– अमोल परांजपे

अलीकडेच जर्मनीमध्ये एका तुलनेने छोट्या पक्षाने एका छोट्याशा शहरामधील सत्ता ताब्यात घेतली. वरवर पाहता ही घटना काही फारशी दखल घेण्यासारखी नाही. मात्र या पक्षाच्या अतिउजव्या विचारसरणीला वाढत असलेला पाठिंबा ही आगामी काळात चिंतेची बाब ठरू शकते. युरोपातील अनेक देशांमध्ये कडव्या राष्ट्रवादी विचारांचे पक्ष असेच वाढीस लागले आणि कालांतराने सत्तेतही आले. जर्मनीचे युरोपमधील महत्त्वाचे स्थान आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या देशाचा इतिहास या पार्श्वभूमीवर ‘एएफडी’ या पक्षाच्या विजयाकडे बघावे लागेल.

Jugeshinder Singh, CFO of Adani Enterprises.
Hindenburg : “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, हिंडनबर्ग बंद करण्याची घोषणा; आदाणी समूहाचा टोला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान

‘एएफडी’ पक्षाच्या स्थापनेचा इतिहास काय?

‘अल्टरनेटिव्ह फ्यूअर डॉईचलँड’ (अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी) या पक्षाची स्थापना अगदी अलीकडे, २०१३ साली झाली. अलेक्झांडर गौलँड, बर्नार्ड ल्यूक आणि कोर्नाड ॲडम या तिघांनी सप्टेंबर २०१२मध्ये ‘इलेक्टोरल अल्टरनेटिव्ह २०१३’ हा पक्ष स्थापन केला. आपल्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये या पक्षाने ‘युरोझोन’ (युरो हे चलन वापरणारे देश) संकल्पनेला तीव्र विरोध केला, तसेच छोट्या दक्षिण युरोपीय देशांना वारंवार आर्थिक मदतीच्या जर्मन सरकारच्या धोरणांवर टीका केली. ‘लोअर सॅक्सनी’ या राज्यात काही छोट्या पक्षांसह आघाडीमध्ये लढलेल्या इलेक्टोरल अल्टरनेटिव्हला अवघी १ टक्के मते मिळाली. २०१३मध्ये पक्षाचे ‘एएफडी’ असे नामकरण करून सार्वत्रिक निवडणुकीतही या गटाने नशीब अजमावले. या निवडणुकीत एएफडीला ४.७ टक्के मते मिळाली. ‘बुंडेस्टॅग’ या जर्मनीच्या केंद्रीय कायदेमंडळात जाण्यासाठी आवश्यक ५ टक्के मतांचा टप्पा मात्र त्यांना गाठता आला नाही. मात्र त्यानंतर चारच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत, २०१७साली एएफडीने १२.६ टक्के मतांसह बुंडेस्टॅगमध्ये ९७ जागा जिंकल्या. २०२१च्या सार्वत्रिक निवडणुकीत एएफडीची टक्केवारी १० टक्क्यांवर आली असली तरी नुकत्याच झालेल्या एका स्थानिक निवडणुकीत या पक्षाने प्रथमच सत्ता हस्तगत केली आहे.

‘एएफडी’चे ताजे मोठे यश कोणते?

स्थापनेच्या वेळी काहीशी मवाळ धोरणे असलेला हा पक्ष कालांतराने अतिउजवा झाला. जर्मनीमध्ये, किंबहुना संपूर्ण युरोपमध्येच सीरिया, लेबनॉन आदी देशांतील स्थलांतरितांना मुक्तद्वार देण्यास या पक्षाचा विरोध आहे. रशियावरील निर्बंध हटवावे, अशी मागणीही या पक्षाने केली आहे. पूर्वाश्रमीच्या पूर्व जर्मनीमधील ग्रामीण भागांमध्ये या पक्षाने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. अलीकडेच ‘थुरिंगिया’ या राज्यामध्ये सोशल डेमोक्रॅट्सचा पराभव करून एएफडीने सत्ता हस्तगत केली. आता मध्यममार्गी उजवा पक्ष असलेल्या ख्रिश्चन डेमोक्रॅट्स पक्षापेक्षा एएफडी मतांच्या टक्केवारीत काहीसाच मागे आहे आणि पूर्व जर्मनीमध्ये तर या पक्षाने ख्रिश्चन डेमोक्रॅट्सना मागे सारले आहे. पक्षाच्या अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षाला मिळत असलेल्या या यशामुळे जर्मनी आणि युरोपमधील लोकशाहीवादी सतर्क झाले नाहीत, तरच नवल.

एएफडीच्या प्रचाराचे तंत्र कसे आहे?

स्थानिक पातळीवरील पक्ष असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भूमिका मांडणे, ही या पक्षाची खासियत आहे. त्यांची संपर्क यंत्रणा तगडी आहे. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून हा पक्ष आपली ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचवतो. उदाहरणार्थ, थुरिंगियातील प्रचारादरम्यान विरोधकांनी पक्षाचा उल्लेख ‘अतिरेकी’ असा करताच ‘विस्थापितांच्या संख्येवर मर्यादा आणावी असे म्हणणे अतिरेक आहे का?’, ‘अनधिकृत विस्थापितांना परत पाठविण्याची मागणी अतिरेकी आहे का?’, ‘नागरिकत्वासाठी अटी असाव्यात, ही मागणी अतिरेकी आहे का?’, यावर ओपिनियन पोल घेतले गेले आणि त्याद्वारे आपल्या पक्षाची भूमिका मांडतानाच जनतेचा कौलही अजमावला. याच्या जोरावर एका राज्यात प्रथमच सत्ता घेतल्यानंतर एएफडीचा आत्मविश्वास आता दुणावला असून लवकरच आपण केंद्रीय सत्तासंघर्षात महत्त्वाची भूमिका बजावू, असा विश्वास या पक्षाच्या नेत्यांना वाटतो आहे.

हेही वाचा : जर्मनीची मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा – एकिम फॅबिग

एएफडीचे यश ही चिंतेची बाब का?

लिपझिक विद्यापीठातील तज्ज्ञांनी अलीकडेच जर्मनीच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये (जेथे एएफडीचा अधिक प्रभाव आहे) केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष काहीसे धक्कादायक आहेत. एएफडीचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाठीराख्यांचा विस्थापितांना जर्मनीचे नागरिकत्व देण्यास तीव्र विरोध आहे. अन्य उजव्या पक्षांच्या समर्थकांमध्ये हे प्रमाण २० टक्के आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत एएफडीचे पाठीराखे चौपटीने हुकूमशाहीसाठी अनुकूल आहेत आणि दहा पट अधिक मतदार हे नाझी अत्याचार ही अतिशयोक्ती असल्याचे मानतात. सर्वसामान्य मतदार मात्र या पक्षाचा धोका ओळखून आहेत. अलीकडेच झालेल्या देशव्यापी सर्वेक्षणात ६५ टक्के नागरिकांना हा पक्ष लोकशाहीला धोका वाटतो. असे असले तरी युरोपमध्ये वाढत असलेले राष्ट्रवादी उजव्यांचे प्राबल्य एएफडीच्या यशाने पुन्हा अधोरेखित झाले आहे. हंगेरीमध्ये अनेक वर्षांपासून व्हिक्टर ओर्बान यांची निरंकुश सत्ता आहे. इटलीमध्ये फॅसिस्ट पक्षाशी नाते सांगणाऱ्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ पक्षाच्या नेत्या जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान आहेत. ऑस्ट्रिया, स्वीडनमध्ये अतिउजवे सत्तेच्या जवळ पोहोचले आहेत. फ्रान्समध्ये मारीन ल पेन यांच्यासारख्या अतिउजव्या नेत्या लोकप्रिय आहे. आता जर्मनीही त्याच मार्गाने जात असून तो पुन्हा नाझीवादी विचारसरणीमध्ये गुरफटून जाण्याची भीती आहे.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader