टपरवेअर कंपनी जगप्रसिद्ध आहे. हवाबंद आणि द्रवपदार्थ सांडू न देणाऱ्या कंपनीच्या उत्पादनांमुळे या कंपनीला जगभरातील बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र, आता ही कंपनी दिवाळखोर झाल्यामुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी एखादा तरी डब्बा तुम्हाला आजही प्रत्येकाच्या घरी सापडेलच. ही कंपनी सुरुवातीला इतकी प्रसिद्ध नव्हती. टपरवेअरचे नाव सर्वतोमुखी पोहोचवण्यात अमेरिकन महिलांचे बहुमूल्य योगदान आहे. ही कंपनी इतकी प्रसिद्ध कशी झाली? अमेरिकन महिलांनी या कंपनीला घरोघरी कसे पोहोचवले? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

मिशिगन येथील कारेन वॉटर्स यांनी १८ वर्षांच्या वयात नवविवाहित असताना १९७० च्या दशकात टपरवेअर विकायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना एक लहान मुलही होते. “मला तेव्हा क्रेडिट कार्डही मिळू शकत नव्हते. मी काम करत असले तरी बँकेने मला क्रेडिट कार्ड दिले नाही. स्त्रियांसाठी तो काळ वेगळा होता,” असे त्यांनी ‘डीडब्ल्यू’ला सांगितले. १९७४ पूर्वी अमेरिकेतील विवाहित महिला स्वतःच्या नावाने क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकत नव्हत्या. तिने आपल्या ओळखीतल्या सर्व महिलांसाठी ‘टपरवेअर पार्टी’चे आयोजन केले. विकलेल्या प्रत्येक वस्तूवर तिला कमिशन मिळाले. त्यानंतर तिने हे पैसे तिच्या पतीच्या शिक्षणासाठी वापरले. “तो इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकत होता, त्यावेळी आम्हाला पैशांची गरज होती. मी कमावलेल्या पैशातून त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या होत्या.”

egg freezing rising
ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या सीईओ करिश्मा मेहतांनी गोठवलं बीजांड ; तरुणींमध्ये ‘Egg Freezing’ची लोकप्रियता का वाढत आहे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
woman passenger gold mangalsutra stolen in moving express train
चालत्या एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाच्या मंगळसूत्राची चोरी
vineeta singh critcise pitcher in shark tank
महिलेने व्यवसायात गुंतवले नवऱ्याचे तब्बल १४ कोटी रुपये, Shark Tank India तील उद्योजिकेवर विनिता सिंहने केली टीका
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
success story of sahil pandita once washed vessels now owning business of 2 crores dvr 99
“भांडी घासली, टॉयलेट साफ केलं”, नोकरी करताना मिळायचे मोजकेच पैसे, पण आता उभारली कोटींची कंपनी; वाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास
Viral video of young girl dancing in cemetery vulgar dance video viral on social media
“हिने तर लाजच सोडली”, चक्क स्मशानात केला अश्लील डान्स! तरुणीचा संतापजनक VIDEO व्हायरल
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल

हेही वाचा : Import Duty : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख ‘A very big abuser’ असा का केला?

इतर अनेक स्त्रियांप्रमाणे टपरवेअरचे डब्बे विकणे हा तिच्या कुटुंबाला मदत करण्याचा एक मार्ग होता. १९५० च्या दशकामध्ये टपरवेअर पार्टीजनी क्रांती निर्माण केली. त्यामुळे हजारो महिलांनी त्यांचे स्वत:चे व्यवसाय सुरू केले आणि त्यामुळे त्या सक्षम झाल्या. कंपनीने आता दिवाळखोरी जाहीर केली आहे, परंतु यामुळे इतिहासाशी त्याची प्रासंगिकता कमी होत नाही. या कंपनीने अनेक गृहिणींना सक्षम करण्यास, स्वतःच्या पायांवर उभं राहण्यास मदत केली होती.

हवाबंद आणि द्रवपदार्थ सांडू न देणारे प्लास्टिकचे डब्बे न्यू हॅम्पशायरमधील व्यावसायिक आणि रसायनशास्त्रज्ञ अर्ल टपर यांनी तयार केले होते. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

टपरवेअरला जगप्रसिद्ध करण्यात महिलांचे योगदान

हवाबंद आणि द्रवपदार्थ सांडू न देणारे प्लास्टिकचे डब्बे न्यू हॅम्पशायरमधील व्यावसायिक आणि रसायनशास्त्रज्ञ अर्ल टपर यांनी तयार केले होते. त्यांनी औद्योगिक उत्पादनातूनच लवचिक प्लास्टिक तयार करण्याचा एक मार्ग शोधून काढला होता. त्यांच्या डोक्यात रंगांच्या हवाबंद डब्यांची कल्पना होती. १९४६ मध्ये, टपर यांना प्लास्टिकच्या कारखान्यात मोल्ड तयार करताना प्रेरणा मिळाली असे कंपनीच्या वेबसाइटमध्ये म्हटले आहे. मात्र, सुरुवातीला जेव्हा त्यांनी डब्बे तयार करून विकण्यास सुरुवात केली, तेव्हा अपेक्षेनुसार त्याची विक्री होऊ शकली नाही. गृहिणींना या डब्यांविषयी फारशी शाश्वती किंवा हे डब्बे खरंच हवाबंद आहेत, यावर विश्वास नव्हता.

ब्राउनी वाईज या महिलेचा कंपनीत प्रवेश झाला आणि सर्व चित्रच बदललं. ब्राउनी वाईज यांनी गृहीणींच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळे अमेरिकेतील हजारो महिलांनी आणि अखेरीस जगभरातील महिलांनीही ‘टपरवेअर पार्टी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरगुती मेळाव्यात उत्पादने विकण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. १९५० ते १९६० च्या दशकात ‘टपरवेअर पार्टी’ने ग्राहकांमध्ये क्रांती निर्माण केली. टपरवेअर साम्राज्य उभं करण्यात ब्राउनी वाईज यांचे योगदान खूप मोठे असल्याचे बोलले जाते. त्यांचे शिक्षण फार कमी होते, मात्र विक्रीसाठी कौशल्य असलेली एक विपणन प्रतिभा त्यांच्याकडे होती. त्यांच्या अद्वितीय विपणन पद्धतींनी ब्रँडमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत केली. वाईजने पूर्वी स्टॅनले होम नावाच्या क्लीनिंग प्रोडक्ट कंपनीत काम केले होते.

वाईज आयोजित करत असलेल्या होम पार्टीजमध्ये उत्पादनांच्या प्रात्यक्षिकांसह, मजेदार खेळ आणि डब्यांची चाचणीही करून दाखवली जायची; ज्यामुळे खरेदीदार आकर्षित होऊ लागले. कंपनीच्या फ्लोरिडा मुख्यालयात, वाईजने विक्री पद्धतींविषयी इतर महिलांना प्रशिक्षण दिले, हँडबुक तयार केले आणि सेल्सवुमन या कामासाठी इतर महिलांनाही तयार केले. विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी, कंपनीने सर्जनशील जाहिराती तयार केल्या. १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, वाईज या कंपनीच्या आयकॉन होत्या आणि बिझनेसवीक मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रदर्शित होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्या कॉस्मोपॉलिटन आणि वुमेन्स होम जर्नलसारख्या लोकप्रिय मासिकांमध्येदेखील दिसल्या.

गृहिणीपासून उद्योजकापर्यंत

या विपणन धोरणाच्या यशासाठी १९५० च्या दशकातील सामाजिक आर्थिक परिस्थिती योग्य होती. दुसऱ्या महायुद्धात नोकरीच्या बाजारपेठेत उतरलेल्या स्त्रिया बाहेर ढकलल्या गेल्या होत्या. ज्या महिलांच्या पतींना घराबाहेर कामासाठी जाऊ नये असे वाटत होते, त्यांच्यासाठी टपरवेअर विकणे हा उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग होता. तसेच घरगुती दिनचर्येतून बाहेर पडण्याचाही हा एक मार्ग होता. ज्या महिला ही पार्टी आयोजित करायच्या, त्या टपरवेअर विक्रेत्याला त्यांच्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायच्या आणि त्या बदल्यात तिला मोफत टपरवेअर उत्पादने दिले जायचे, तर विक्रेत्याला किती उत्पादने विकली गेली यावर आधारित कमिशन मिळायचे. पुढे गृहिणी उत्पादनाच्या सल्लागार, व्यवस्थापक आणि वितरक झाल्या.

लोकप्रिय कंपनी दिवळखोरीच्या दिशेने

ब्रँडच्या उदयामागे स्त्री सशक्तीकरणाची कथा असूनही ब्राउनी वाईजसाठी या कंपनीतील शेवट फार चांगला नव्हता. १९५८ मध्ये टपरशी मतभेद झाल्यानंतर कंपनीकडून तिला काढून टाकण्यात आले आणि तिला वाटाही दिला गेला नाही. त्याच वर्षी टपर यांनी कंपनीला ‘Tupperware Home Parties’ म्हणत, ‘Rexall’ या ड्रग कंपनीला १६ दशलक्ष डॉलर्समध्ये विकले. त्यानंतर उत्पादनांचा युरोप, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत त्वरीत विस्तार केला. नवीन डिझाइन्स बऱ्याच काळापासून कंपनीच्या ब्रँड धोरणाचा भाग आहेत.

हेही वाचा : QUAD संघटना नेमकी काय आहे? भारतासाठी या संघटनेचे महत्त्व काय?

टपरवेअरला १९८२ पासून त्याच्या उत्पादन डिझाइन आणि कार्यक्षमतेसाठी २८० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. तरीही ब्रँडने आता त्यांच्या उत्पादनांमधला ग्राहकांचा रस कमी झाल्यामुळे आणि नफ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. इतर कारणांबरोबरच टपरवेअरला तरुण ग्राहकांना तितकेसे आकर्षित करता आले नाही. कंपनीचा हा शेवट मानला जात असला तरी २० व्या शतकाच्या इतिहासात त्याचे धागे विणलेले आहेत.

Story img Loader