– अनीश पाटील

बनावट संकेतस्थळे तयार करून त्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. ‘डिजिटल रिस्क ट्रेंड’ २०२३ या अहवालानुसार, बनावट संकेतस्थळांच्या संख्येत दरवर्षी ३०४ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यासोबतच अशा संकेतस्थळांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांमध्येही वाढ झालेली आहे. अशा प्रकरणांचा आढावा.

Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा
brothers and sisters funny video
ब्लॉग शूट करता करता लहान भावा-बहिणीमध्ये कडाक्याचं भांडण; मजेशीर VIDEO पाहून हसाल पोट धरून
Little boy video viral of weight lifting on social media
हा नाद रक्तात असावा लागतो! चिमुकल्याने जे केलं ते करताना तुम्हीही दोनदा विचार कराल, VIDEO एकदा पाहाच
Suresh Dhas
Suresh Dhas : “बिंदु नामावलीची बीड जिल्ह्यात वास्तुशांती…”, सुरेश धस यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत मोठी मागणी

बनावट संकेतस्थळांबाबत सद्य:स्थिती काय आहे ?

ग्रुप आयबीने नुकताच त्यांचा डिजिटल रिस्क ट्रेंड २०२३ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार कंपनी अथवा संस्थांच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करण्याच्या प्रकरणांमध्ये ३०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय फिशिंग या सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या संकेतस्थळांमध्येही ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वित्तीय संस्थांच्या नावाने बनावट पेजेस तयार करण्याचे प्रमाण सुमारे ७४ टक्के आहे. कंपन्यांच्या नावाने बनावट संकेतस्थळे तयार करण्याच्या प्रमाणातही २०२२ मध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बनावट संकेतस्थळांचा वापर कसा केला जातो?

बनावट संकेतस्थळांचा वापर फिशिंग या सायबर फसवणुकीसाठी केला जातो. फिशिंग ही फसवणुकीची पद्धत फार जुनी आहे. कालांतराने सायबर भामट्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत अनेक बदल केले. पूर्वी दूरध्वनी करून फसवणूक करणाऱ्या या भामट्यांनी कालांतराने फसवणूक करण्यासाठी नवनवीन तंत्रांचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यात बनावट संकेतस्थळे तयार करून फसवणूक करण्याचाही समावेश आहे. लिंक पाठवून बनावट संकेतस्थळावरून गोपनीय माहिती मिळवणे अथवा बनावट संकेतस्थळावर स्वतःचे मोबाइल क्रमांक देऊन फसवणूक केली जात आहे. याशिवाय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांचीही बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक केली होती.

गुन्ह्यांची उकल किती?

राष्ट्रीय सायबर गुन्हे विभागाच्या संकेतस्थळावर १ जानेवारी २०२० ते १५ मे २०२३ या कालावधीत सायबर फसवणुकीच्या २२ लाख ५७ हजार ८०८ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यातील केवळ ४३ हजार प्रकरणांमध्येच गुन्हा दाखल झाला. म्हणजे गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांहूनही कमी आहे.

एकट्या मुंबईत जानेवारी ते मे २०२३ या कालावधीत बनावट संकेतस्थळ बनवल्याप्रकरणी ५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील केवळ एका प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात एकाला अटक करण्यात आली. फिशिंगद्वारेही फसवणुकीचे २० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात केवळ चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. या प्रकरणांमध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत दाखल झालेली प्रकरणे कोणती?

महावितरण कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून वीज देयक भरण्यासंदर्भात ग्राहकांना संदेश पाठवून फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला सायबर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी अटक केली होती. आरोपीने बनावट संकेतस्थळ तयार करून ग्राहकांना खोटे संदेश पाठवून वीज बिल भरण्यास सांगितले होते. संदेश खरा समजून काहींनी वीज बिल भरले होते. मात्र फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर महावितरणने सायबर पोलिसांत तक्रार केली. चरकू खुबलाल मंडल असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंडच्या देवघरच्या दरबे गावचा रहिवासी आहे. आणखी एका प्रकरणात मुंबईतील एक व्यक्ती नुकताच एका डॉक्टरची माहिती इंटरनेटवर शोधत होता. त्याला संकेस्थळावर मिळालेल्या माहितीवर त्याने दूरध्वनी केला असता त्याची आरोपींनी दीड लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने देशभरात फसवणुकीचे गुन्हे; पुणे पोलिसांनी एकाला पकडले

फसवणूक झाल्यास काय करावे?

सायबर गुन्हेगार दूरध्वनी करून सामान्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारत असताना अशा प्रकरणांना तात्काळ आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी १७ मे २०२२ रोजी १९३० क्रमांकाची मदतवाहिनी सुरू केली होती. त्यावर दूरध्वनी केल्यास तत्काळ पोलीस पथक फसवणुकीतील रक्कम वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. या मदत क्रमांकाच्या माध्यमातून फसवणुकीची गेल्या सहा महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. ईमेल फिशिंग, ऑनलाइन जॉब फ्रॉड, क्लासिफाइड फ्रॉड, केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक, वधू-वर सूचक संकेतस्थळावरून ओळख करून फसवणूक, समाज माध्यमांवरून ओळख करून फसवणूक, ओटीपी फसवणूक, सेक्सटॉर्शनसारख्या कुठल्याही फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लुबाडण्यात आलेली ही रक्कम आहे. यावर्षी सायबर पोलिसांनी सायबर भामट्यांनी लुटलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम गोठवली. स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार करता येईल. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवरही याप्रकरणी तक्रार करता येते.

Story img Loader