Why is Amazon laying off employees significant? : मागील काही दिवसांपासून जगभरातील अनेक प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे.आता अॅमेझॉनदेखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात अॅमेझॉन तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अब्जावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी का करत आहेत? हे जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अॅमेझॉन १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार
मिळालेल्या माहितीनुसार अॅमेझॉन ही वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारी कंपनी कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. जगभरात ही कर्मचारी कपात केली जाईल. जगभरात अॅमेझॉनचे १६ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. नोकरकपात झाल्यास हा आकडा एकूण कर्मचारी संख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी असेल. मात्र तब्बल १० हजार लोकांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता असल्यामुळे आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे.
मोठ्या कंपन्या कर्मचारी कपातीचा निर्णय का घेत आहेत?
जगभरात करोना साथ कमी झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे तसेच निर्बंध शिथील केले जात असल्यामुळे लोक घराबाहेर पडत आहेत. याच कारणामुळे तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांच्या उत्पादनांची मागणी कमी होताना दिसत आहे. करोना महासाथीच्या काळात टाळेबंदीमुळे लोक घरातच बसून होते. त्या काळात लोक इंटरनेटवर जास्त वेळ घालवायचे. या काळात ते समाजमाध्यमं वापरायचे, ऑनालईन वेगवेगळ्या गोष्टी पाहायचे तसेच ऑनलाईन खेळदेखील खेळायचे. याच काळात मनुष्यबळाची गरज वाढल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणत कर्मचारी भरती करण्यात आली. मात्र लोक आता घराबाहेर पडत असल्यामुळे हे सर्व कमी झाले आहे. मनुष्यबळाची गरजही कमी झाली. लोक घराबाहेर पडून कार्यालय तसेच इतर कामांत व्यस्त आहेत. परिणामी या कंपन्यांची मिळकतही कमी झालेली आहे आणि या टेक कंपन्यांना सांभाळण्यासाठी कमी मनुष्यबळाची गरज भासत आहे.
अॅमेझॉनने कर्मचारी कपात का केली?
अॅमेझॉन ही तंत्रज्ञान आणि ऑनलाईन विक्री वस्तू क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. मात्र या कंपनीकडून कर्मचारीकपात केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र ही कर्मचारीकपात प्रत्यक्षात आलीच तर या कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारीकपात असेल.
सध्या ग्राहकांचा खरेदीकडे ओढा नाहीये. अॅलेक्सा या उपकरणाची मागणीदेखील कमी झाली आहे. याच कारणामुळे महसुलात समाधानकारक वाढ होत नसल्यामुळे अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे.
आतापर्यंत कोणकोणत्या कंपन्यांकडून कर्मचारीकपात?
अब्जाधीश एलॉन मस्कने ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट खरेदी केल्यानंतर या कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात करण्यात आली. तर फेसबूक या समाजमाध्यमाच्या मेटा या मातृसंस्थेने आतापर्यंत ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अॅपल या कंपनीने अद्याप कर्मचाऱ्यांची कपात केलेली नाही. मात्र या कंपनीने नव्याने कर्मचारी भरती करण्याचे प्रमाण कमी केले आहे.