पंजाबच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारने रविवारी शस्त्रांचं सार्वजनिक सादरीकरण आणि हिंसाचाराचे समर्थन करणारी गाणी यांच्या प्रदर्शनावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना मिळालेल्या आदेशानुसार पंजाबच्या गृह विभागाने राज्यात आतापर्यंत दिलेल्या सर्व बंदुक परवान्यांची तीन महिन्यांत पुन्हा सखोल तपासणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने पंजाब सरकारवर विरोधकांचा दबाव आहे. बंदूक संस्कृती आणि हिंसाचाराचा प्रचार करणारी गाणी पंजाबमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि समाजावर होणाऱ्या त्याच्या चुकीच्या प्रभावाबद्दल यापूर्वीही भाष्य करण्यात आलं होतं. अशाप्रकारे कारवाई करणारे आप सरकार पहिले नाही. पंजाबमधील हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या गाण्यांचा आणि त्यांना रोलखण्याचा आधीदेखील प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचविषयी आपण जाणून घेणार आहोत.

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हा त्याच्या हत्येनंतर जास्त चर्चेत आला. पण त्यानेही अशाप्रकारची भरपूर गाणी दिली आहे आणि त्यातून गन कल्चर, हिंसाचार याचं खुलेआम समर्थन केलं आहे. त्याच्या ‘आउटलॉ’ या गाण्यात तर तुम्हाला असे कित्येक संदर्भ सापडतील. त्याच्या ‘जी वॅगन’ या गाण्याचे शब्द होते : “जट्ट उस पिंड नू बीलॉन्ग करदा जिते बंदा मारके कसूर पुछदे…(याचा अर्थ असा आहे की जाट हा तो आहे जो एखाद्याला मारल्यावर त्याचा गुन्हा काय होता हे विचारतो).”

आणखी वाचा : खाणीतील ६४ कामगारांचा जीव वाचवणाऱ्या खऱ्या हिरोची भूमिका साकारणार अक्षय कुमार; ट्वीट करत दिली माहिती

मुसेवाला लोकप्रिय असताना, तो एकमेव असा पंजाबी कलाकार नव्हता ज्याने शस्त्र आणि हिंसाचार यांचं समर्थन केलं. पंजाबी गायिका एली मंगत हिच्यावरही नोव्हेंबर २०१९ मध्ये लुधियाना पोलिसांनी वाढदिवसाच्या पार्टीत कथित गोळीबारात भाग घेतल्याबद्दल आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. मोगा पोलिसांनी मार्च २०२० मध्ये पंजाबी गायक सिप्पी गिल विरुद्ध त्याच्या ‘गुंडागर्दी’ ट्रॅकमध्ये हिंसाचार आणि शस्त्रांना प्रोत्साहन दिल्याबद्दल तक्रार नोंदवली होती. मान यांच्या आधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारने अशा गाण्यांवर कारवाई केली होती.

२०२० मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विधानसभेत घोषणा केली होती की “राज्य सरकार गुंड आणि हिंसेला प्रोत्साहन देणारा कोणताही चित्रपट/गाणी रिलीज करू देणार नाही ज्यामुळे पंजाबची शांतता भंग होऊ शकते.” इतकंच नाही तर गँगस्टर सुखा कहलवानच्या जीवनावर आधारित ‘शूटर’ या चित्रपटावर सरकारने बंदी घातली होती आणि निर्मात्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८ मध्ये पंजाबचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबी गाण्यांमध्ये अश्लीलता, असभ्यता, ड्रग्स, हिंसेचं समर्थन नाही हे तपासण्यासाठी ‘पंजाब सब्यचार (संस्कृती) आयोग’ स्थापन करण्याची घोषणा केली होती.

आणखी वाचा : “मी ब्राह्मण आहे आणि…” अनुपम खेर यांनी दिलेला दिग्दर्शक महेश भट्ट यांना शाप; कारण…

केंद्रीय गृहमंत्रालयात काम केलेल्या पंजाब पोलिसांच्या सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की “पंजाबमधील अकाली दलाच्या १० वर्षांच्या राजवटीत मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने दिली गेले.” “नंतर जेव्हा अमरिंदर सिंग सत्तेवर आले तेव्हा परवाने वाटणे थोडे कमी झाले,” यावरुन आपल्याला अंदाज येईल की गेल्या काही वर्षात पंजाबच्या कलाकृतीत हिंसा, ड्रग्स, गन कल्चर कसं वाढीस लागलं. आता यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्याचं सरकार जी पावलं उचलत आहे ते स्तुत्य आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid government band on gun culture and violance promotion in punjabi songs avn