– अनिल कांबळे

देशात दिवसेंदिवस बालगुन्हेगारी वाढत आहे. महाराष्ट्राचा यात देशात दुसरा क्रमांक लागतो. बालगुन्हेगारी रोखण्याचे पोलीस आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. अन्यथा भविष्यात ही समस्या मोठे रूप धारण करू शकते. महाराष्ट्रातील परिस्थितीचा घेतलेला आढावा…

Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
pune bjp fight
पुणे: प्रचार फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, संगमवाडीतील घटना
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी

बालगुन्हेगार कोण?

वयाच्या १८ वर्षांखालील मुलाने केलेले गुन्हेगारी कृत्य बालगुन्हेगारीत मोडते. मात्र, कायद्याच्या भाषेत बालगुन्हेगाराला विधिसंघर्षग्रस्त बालक असे संबोधले जाते. त्याला कायद्यानुसार अटक करता येत नाही. त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात येते.

बालगुन्हेगारीत महाराष्ट्र कितव्या स्थानावर?

बालगुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या (४,५५४ गुन्हे) स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मध्य प्रदेश ( ५६८४ गुन्हे) तर तिसऱ्या स्थानावर राजस्थानचा (२७५७ गुन्हे) क्रमांक लागतो. सध्या राज्यात ४ हजार ५५४ बालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईनंतर सर्वाधिक बालगुन्हेगार नागपूर शहरात आहेत. राज्यात सर्वाधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद त्यांच्या नावावर आहे. ही संख्या देशभरात ५ हजार ८९९ इतकी आहे. चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक गुन्हे दिल्लीत नोंदवले गेले आहेत.

महाराष्ट्रात कोणत्या वयोगटातील मुलाचा सर्वाधिक सहभाग?

१२ ते १६ या वयोगटातील २७३ मुले हत्याकांडासारख्या गुन्ह्यात तर ३५९ मुलांवर खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. ३४० मुलांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारीकडे वळण्याची कारणे कोणती?

बालगुन्हेगारीसाठी कौटुंबिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरते. त्यांची संख्या सामान्यपणे झोपडपट्टीबहुल भागात अधिक आढळून येते. कौटुंबिक कलह, वडिलांचे व्यसन किंवा घरात नेहमी होणारी भांडणे आणि तत्सम कारणांमुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यातून मुले गुन्हेगारीकडे वळतात. शिवाय झटपट पैसा मिळवण्याचा प्रयत्नही त्यांना या वाटेवर नेतो. सुरुवातील छोट्यामोठ्या चोऱ्या-घरफोड्या करणारी मुले नंतर मोठ्या गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी होतात, पौगंडावस्थेतील मुलांमध्ये शारीरिक आकर्षण आणि प्रेयसीवर पैसे उधळण्यासाठीही गुन्हेगारी कृत्य करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याचे परिणाम कोणते?

मुले गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय झाल्यावर त्यांच्यावर बालगुन्हेगार म्हणून शिक्का लागतो. त्यानंतर ते सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यावर त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगारही अशा प्रवृत्तीच्या मुलांना हेरत असतात व वेळप्रसंगी त्यांची मोठ्या गुन्ह्यांमध्ये मदतही घेत असल्याचे अनेक घटनांमधील पोलीस तपासात आढळून आले आहे.

बालगुन्हेगारीसाठी व्यसनाधीनता कारण आहे काय?

पोलिसांच्या नोंदीवर असलेले बहुतांश बालगुन्हेगार व्यसनाधीन आहेत. चोरी-लुटमारीतून आलेल्या पैशातून बालगुन्हेगारांना दारू, हुक्का, अमलीपदार्थाचे सेवन आदी व्यसन लागते. पैशातून हॉटेल, ढाब्यावर दारू-मटण पार्टी किंवा फार्महाऊसवर मौजमजा करतात. पैसे संपले की पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गातून पैसे मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. तसेच अल्पवयात प्रेमसंबंध, प्रेयसीवर खर्च करण्यासाठी वाममार्ग किंवा शारीरिक संबंधासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची प्रवृत्तीसुद्धा बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे.

सामाजिक वातावरण कारणीभूत आहे का?

एखाद्या गुन्ह्यात मुलांचा सहभाग उघड झाल्यावर पोलीस त्याचे डोसिअर (गुन्हे नोंदणी अहवाल) तयार करतात. त्यानंतर शहरात कुठेही अशा प्रकारची घटना घडली तर सर्वप्रथम संबंधित मुलांना पोलीस ताब्यात घेतात. वारंवार घरी पोलीस येत असल्याने वस्तीतील नागरिकांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. अनेकदा पोलीसही या मुलांचा ‘खबऱ्या’ म्हणून वापर करतात. त्यामुळे मुले एकदा या चक्रव्यूहात अडकली की त्यांना त्यातून बाहेर पडणे अवघड होते.

हेही वाचा : राजीनामा द्यायला सांगितला म्हणून ऑफिसमध्ये बाँब ठेवल्याची अफवा पसरवली; बंगळूरमधल्या कर्मचाऱ्याचा प्रताप

बालगुन्हेगारी थांबवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात?

बालगुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक स्थापन करण्यात आले. काही आयुक्तालयात बालगुन्हेगारांना गुन्हेगारीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ‘केअर’ सारखे उपक्रम राबवून पुन्हा सामाजिक जीवन आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. बाल सुधारगृहात बालगुन्हेगारांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.