना एखाद्या राज्याचे राज्यपालपद दिले जाऊ शकते. किंवा राज्यसभेवर नियुक्ती करून केंद्रीय मंत्रीपदही दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा>>> पश्चिम बंगाल : नंदीग्राम मतदारसंघात तृणमूलला धक्का, सहकारी कृषी समितीच्या निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय

भाजपाला काय फायदा होणार?

भाजपाला पंजाबमध्ये आपला विस्तार करायचा आहे. याच कामासाठी अमरिंदर सिंग यांचा उपयोग होऊ शकतो. अमरिंदर सिंग यांनी दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेले आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग यांच्या रुपात भाजपाकडे शिख चेहरा असणार आहे. अमरिंदर सिंग यांची विचारधारा आणि त्यांची राष्ट्रवादी भूमिका भाजपासाठी पोषक आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग हिंदू मतदारांस जवळचे वाटू शकतात. याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे तसेच अमली पदार्थ पुरवले जात आहेत, असा आरोप यापूर्वी केलेला आहे. अमरिंदर यांची ही भूमिकाही भाजपासाठी पोषक ठरू शकते.

हेही वाचा>>> विश्लेषण : हंगेरीमध्ये ‘मतदानातून हुकूमशाही’? युरोपीय महासंघातील ठरावाचे परिणाम काय?

सप्टेंबर २०२१ पर्यंत अमरिंदर सिंग यांचे राजकीय क्षेत्रात वेगळेच वजन होते. पंजाबमध्ये काँग्रेसपेक्षाही त्यांची प्रतिम उचावलेली होती. २०१७ साली काँग्रेसच्या पंजाबमधील विजयामध्ये अमरिंदर सिंग यांचा मोठा वाटा होता. मात्र पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर अमरिंदर सिंग यांचे राजकीय महत्त्व कमी होत गेले. २००२ ते २००७ या कालावधीत मुख्यमंत्री असताना अमरिंदर सिंग यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले होते. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळेच ते लोकप्रिय झाले होते. मात्र २०१७ साली पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची विश्वासार्हता आणि लोकप्रियता कमी झाली. त्यामुळे अमरिंदर सिंग भाजपाला पंजाबमधील पक्षविस्तारासाठी कितपत मदत करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader