Why is Amazon laying off employees significant? : मागील काही दिवसांपासून जगभरातील अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे.आता अ‍ॅमेझॉनदेखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात अ‍ॅमेझॉन तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी का करत आहेत? हे जाणून घेऊया.

अ‍ॅमेझॉन १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
check your PF balance instantly without UAN Number
EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
Success Story Of Abhishek Bakolia In Marathi
Success Story Of Abhishek Bakolia : UPSC टॉपर अपाला मिश्राने निवडला तिचा जोडीदार, वाचा कोण आहे अभिषेक बकोलिया

मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅमेझॉन ही वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारी कंपनी कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. जगभरात ही कर्मचारी कपात केली जाईल. जगभरात अ‍ॅमेझॉनचे १६ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारी संख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी असेल. मात्र तब्बल १० हजार लोकांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता असल्यामुळे आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे.

मोठ्या कंपन्या कर्मचारी कपातीचा निर्णय का घेत आहेत?

जगभरात करोना साथ कमी झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे तसेच निर्बंध शिथील केले जात असल्यामुळे लोक घराबाहेर पडत आहेत. याच कारणामुळे तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी कमी होताना दिसत आहे. करोना महासाथीच्या काळात टाळेबंदीमुळे लोक घरातच बसून होते. त्या काळात लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवायचे. या काळात ते समाजमाध्यमं वापरायचे, ऑनालईन वेगवेगळ्या गोष्टी पाहायचे तसेच ऑनलाईन खेळदेखील खेळायचे. याच काळात मनुष्यबळाची गरज वाढल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणत कर्मचारी भरती करण्यात आली. मात्र लोक आता घराबाहेर पडत असल्यामुळे हे सर्व कमी झाले आहे. मनुष्यबळाची गरजही कमी झाली. लोक घराबाहेर पडून कार्यालय तसेच इतर कामांत व्यस्त आहेत. परिणामी या कंपन्यांची मिळकतही कमी झालेली आहे आणि या टेक कंपन्यांना सांभाळण्यासाठी कमी मनुष्यबळाची गरज भासत आहे.

अ‍ॅमेझॉनने कर्मचारी कपात का केली?

अ‍ॅमेझॉन ही तंत्रज्ञान आणि ऑनलाईन विक्री वस्तू क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. मात्र या कंपनीकडून कर्मचारीकपात केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र ही कर्मचारीकपात प्रत्यक्षात आलीच तर या कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारीकपात असेल.

सध्या ग्राहकांचा खरेदीकडे ओढा नाहीये. अ‍ॅलेक्सा या उपकरणाची मागणीदेखील कमी झाली आहे. याच कारणामुळे महसुलात समाधानकारक वाढ होत नसल्यामुळे अ‍ॅमेझॉन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे.

आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांकडून कर्मचारीकपात?

अब्जाधीश एलॉन मस्कने ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट खरेदी केल्यानंतर या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात करण्यात आली. तर फेसबूक या समाजमाध्यमाच्या मेटा या मातृसंस्थेने आतापर्यंत ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अॅपल या कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांची कपात केलेली नाही. मात्र या कंपनीने नव्याने कर्मचारी भरती करण्याचे प्रमाण कमी केले आहे.