– संदीप कदम

अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) ट्वेन्टी-२० स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगच्या माध्यमातून अमेरिकेतही आगामी काळात क्रिकेटला लोकप्रियता मिळेल अशी अपेक्षा आहे. ही लीग कशी असेल आणि त्याचा फायदा अमेरिकेतील क्रिकेटला कसा होईल, शिवाय जगातील सर्वांत यशस्वी आणि लोकप्रिय अशा इंडियन प्रिमियर लीगला ती टक्कर देऊ शकेल का, याचा आढावा.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

अमेरिकेच्या दृष्टीने ही लीग महत्त्वाची का?

अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांत १८४४मध्ये क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. हा सामना न्यूयॉर्कच्या सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब ग्राऊंडवर पार पडला होता. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेत अमेरिकेच्या संघाचा समावेश होता. त्यांना एकही सामना जिंकला आला नसला, तरी पात्रता फेरी गाठणे हीदेखील अमेरिकन संघासाठी मोठे यश मानता येऊ शकेल. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू असून, त्यांना या लीगच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. या लीगची सुरुवात होण्याची ही वेळ योग्य म्हणावी लागेल. याचे कारण म्हणजे अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे पुढील वर्षी पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन संयुक्तपणे करणार आहेत. यजमान म्हणून अमेरिका व वेस्ट इंडिज दोन्ही संघांना थेट पात्रता मिळाला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचा अनुभव फायदेशीर ठरेल.

मेजर लीग क्रिकेटची संकल्पना कशी समोर आली? त्याचे स्वरूप कसे असेल?

मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) सुरू करण्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. मात्र, अखेर या वर्षी लीगचा श्रीगणेशा होणार आहे. ही लीग अमेरिकन क्रिकेट एंटरप्राइजेस (एसीई) आयोजित करणार असून त्याला अमेरिकन क्रिकेटची मान्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) लीग खेळवण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. उत्तर अमेरिकेतील सर्वांत मोठे क्रिकेट प्रसारकर्ते अशी ओळख असलेले समीर मेहता आणि विजय श्रीनिवासन यांचा‘एसीई’ला पाठिंबा आहे. यासह ‘टाईम्स’ समूहाचे सत्यन गजवाणी व विनीत जैन यांचाही यामध्ये समावेश आहे. ‘एमएलसी’ला जवळपास ९८५ कोटी रुपये (१२ कोटी अमेरिकन डॉलर) इतका आर्थिक पाठिंबा मिळाला आहे. अनेक गुंतवणूकदारही यामध्ये सहभागी आहेत, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला आणि ॲडोबचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांचा समावेश आहे. पहिल्या हंगामासाठी ही स्पर्धा १९ सामन्यांची असेल. स्पर्धेचा अंतिम सामना ३१ जुलैला होईल. यामध्ये १५ साखळी सामने होतील. त्यानंतर एलिमिनेटर, दोन क्वॉलिफायर आणि अंतिम सामना होईल. सहा संघांच्या या लीगमध्ये सुरुवातीला साखळी फेरीचे सामने होतील आणि त्यामधील शीर्ष चार संघ ‘प्ले-ऑफ’ खेळतील.

लीगमध्ये कोणकोणते संघ सहभागी होणार आहेत?

या लीगमध्ये लॉस एंजलिस नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को युनिकॉर्न, सीॲटल ऑरकास, टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम हे संघ असतील. यामधील चार संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मालकांनी घेतले आहेत. लॉस एंजलिस नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्ज यांची मालकी ‘आयपीएल’ फ्रँचायझींकडे आहे. शिवाय सीॲटल ऑरकास संघाची मालकी जीएमआर समूहाकडे आहे, जे ‘आयपीएल’च्या दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक आहेत. वॉशिंग्टन फ्रीडमची मालकी भारतीय-अमेरिकन उद्योजक संजय गोविल यांच्याकडे आहे. तर, आनंद राजारमन आणि वेंकी हरीनारायण यांच्याकडे सॅन फ्रॅन्सिस्को युनिकॉर्नची मालकी आहे.

या लीगचे सामने कुठे होतील, त्यांना प्रतिसाद मिळेल का?

या लीगचे सामने हे दोन ठिकाणी पार पडतील. सुरुवातीचे आठ साखळी सामने टेक्सासच्या ग्रँड प्रेरी स्टेडियम येथे होतील. नंतरचे सात सामने मॉरिसविलच्या चर्च स्ट्रीट पार्क स्टेडियम येथे खेळवण्यात येतील. तर, ‘प्ले-ऑफ’चे सामने पुन्हा प्रेरी स्टेडियम येथे होणार आहेत. ग्रँड प्रेरी येथे बेसबॉल खेळले जायचे. नूतनीकरण करून त्याचे रूपांतर २०२२मध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आले. या स्टेडियमची आसनक्षमता ७ हजारच्या जवळपास आहे. चर्च स्ट्रीट पार्कची क्षमता ३५०० असून ती ५ हजारांपर्यंत वाढवली जाऊ शकते. मात्र, नियमित आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होणाऱ्या फोर्ट लॉडरडेल येथे लीगचे सामने होणार नाहीत. कारण, यादरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान ऑगस्टमध्ये ट्वेन्टी-२० सामने होतील. टेक्सास आणि लॉस एंजलिस यांच्यात होणाऱ्या लीगच्या पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेल्याची माहिती लीगकडून देण्यात आली. दक्षिण आशियाई आणि कॅरेबियन परिसरातील अनेकजण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचा फायदा या लीगला मिळू शकतो.

कोणते नामांकित खेळाडू लीग खेळतील? लीगची संघबांधणी कशा पद्धतीने करण्यात आली?

लॉस एंजलिस संघाकडे जेसन रॉय, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलसारखे खेळाडू आहेत. न्यूयॉर्ककडे रशीद खान, ट्रेंट बोल्ट आणि किरॉन पोलार्ड आहेत. आरोन फिंच, मार्कस स्टोइनिस आणि कोरी अँडरसन हे सॅन फ्रॅन्सिस्कोकडून खेळताना दिसतील. तर, टेक्सास संघाकडे फॅफ ड्यूप्लेसिस, डेव्हॉन कॉन्वे आणि डेव्हिड मिलर आहेत. क्विंटॉन डी कॉक, शिम्रॉन हेटमायर, इमाद वसिम आणि सिंकदर रझा सीॲटलकडून खेळतील. तर, वॉशिंग्टन संघात आनरिख नॉर्किए आणि मार्को यान्सेनचा समावेश असेल. प्रत्येक संघात जास्तीत जास्त १९ आणि कमीत कमी १६ खेळाडू आहेत. नऊ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच संघात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक संघ अमेरिकेच्या २३ वर्षांखालील संघातील एक आणि जवळपास दहा स्थानिक खेळाडूंचा समावेश असणे गरजेचे आहे. अंतिम अकरामध्ये जास्तीत जास्त सहा विदेशी आणि पाच स्थानिक खेळाडूंचा समावेश असणे आवश्यक आहे. स्थानिक खेळाडूंची निवड १९ मार्चला झालेल्या खेळाडू निवड प्रक्रियेतून करण्यात आली.

हेही वाचा : विश्लेषण : वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लंड यांना मागे सारत नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र कसे ठरले?

कोणते भारतीय खेळाडू या लीगमध्ये दिसतील?

भारताच्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या (२०१२) संघातील सदस्य हरमीत सिंगचा सीॲटल संघात समावेश आहे. तसेच, भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदही लॉस एंजलिसकडून खेळताना दिसेल. चैतन्य बिश्नोई, तजिंदर सिंग, शुभम रांजणे आणि स्मिथ पटेल हेदेखील लीगमध्ये खेळताना दिसतील. या सर्वांनी भारताच्या स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अंबाती रायडूही या लीगमध्ये सहभागी होणार होता. मात्र, त्याने माघार घेतली. ‘बीसीसीआय’च्या नवीन नियमानुसार देशाबाहेरील ट्वेन्टी-२० लीगमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी निवृत्ती झालेल्या खेळाडूला एका वर्षाचा विरामकाळ घेणे गरजेचे आहे.