Why the Sangh Embraced the Dalit Icon: गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सरकारविरोधात एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांनी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मंगळवारी (१७ डिसेंबर) राज्यसभेत केलेल्या भाषणात शाह म्हणाले होते की, आंबेडकरांचा उल्लेख करणे हे एक ‘फॅड’ झाले आहे. विरोधकांनी त्याऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते. याच पार्श्वभूमीवर बुधवारी विरोधकांनी एकत्र येत गृहमंत्री शाह यांना सरकारमधून बडतर्फ करण्याची मागणी केली. परंतु, विरोधकांच्या या मागणीवर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट प्रणालीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाला नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारच्या गलिच्छ युक्त्यांचा वापर केल्याचा आरोप केला. यासर्व पार्श्वभूमीवर भाजप आणि त्यांचे वैचारिक प्रेरणा स्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्व आणि विचारांशी कसे नाते जोडले, हे जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठराव.

अधिक वाचा: Video: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांच्या विचारांशी कधी आणि कसं जुळवून घ्यायला सुरुवात केली?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली, परंतु त्यानंतर अनेक दशकानंतर संघाच्या हिंदू एकीकरणाच्या मूळ तत्त्वाला दोन मोठ्या घटनांमुळे धक्का बसला. पहिली घटना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर झालेले दलित धर्मांतर. १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या रेशीमबागेत सरसंघचालक त्यांच्या वार्षिक संबोधनादरम्यान स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असताना नागपूरच्या दीक्षाभूमीवर दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ही घटना शेजारीच घडत असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ .आंबेडकर आणि दलितांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली ती तब्बल २५ वर्षांनंतर. १९८१ साली तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्ह्यातील मीनाक्षीपुरम येथे शेकडो दलित हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारला. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आंबेडकरांच्या विचारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

तामिळनाडूतील धर्मांतरांनंतर काय झाले?

तामिळनाडूमधील धर्मांतरामुळे निम्न जातीतील हिंदूंनी इस्लाम स्वीकारल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धास्तावला. त्यानंतर संघाने विविध ठिकाणी हिंदू समागम (सर्व हिंदूंचे संमेलन) आयोजित करण्यास सुरुवात केली. १९८२ साली बंगळुरूमध्ये असेच एक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात हजारो गणवेशधारी स्वयंसेवकांनी “हिन्दवः सहोदरः सर्वे” (सर्व हिंदू भाऊ आहेत) अशी घोषणा दिली. पुढच्याच वर्षी म्हणजे १४ एप्रिल १९८३ रोजी महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिन साजरा केला (१९८३ साली इंग्रजी दिनदर्शिकेनुसार बाबासाहेबांचा तर हिंदू दिनदर्शिकेनुसार हेडगेवार यांचा जन्मदिन एकाच दिवशी आला होता). या प्रतिकात्मकतेचा विस्तार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रभर ४५ दिवसांची ‘फुले-आंबेडकर यात्रा’ काढून दलित वर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा: धम्मचक्र प्रवर्तन दिन: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?

१९८९ साली हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघाच्या प्रत्येक शाखेला त्यांच्या क्षेत्रातील दलित वस्तीमध्ये किमान एक शिक्षण केंद्र चालवण्याचे निर्देश सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि सरकार्यवाह एच. व्ही. शेषाद्री यांनी दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अशा उपक्रमांसाठी सेवा विभाग स्थापन करण्यात आला. १९९० साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आंबेडकर आणि दलित सुधारक ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचाही विशेष उल्लेख केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने (ABPS) एक ठराव पारित केला ज्यात म्हटले होते की, “या दोन महान नेत्यांनी हिंदू समाजातील वाईट रूढी- परंपरांना जोरदार फटकारले आणि… हिंदू समाजाला स्वतःच्या सदस्यांवर केलेल्या अन्यायांना संपवण्यास यशस्वीपणे प्रवृत्त केले.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दलित संपर्कामुळे भाजपला फायदा झाला का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘दलितांशी संवाद’ साधण्याच्या प्रयत्नांमधून भाजपला फारसा राजकीय फायदा झाला नाही. दलित मतदार हा गट जिंकणे भाजपसाठी आजही अवघडच ठरले आहे. उत्तर प्रदेशात कांशीराम आणि मायावती यांसारखे दलित नेते तसेच बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या उदयानंतर भाजपची उच्चवर्णीयांच्या पक्षाची प्रतिमा कायम राहिली. परंतु, भाजपने आपला सामाजिक आधार विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. उत्तर प्रदेशात १९९५ साली भाजपने मुलायम सिंह यादव यांना विरोध करण्यासाठी मायावती यांच्याशी हातमिळवणी केली आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने पासवान आणि जीतनराम मांझी यांना आपल्याबरोबर घेतले. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार आंबेडकरांचा उल्लेख करून दलित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

Story img Loader