|| सचिन रोहेकर

जगातील आघाडीच्या तीन भांडवली बाजारांच्या पंक्तीत बसणारा आणि डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील जागतिक अग्रणी असा राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) लौकिक. या अत्यंत तंत्रज्ञानसधन आणि तंत्र-संवेदी संस्थेच्या माजी मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण मात्र बुवाबाजीत मग्न आणि योग्याच्या सल्ल्याने कारभार चालवत होत्या, अशी खिन्न करणारी बातमी येते. या अज्ञात योग्याचे हे गूढ उकलेल तेव्हा उकलेलच, पण हा बनाव तर नसावा, असाही संशय येतो. या शंकेचे पुष्टी करणारे दावे, प्रतिदावे आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘सेबी’चे निष्कर्ष जाणून घेणे म्हणूनच रंजक ठरते.

Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Kharadi, decapitated body, young woman, Mula-Mutha riverbed, police investigation, drone cameras, submarines, Chandannagar police station, missing persons,
शिर धडावेगळे केलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे अवयवांच्या शोधासाठी मोहीम, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मुठा नदीपात्रात शोध मोहिम
A youth who came to meet a friend was beaten up in front of Yerawada Jail Pune news
येरवडा कारागृहासमोर टोळक्याची दहशत; मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
Loksatta kutuhal Advantages and Disadvantages of the Future Humanoid
कुतूहल: भविष्यातील ह्यूमनॉइडचे फायदे आणि तोटे
The many benefits and risks of consuming water soaked with coriander seeds
रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे आणि तोटे
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

प्रकरणाची पाळेमुळे काय?

एका वर्षांपूर्वी (१० फेब्रुवारी २०२१) भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने तीन वर्षे चाललेल्या चौकशीअंती एक महत्त्वाचा आदेश दिला होता. ताज्या ‘योगी’ प्रकरणात दंड ठोठावण्यात आलेली चित्रा रामकृष्ण, रवी नारायण हीच नावे त्या आदेशात आरोपी म्हणून होती. ‘एनएसई’मधील सह-स्थान (को-लोकेशन) सुविधेद्वारे काही मोजक्या दलालांना व्यवहार प्रणालीत प्राधान्यक्रमाने (म्हणजे इतरांपेक्षा काही सहस्रांश सेकंद आधी) प्रवेश देणे आणि एक्सचेंजच्या डेटा फीडमध्ये लवकर लॉग-इन हे अर्थातच मोजक्या व्यापाऱ्यांना मोठय़ा नफ्याचे साधन ठरावे, यासाठीच केले गेल्याचे पुढे आले. ही ‘सह-स्थान’ सुविधा ही ‘एनएसईसाठी शुल्काधारित उत्पन्नाचा स्रोत’ म्हणून सुरू असल्याचे भासविले गेले. प्रत्यक्षात हा घोटाळा ‘एनएसई’ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून पुरत्या संगनमताने काही वर्षांपासून सुरू असल्याचा निष्कर्ष ‘सेबी’ने काढला. जानेवारी २०१५  मध्ये, एका जागल्याने ‘सेबी’ला पत्र लिहून या ‘अल्गो घोटाळय़ा’चा पर्दापाश केला होता. अल्गो किंवा अल्गोरिदमिक ट्रेडिंग हे सूक्ष्मतम नफ्याच्या संधी शोधण्यासाठी तयार केलेली संगणकीय आज्ञावली असते. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व मशीन लर्निगचा वापर करून मिलिसेकंदात (एका सेकंदाचा १००० वा भाग) किंवा नॅनो सेकंदात अत्यंत मोठय़ा उलाढालीचे व्यवहार पार पाडले जातात. असे व्यवहार कार्यक्षमरीत्या पार पाडण्यासाठी दलालांचे सव्‍‌र्हर हे एक्सचेंज म्हणजेच एनएसईच्या समीप असणे महत्त्वाचे ठरते. त्यातूनच निवडकांवर मर्जीच्या ‘सह-स्थान (को-लोकेशन)’ सुविधेचा जन्म झाला.

 चित्रा रामकृष्ण यांची अन्य कारकीर्द कशी आहे?

सह-स्थान सुविधेद्वारे निवडकांना देऊ केलेल्या हाय-फ्रीक्वेन्सी ट्रेडिंगच्या प्राधान्यक्रमाबद्दल ३० एप्रिल २०१९ रोजी दिलेल्या आदेशात सेबीने एनएसईला फटकारताना, या कथित सुविधेतून शुल्करूपात गोळा केलेल्या ६२४.८९ कोटी रुपये रकमेवर जप्ती आणि सहा महिन्यांसाठी बाजारात निधी उभारणीसाठी प्रवेश करण्याला एनएसईवर निर्बंध आणले. हा ‘अल्गो घोटाळा’ ज्यांच्या देखरेखीत शिजला, त्या रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांनी त्या विशिष्ट कालावधीत मिळविलेल्या वेतनातील २५ टक्के रक्कम त्यांना परत करण्यास सांगण्यात आले. शिवाय पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोघांना बाजारातून हद्दपार करण्यात आले. अर्थात त्यापूर्वीच, म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये रामकृष्ण यांनी एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा, नियोजित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या खूप अगोदर राजीनामा दिला होता. तर एनएसईच्या उपाध्यक्षपदाचा नारायण यांनी जून २०१७ मध्ये राजीनामा दिला होता.

अकस्मात राजीनाम्याचे गूढ आणि ‘सुब्बू’चा पैलू

ज्या संस्थेत दीर्घकाळ काम केले आणि उच्चपद मिळविले तिच्याच बदनामीचे कारण पुढे रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण हे दोघे बनले. १ एप्रिल २०१३ रोजी चित्रा रामकृष्ण यांना एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून पदोन्नती मिळाली. पदग्रहणानंतर त्यांनी घेतलेला पहिला निर्णय म्हणजे सुब्रमणियन आनंद (सुब्बू) यांची संचालक मंडळाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. सुब्बूच्या अधिकारकक्षा हळूहळू रुंदावत गेल्या. त्यामागील कारणे काय हे चित्राच सांगू शकतील. चित्रा यांचे वार्षिक वेतनमान ७.८७ कोटींच्या घरातील, तर दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे वार्षिक ४ कोटी रुपयांचा मेहनताना सुब्बू यांनी मिळविल्याचे एनएसईचा २०१४-१५ सालचा वार्षिक अहवाल सांगतो. एनएसईच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर केवळ चित्रा, रवी व अध्यक्ष यांची कार्यालये होती. रवी यांची दिल्लीत बदली झाली, ते कार्यालय नवीन समूह कामकाज अधिकारी (जीओओ) सुब्बू यांच्याकडे आले आणि रवी पायउतार झाल्यावर त्यांचे अधिकृत आलिशान निवासस्थानही सुब्बू यांनी मिळविले. त्यांचा सल्ला घेतल्याविना चित्रा यांचे पानही हलत नसे, असाच कार्यालयात सूर होता. जागल्याने दिलेल्या वर्दीतून सेबीची चौकशी सुरू झाली. नियम व पात्रतेला डावलून झालेल्या सुब्बू यांच्या नियुक्ती व बढतीचा छडा लावला गेला. ऑक्टोबर २०१६ अखेरीस सुब्बूप्रकरणी एनएसईच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय झाला. त्यानंतर काही दिवसांतच, म्हणजे २ डिसेंब२ २०१६ रोजी चित्रा यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

बाहेरच्या त्रयस्थाशी देवघेव आणि सल्लामसलत?

 चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयात अज्ञात योग्याकडून कारभाराचे धडे घेतल्याची ताजी कबुली आता पुढे आली आहे. पण फेब्रुवारी २०२० मध्ये सेबीने सुब्बू यांची नियुक्ती व पदोन्नतीबद्दल कारणे दाखवा नोटीस एनएसईला बजावली होती. चित्रा रामकृष्ण या प्रमुखपदी असताना त्या एनएसईशी संबंधित अंतर्गत माहिती बाहेरच्या त्रयस्थाला नियमित देत असल्याचे नोटिशीत नमूद होते. बाहेरील व्यक्तीशी ई-मेलवरून चर्चा होत असल्याचे आढळल्याचे नमूद केले गेले होते. ही व्यक्ती कोण यावरील पडदा दूर सरण्यापूर्वीच, नवीन व्यवस्थापनाने प्रकरण सामोपचाराने संपवून टाकले. पुढे ‘ई-वाय’ने केलेल्या न्यायवैद्यक तपासात निष्कर्ष काढला की, त्रयस्थ व्यक्तीशी ज्या ई-मेलद्वारे संपर्क होत असे, तो  rigyajursama@outlook. comहा ईमेल आयडी वापरणारी व्यक्ती ही अन्य कोणी नाही तर सुब्रमणियन आनंद (सुब्बू) होते. अर्थात ‘योगी’ हे स्वत: सुब्बूच होते.

 सेबीचा निष्कर्ष ‘योगी’बद्दल काय सांगतो?

अशा देवघेवीमुळे एक्सचेंजचे कोणत्याही प्रकारे नुकसान झालेले नाही. शिवाय त्रयस्थानेही कोणत्याही वैयक्तिक किंवा आर्थिक फायद्यासाठी गोपनीय माहिती वापरली नाही. त्यामुळे सेबीचे पूर्णवेळ सदस्य अनंत बारुआ यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले की, ई-वायचा अहवालदेखील हेच सूचित करतो की, ती अज्ञात व्यक्ती ही सुब्बू यांच्या जवळची होती. परंतु ती व्यक्ती स्वत: सुब्बूच असल्याचा निर्णायक निष्कर्ष देता येत नाही.

sachin.rohekar@expressindia.com