– संदीप नलावडे

ब्रिटनमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. राजधानी लंडनसह मध्य, उत्तर आणि ईशान्य इंग्लंडच्या भागांत तीव्र उष्णतेमुळे ब्रिटिश हवामान विभागाने खबरदारीचा इशारा दिला आहे. देशभरात अनेक ठिकाणी तापमान ३० सेल्सिअसच्या पुढे गेले असून शाळा, महाविद्यालये आणि काही कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीही जून-जुलैमध्ये ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट आली होती. बदलते हवामान आणि वाढत्या तापमानवाढीचा हा परिणाम असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता
temperature drops in vidarbha region
थंडीचा कहर, उपराजधानी गारठली; किमान तापमानात वेगाने घसरण
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट

ब्रिटनमध्ये तापमानाची स्थिती सध्या काय आहे?

ब्रिटन हा समशीतोष्ण कटिबंधातील देश असून या देशात जून महिन्यात सरासरी तापमान २० अंश सेल्सिअस असते. किमान तापमान तर ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये जून-जुलै महिन्यांत तापमानात वाढ होत असून पारा २५ अंश सेल्सिअसच्याही वर जात आहे. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांत ब्रिटनमध्ये उन्हाळा असतो. मात्र पूर्वी या दिवसांतही तापमान २० ते २२ अंशाच्या वर जात नव्हते. मात्र यंदा उष्णतेची लाट आली असून अनेक शहरांत सरासरी तापमान २५ अंशापर्यंत गेले आहे, तर काही ठिकाणी ३० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. वेल्समधील पोर्थमाडोग येथे तर १३ जून रोजी ३०.७० सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. १० जून रोजी सरे येथील चेर्टसे वॉटर वर्क्स येथे ब्रिटनमधील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ३२.२ सेल्सिअस असे उच्चांकी नोंदवले गेले. राजधानी लंडनमध्ये तर गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. ब्रिटिश हवामान कार्यालयाने अधिक तापमानवाढीला ‘उष्णतेची लाट’ असे संबोधले असून अतिसावधानतेचा इशारा दिला आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

उष्णतेची लाट म्हणजेच हीटवेव्हची व्याख्या प्रत्येक देशांतील भौगोलिक स्थानानुसार ठरत असते. भारतामध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सातत्याने राहिले तर उष्णतेची लाट असे म्हटले जाते. उष्णतेची लाट सामान्यत: परिसरातील नेहमीच्या हवामानाच्या सापेक्ष आणि हंगामातील सामान्य तापमानाच्या सापेक्ष मोजली जाते. उष्ण हवामानातील लोक सामान्य मानतात ते तापमान जर त्या क्षेत्रासाठी सामान्य हवामानाच्या नमुन्याच्या बाहेर असेल तर त्याला थंड भागात उष्णतेची लाट म्हटले जाऊ शकते. प्रत्येक देशानुसार उष्णतेच्या लाटेची व्याख्या बदलू शकते. डेन्मार्कमध्ये सलग तीन दिवस देशातील पन्नास टक्क्यांहून अधिक सरासरी कमाल तापमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर उष्णतेची लाट घोषित केले जाते. ब्रिटनमध्ये बहुतांश भागात किमान तीन दिवस २५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असेल तर उष्णतेची लाट निर्माण होते. अमेरिकेत प्रदेशानुसार व्याख्याही बदलते. किमान दोन किंवा अधिक दिवस अति उष्ण हवामान असेल तर उष्णतेची लाट जाहीर करतात.

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट येण्याची कारणे काय?

जगभरातील सर्वसामान्य तापमान हे गेल्या काही दशकांमध्ये एक अंशाने वाढले आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. हवामान अभ्यासकांच्या मते जगभरात वाढलेले तापमान हे उष्णतेच्या लाटेचे मुख्य कारण आहे. गेल्या वर्षी ब्रिटनसह युरोपमधील अनेक देशांत उष्णतेची लाट आली होती. यंदाही तीच परिस्थिती आहे. पोर्तुगाल, स्पेन, उत्तर आफ्रिकेतून येणारे उष्ण वारे प्रचंड दाबासह युरोपच्या उत्तरेकडील भागात येत असल्याचे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. उष्णतेमुळे तापमान वाढ होऊन आर्द्रता वाढत असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. मानव-प्रेरित हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जागतिक तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जोपर्यंत जगभरातील सरकारे उत्सर्जनात मोठी कपात करत नाहीत, तोपर्यंत तापमान वाढतच राहणार आहे, असा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे.

उष्णतेच्या लाटांचा ब्रिटनवर काय परिणाम होऊ शकतो?

वाढत्या उष्णतेमुळे बर्फ वितळून नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या पश्चिम भागांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला होता. लंडनच्या गोल्डर्स ग्रीन भागात मुसळधार पावसामुळे पूर आला होता. उष्णतेच्या लाटांचा हा परिणाम असल्याचे हवामान विभागाने सांगितले. गेल्या आठवड्यातील उच्च तापमानामुळे ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणा आणि हवामान विभागाने ‘अँबर हीट-हेल्थ अलर्ट’ जारी केला. याचा अर्थ उष्ण हवामानामुळे सुरक्षित गटांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या कालावधी आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या, श्वसन, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग असलेल्यांना धोका वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जंगलात वनवे पेटण्याचे आणि नद्यांना पूर येण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याशिवाय रस्ते, रेल्वे व विमान वाहतुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षी लंडनजवळील ल्यूटॉन विमानतळावरील धावपट्टीचा काही भाग उष्णतेमुळे खराब झाला होता, त्यामुळे या विमानतळावरील विमानसेवा काही काळ बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे रूळ हे हवेच्या तुलनेत २० अंश अधिक गरम असतात. म्हणजेच तापमान वाढले तर रुळांना धोका पोहचू शकतो. लंडनमध्ये ट्रेन २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. उष्णतेच्या लाटेत नळ कोरडे पडल्याने आग्नेय इंग्लंडच्या काही भागांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या. केवळ पाण्याच्या समस्येमुळे शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत.

हेही वाचा : विश्लेषण : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडला कशी गेली ? काय आहे या शस्त्रांचा इतिहास… 

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार?

ब्रिटनच्या हवामान कार्यालयाचे प्रवक्ते स्टीफन डिक्सन यांनी ब्रिटनमधील उष्णतेच्या लाटेबाबत माहिती दिली. डिक्सन म्हणाले की या आठवड्यातील उर्वरित कालावधी वर्षाच्या सरासरीपेक्षा जास्त उष्ण असेल. परंतु अति उष्णतेचे प्रमाणे थोडे कमी होऊ शकते. याचा अर्थ उष्णतेची लाट जास्त काळ टिकणार नाही. ‘‘येत्या काही दिवसांत उष्णता थोडी कमी होणार आहे. लंडन कदाचित उष्णतेच्या लाटेचे निकष पूर्ण करणार नाही. मात्र या आठवड्या कोरडे आणि सूर्यप्रकाश असलेले हवामान असणार आहे. त्यामुळे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील,’’ असे डिक्सन म्हणाले.

Story img Loader