– हृषिकेश देशपांडे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले, त्याच दिवशी उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे चित्र स्पष्ट झाले. भाजपने यामध्ये दणदणीत विजय मिळवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्थान या यशाने भक्कम झाले आहे. उत्तर प्रदेशसारख्या देशातील मोठ्या राज्यात पंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत आता भाजपची सत्ता आहे. त्यामुळे योगींचे नेतृत्त्व उपयोगी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. आम आदमी पक्षाने केलेली कामगिरी औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

kenya cheetah india marathi news
विश्लेषण: नामिबिया, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता केनियातून भारतात येणार चित्ते! गुजरातमध्ये चित्ता प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता किती?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा
Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल
number of people coming to Congress from other parties has increased
केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत, पण नागपुरात ‘इनकमिंग’ काँग्रेसमध्ये!
Opposition party aggressive in Uttar Pradesh over IIT Banaras Hindu University
बलात्कारातील आरोपींच्या सुटकेने गोंधळ; आयआयटीबनारस हिंदू विश्वविद्यालयातील प्रकारावरून उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष आक्रमक
karan rajkaran Kolhapur north assembly
कारण राजकारण: ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये सर्वच पक्ष चेहऱ्याच्या शोधात
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ

सप, बसपचे अपयश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक एक चाचणी परीक्षाच होती. मात्र राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने भाजपला निम्म्या जागांवर थेट लढत दिली. महापौरपदाच्या निवडणुकीत चार ठिकाणी बहुजन समाज पक्ष दुसऱ्या स्थानावर राहीला. काँग्रेसची कामगिरी आणखी निराशाजनक झाली. उत्तर प्रदेशात महापौर थेट जनतेतून निवडला जातो. या निवडणूक झालेल्या सर्व १७ ठिकाणी भाजपचेचे महापौर निवडून आले. प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्या दृष्टीने या राज्याचे महत्त्व अधोरेखीत होते. मेरठमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने घेतलेली मते समाजवादी पक्षासाठी चिंतेची बाब आहे. महापौर निवडीत राजधानी लखनौसह, वाराणसी, अयोध्या, गोरखपूर, प्रयागराज येथे समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानी राहीला. मेरठ तसेच अलिगढमध्ये यापूर्वी बहुजन समाज पक्षाचा महापौर होता. यंदा त्यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्ष वगळता इतरांची महापौरपदाच्या लढतीत अनामत रक्कम जप्त झाले. येथे भाजपने सलग चौथ्यांदा विजयी मिळवला. मेरठच्या महापौरपद निवडीत एमआयएम दुसऱ्या स्थानी राहीले.

भाजपला मुस्लिम बहुल भागात यश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १३ दिवसांत ५० सभा घेतल्या. पसमंदा मुस्लिमांना आकर्षित करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे. भाजपने ३९५ मुस्लिम उमेदवार दिले होते. त्यापैकी मुस्लिम बहुल भागात भाजपचे पाच मुस्लिम उमेदवार नगरपंचायतीचे अध्यक्ष झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडीत १९९ पैकी भाजपला ८७, समाजवादी पक्षाला ३५, बहुजन समाज पक्षाला १५, काँग्रेसला चार तसेच अपक्षांनी ४१ ठिकाणी नगराध्यपदे जिंकली. इतर १४ ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे विजयी झाले आहेत. नगरसेवकही सर्वाधिक भाजपचे आहेत. नगरपंचायतींमध्येही हाच सिलसिला सुरु आहे.

आम आदमी पक्षाचा प्रवेश

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या रामपूरमध्ये नगराध्यक्षपदी आम आदमी पक्षाकडुन रिंगणात उतरलेल्या सना खानम यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या मसरत मुजीब यांचा पराभव केला. येथे समाजवादी पक्षाच्या फतिमा जबीन तिसऱ्या स्थानी राहील्या. शिक्षिका असलेल्या सना यांचे पती ममून शहा हे आपचे पदाधिकारी आहेत. पूर्वी ते काँग्रेस पक्षात होते. रामपूर शहरात ते पूर्वीपासून कार्यरत आहेत. गेली वीस वर्षे येथे आझम खान यांचे प्रभुत्व आहे. मात्र यंदा या बालेकिल्ल्यात आपने प्रवेश केला.

हेही वाचा : उत्तर प्रदेशात भाजपची सरशी!, सर्व १७ पालिकांत महापौरपदी विजय

विरोधकांमध्ये एकीचा अभाव

विरोधी पक्षांमध्ये एकी नव्हती त्याचाही लाभ भाजपला लाभ झाला. मुलायमसिंह यांच्यानंतर अखिलेश यादव यांच्याकडे समाजवादी पक्षाची धुरा आली असली तरी, अद्याप त्यांना सूर गवसलेला नाही हेच निकालांवरून दिसते. बहुजन समाज पक्षाने मतदान यंत्रांकडे बोट दाखवत, मतपत्रिकांवर मतदान झाले असते तर, निकाल वेगळा असता असा सूर लावला आहे. एकूणच लोकसभेपाठोपाठ विधानसभा आणि आता स्थानिक ठिकाणी भाजपची सत्ता, म्हणजे राज्यात भाजपचे तिहेरी इंजिन आहे. या निकालानंतर योगींचे नेतृत्त्व अधिक बळकट झाले आहे. पक्षाला विजय मिळवून देणारा चेहरा अशी त्यांची ओळख आहे.