– अनिकेत साठे

तेजस लढाऊ विमानाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी (एमके-२) अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिकच्या सहकार्याने जेट इंजिन विकसित करण्याचे निश्चित झाल्यामुळे याबद्दलची अनिश्चितता अखेर दूर झाली. पण, निधी वाटपातील विलंबामुळे बहुप्रतीक्षित नव्या लढाऊ विमानाचे प्रारूप अमेरिकन इंजिनसह पुढील दोन-अडीच वर्षात उड्डाणासाठी सज्ज होण्याचा अंदाज आहे. हवाई दल तेजसच्या किती तुकड्या (स्क्वॉड्रन) स्थापणार, याविषयी संभ्रम आहे. निर्यातीला चालना देऊ शकणारी नवी आवृत्ती पाचव्या पिढीतील विमान निर्मिती कार्यक्रमाला दिशा देणार आहे.

Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Aviation Turbine Fuel price
Aviation Turbine Fuel: विमान इंधन आणि वाणिज्य वापराचे सिलिंडर महाग
pune Twitter user Adam Alanja 646 claimed there was bomb on Vistara flight UK 991
दिल्ली ते पुणे विमानात बॉम्ब असल्याच्या, अफवेने पुणे विमानतळवर पुन्हा खळबळ
tejas mk1a
विश्लेषण: हवाई दलाची चिंता का वाढतेय?
Vajra shot india made
शत्रूच्या ड्रोन्सचा नायनाट करायला ‘वज्र गन’ सज्ज; काय आहे याचं महत्त्व व वैशिष्ट्य?
census 2021
अन्वयार्थ : जनगणनेला मुहूर्त मिळणार?

विलंबाची कारणे काय ?

भारतीय हवाई दलाने तेजस एमके – २ या विमानाच्या रचनेला हिरवा कंदील दाखविल्यानंतर नऊ महिन्यांनी म्हणजे गेल्या वर्षी केंद्रीय सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने या प्रकल्पास साडेसहा हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. तो अद्याप वितरण प्रक्रियेत आहे. त्यामुळे विमानाचे प्रारूप, उड्डाण चाचण्या, प्रमाणीकरण आदींवर परिणाम झाला. त्याची परिणती वर्षभराच्या विलंबात होण्याचा अंदाज आहे. तेजसच्या नव्या आवृत्तीसाठी स्वदेशी रचनेच्या इंजिनवर भर दिल्याने हा प्रकल्प रेंगाळला होता. अनिश्चितता निर्माण झाली होती. इंजिन निर्मितीसाठी अमेरिकेशी सहकार्य होण्यापूर्वी भारताचे फ्रान्सकडे लक्ष होते. अखेरीस हा विषय मार्गी लागल्याने आता २०२५ पर्यंत अमेरिकन इंजिनसह तेजसची नवी आवृत्ती भरारी घेईल, असा विश्वास वैमानिकी विकास प्रतिष्ठानच्या विमानशास्त्र व शस्त्र प्रणालीचे संचालक प्रभुल्ला चंद्रन व्ही. के. यांना वाटतो.

मागणीबाबत अनिश्चितता कशी?

केंद्र सरकारने तेजसच्या प्रकल्पाची जबाबदारी वैमानिकी विकास प्रतिष्ठानकडे सोपविलेली आहे. या संस्थेतर्फे अलीकडेच आयोजित इलेक्ट्राॅनिक उपकरणीय तंत्रज्ञान व दृश्य पटल प्रणाली परिषदेत नव्या आवृत्तीच्या २०० तेजस विमानांची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, सरकारी पातळीवर अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. हवाई दलाच्या भूमिकेने तेजसच्या नव्या आवृत्तीच्या मागणीबाबत अनिश्चितता आहे. काही वर्षांपूर्वी हवाई दल तेजसच्या १२ तुकड्या म्हणजे (स्क्वॉड्रन ) स्थापण्याच्या विचारात होते. म्हणजे २०० हून अधिक विमानांची गरज भासणार होती. उद्योग जगतासाठी ती उत्साहवर्धक बाब ठरली. पुरेशा मागणीने उत्पादनाचे वेळापत्रक आखून वेळेत पुरवठ्याचे नियोजन शक्य होते. मात्र, अलीकडेच एरो इंडिया २०२३ कार्यक्रमात हवाई दलाकडून तेजसच्या सहा तुकड्यांचा विचार होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे विमानांची मागणी निम्म्याने कमी होण्याची साशंकता व्यक्त होत आहे.

मागणी घटल्यास परिणाम काय?

स्वदेशी लढाऊ विमान बांधणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डीआरडीओची वैमानिकी विकास प्रतिष्ठान प्रयोगशाळा, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील तब्बल ३०० संस्था कार्यरत आहेत. विमानांच्या मागणीत घट झाल्यास पुरवठादारांच्या उत्साहावर विरजण पडून उत्पादन प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सरकारने त्रोटक स्वरूपात नोंदविलेली मागणीही उत्पादनावर प्रभाव टाकते. एमके-१ बांधणीतून तोच धडा मिळाला. एचएएल लढाऊ विमानाच्या काही सामग्रीसाठी परदेशी पुरवठादारांवर अवलंबून आहे. अल्प मागणीला आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक पुरवठादार सेवा देताना गुंतवणूक करावी की नाही, या संभ्रमात असतात. पुरेशी मागणी स्थानिक पुरवठादारांना बळ देणारी ठरते.

सध्याचे नियोजन कसे?

तेजस लढाऊ विमान हवाई दलातील मिग २९, जॅग्वार आणि मिराज – २००० यांची जागा घेणार आहे. सरकारने एचएएलकडे यापूर्वी ८३ विमानांची मागणी नोंदविली आहे. सध्या तेजस एम के- १ च्या दोन उत्पादन साखळ्या असून एम के- २ च्या उत्पादनासाठी तीन साखळ्या नियोजित आहेत. जेणेकरून वर्षाकाठी १६ विमान उत्पादनाची क्षमता २४ वर जाईल.

हेही वाचा : लढाऊ तेजस विमान निर्मितीला वेग; उत्पादन क्षमता वर्षाला १६ ते २४ विमानांपर्यंत विस्तारणार, एचएएल नाशिक प्रकल्पातही तेजसची बांधणी

अधिकतम उत्पादनाची गरज का?

तेजस एमके -१ आणि एमके-१ ए (अल्फा) च्या तुलनेत एमके- २ हे नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे विमान आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्राची उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. वेग, अति उंचावरील उड्डाणात वैमानिकाला प्राणवायू देणाऱ्या (ओबीओजीएस) व्यवस्थेची क्षमताही अधिक आहे. खास प्रकारचे बॉम्ब ते वाहून नेऊ शकेल. आधीच्या दोन्ही आवृत्तीत ती क्षमता नव्हती. दृश्य टप्प्याच्या पलीकडे मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे तेजस एमके-२ भविष्यातील युद्धात सरस कामगिरी करू शकेल. या वैशिष्ट्यांमुळेच ४.५ व्या पिढीतील तेजसमध्ये १६ देशांनी स्वारस्य दाखविले. महत्त्वाचे म्हणजे तेजसमध्ये सध्या वापरली जाणारी सुमारे ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. यातून परकीय अवलंबित्व कमी करता येईल. निर्यातीच्या संधी साधण्यासाठी अधिकतम उत्पादनाचा विचार करावा लागणार आहे. तेजसची ही नवी आवृत्ती पाचव्या पिढीतील प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए) निर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात महत्वाची ठरेल. कारण, या विमानासाठी निर्मिलेली बहुतांश सामग्री व उपकरणे पाचव्या पिढीतील एएमसीएशी साध्यर्म साधणारी आहेत. पाचव्या पिढीतील विमान निर्मिती कार्यक्रम यशस्वी करण्यात तेजसचा हातभार लागणार आहे.