‘डिस्ने’ ही जगातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी आहे. १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी या कंपनीने शताब्दी पूर्ण केली. मध्यंतरी ‘डिस्ने’ आणि तिचे मुख्य करमणूक स्थान असलेल्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्याचे गव्हर्नर रॉन डेसँटिस यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू होता. परंतु, १०० वर्षांपूर्वी व्यंगचित्र या क्षेत्रात पदार्पण करणे, त्यात आपले स्थान निश्चित करणे आणि आज जगातील मोठ्या मीडिया हाऊसपैकी एक ठरणे हे एवढे सोपे नाही. ‘डिस्ने’ची निर्मिती आणि संघर्ष जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांना कला हे अर्थार्जनाचे माध्यम ठरू शकेल का, अशी शंका वाटावी असा २० व्या शतकाचा काळ होता. पण, याच काळात ऑगस्ट १९२३ मध्ये वॉल्ट डिस्ने या व्यंगचित्रकाराने कॅन्सस सिटीसाठी हॉलिवूड सोडले. त्याच्याकडे काही व्यंगचित्रे, रेखाचित्रे आणि ४० डॉलर्स एवढीच संपत्ती तेव्हा होती. जिद्द मनामध्ये ठेवून त्यांनी स्वतःचा स्टुडिओ उभारायचे ठरवले. ५०० डॉलर्सचे कर्ज घेऊन, भावाच्या मदतीने त्याने स्वतःच्या काकांच्या गॅरेजमध्ये स्टुडिओ बांधला. १६ ऑक्टोबर, १९२३ रोजी डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडिओची सुरुवात झाली. आज डिस्ने कंपनी जगातील सर्वात मोठ्या मीडिया हाऊसपैकी एक असून स्थापनेचे १०० वर्ष यशस्वीरीत्या साजरे करत आहे.

हेही वाचा : यंदाच्या ‘नोबेल’नंतर इराणमधील महिलांच्या समस्यांकडे लक्ष जाणार का?

कथा वॉल्ट डिस्नेची…

वॉल्टर एलियास डिस्ने यांचा जन्म ५ डिसेंबर, १९०१ रोजी शिकागो येथे उद्योजक एलियास डिस्ने आणि शिक्षिका असणाऱ्या फ्लोरा कॉल यांच्या पोटी झाला. त्यांचे बालपण कॅन्सस सिटीजवळील मार्सलीन येथे गेले. डिस्ने यांना पाच भावंडं होती. परंतु, चित्रकलेची जाण आणि आवड फक्त वॉल्टला होती. त्यांना लहानपणापासूनच चित्र काढण्यात रस होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी काढलेले रेखाचित्र विकले होते. तज्ज्ञ व्यक्तींच्या साहाय्याने त्यांनी कार्टूनिंगचा अभ्यास केला. शिकागोमधील मॅककिन्ले हायस्कूलमधून त्यांनी फोटोग्राफीचेही शिक्षण पूर्ण केले.
पहिल्या महायुद्धाच्या काळात १६ वर्षीय वॉल्टने लष्करी सेवा करण्याचे ठरवले. परंतु, अल्पवयीन असल्यामुळे लष्कराच्या नियमांमध्ये त्यांची निवड झाली नाही. सेवा करण्याचे उद्दिष्ट समोर असल्यामुळे त्यांनी अमेरिकन रेड क्रॉसमध्ये प्रवेश घेतला. रेड क्रॉस अंतर्गत समाजसेवा करण्यासाठी त्यांना फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पाठवण्यात आले. तिथे त्यांनी वर्षभर रुग्णवाहिका चालवण्याचेदेखील काम केले.
युद्ध संपल्यानंतर त्यांनी कॅन्सस सिटीमध्ये परत येऊन आपल्या चित्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अ‍ॅनिमेटेड कार्टून स्केचेसची मालिका ‘लाफ-ओ-ग्रॅम्स’ आणि परीकथांच्या मालिकेसाठी एक आदर्श अशी फिल्म तयार केली. यामध्ये अभिनय आणि ॲनिमेशन याचा समावेश होता. ही फिल्म एलिस इन कार्टूनलँड म्हणून प्रसिद्ध झाली.

हेही वाचा : इस्रायलच्या जन्माची कथा : ‘ज्यू’ पॅलेस्टाईनच्या भूमीत का आले?

हॉलिवूडमधील मिकी माऊस

आयुष्यात घडणाऱ्या काही घटना ‘टर्निंग पॉईंट’ ठरतात. वॉल्ट यांच्या बाबतीतही असेच झाले. न्यूयॉर्कच्या एका चित्रपट निर्मात्याने वॉल्ट यांची फसवणूक केली. यामध्ये त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु, याच कारणामुळे ते सिनेमॅटोग्राफर या क्षेत्राकडे वळले. सिनेमॅटोग्राफरमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियाची निवड केली. फिल्म करण्याचा अनुभव, कार्टून्सची असणारी आवड यामुळे त्यांनी स्वतःचा डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडिओ उभारला. यामध्ये त्यांचे कॅन्ससमधील माजी सहकारी, त्यांचा भाऊ यांनीही सहकार्य केले. कार्टून आर्टिस्ट उब्बे आयर्स (Ubbe Iwerks) आणि वॉल्ट या दोघांनी ओसवाल्ड द लकी रॅबिट हे कार्टून निर्माण केले. हाच पुढे सगळ्यात प्रसिद्ध असणारा मिकी माऊस ठरला. या मिकी माऊसचा वापर अनेक ॲनिमेटेड चित्रपटांमध्ये करण्यात आला.

१९४७ पर्यंत वॉल्ट यांनी स्वतः मिकी माऊसला आवाज दिला. तसेच त्यांनी डोनाल्ड डक आणि प्लूटो आणि गूफी या कुत्र्यांसह इतर अनेक कार्टून प्राणीही निर्माण केले. १९३७ मध्ये स्नो व्हाईट आणि सेव्हन ड्वार्फ्स तसेच पिनोचियो, डंबो आणि बांबी या ॲनिमेटेड फिल्म आणि पूर्णवेळ संगीत असणाऱ्या अ‍ॅनिमेटेड फिल्म्स तयार केल्या. वॉल्ट डिस्नेच्या वंडरफुल वर्ल्ड ऑफ कलरसह त्यांचे दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमही लोकप्रिय ठरले. १९६४ मध्ये मोशन पिक्चर ही कल्पना वापरून तयार केलेला मेरी पॉपिन्स चित्रफितीमुळे वॉल्ट प्रसिद्ध झाले.
कॉमेडी ॲनिमेटेड फिल्म्स तयार करतानाच वॉल्ट यांनी लष्कराला प्रोत्साहित करणाऱ्या फिल्म्सही बनवल्या. त्यांनी आपल्या स्टुडिओचा राजकीय कारणांसाठी कधीही वापर केला नाही. परंतु, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी प्रशिक्षण, लष्करी शिक्षण, विविध लष्करी तुकड्यांवर त्यांनी चित्रफिती बनवल्या. त्या सर्वांचा उद्देश लोकांमध्ये जागृती व्हावी हाच होता. १९४३ पर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ९० टक्के चित्रफिती या लष्कर आणि युद्ध यांच्याशी संदर्भित बनवल्या. त्यांनी रेखाटलेल्या कार्टून्सनेही लष्कराचा गणवेश घातलेला होता. १९४२ मधील द न्यू स्पिरिट या ॲनिमेटेड लघुपटाने लोकांना युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आयकर भरण्यास प्रोत्साहित केले.

डिस्नेलँडची निर्मिती

वॉल्टने १९४० च्या दशकाच्या मध्यात वोल्टन यांच्या मुली डियान आणि शेरॉनसह लॉस एंजेलिसमधील ग्रिफिथ पार्कला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांना डिस्नेलँडची कल्पना सुचली. मुलांसाठी आणि प्रौढांसाठी मनोरंजनपर ठरेल अशा थीम पार्कची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. १९४८ मध्ये बोट राईड आणि इतर गोष्टी असणाऱ्या ‘मिकी माऊस पार्क’ची निर्मिती झाली. १९५२ मध्ये कलाकार आणि स्थापत्यकुशल लोकांच्या मदतीने पार्कच्या डिझाईनबद्दल चर्चा करण्यात आली. आठवडाभर एक तास सलग चालणाऱ्या टेलिव्हिजन शोची निर्मिती करण्यासाठी एबीसी नेटवर्कद्वारे निधी देण्यात आला. यातूनच डिस्नेलँड टीव्ही सुरू करण्यात आले.
१६० एकर क्षेत्रावर डिस्नेलँडची निर्मिती १९५२ मध्ये करण्यात आली होती. याच्या उदघाटन कार्यक्रमालाच अलोट गर्दी झाली होती. राइड ट्रॅक्शनमध्ये ‘स्नो व्हाईटचे स्कायरी ॲडव्हेंचर्स’ आणि ‘जंगल क्रूझ’ आणि कॅम्पसभोवती फिरणारी ट्रेन, अशा गोष्टींचा समावेश होता. सुरुवातीच्या काळात नेपाळच्या राजाने आणि इराणचे शाह यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी या उद्यानाला भेट दिली. नोव्हेंबर १९६१ मध्ये, तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही भेट दिली होती. साधारण तीन तासांचा त्यांचा दौरा होता.

आज डिस्नेलँड आर्थिक, राजकीय, सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी असल्याचे दिसते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणाऱ्या डिस्नेलँडचे संस्थापक वॉल्टन यांचा प्रवास हा रेड क्रॉस ते सर्वात मोठी मीडिया कंपनीपर्यंत झाला आहे.