– अनिश पाटील

दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक अशा चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करून घडलेल्या हत्येच्या घटनेने मुंबई हादरली. मुंबईतील महिलांविरोधातील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
Unnatural sexual assault with female lawyer by husband family and in laws
महिला वकिलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार… न्यायाधीश असलेला सासराही…
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड
Woman police officer assaulted by woman on bike
दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की; वारजे भागातील घटना
Badlapur Woman raped
बदलापूरमध्ये महिलेवर बलात्कार

महिलांबाबत किती गुन्ह्यांची नोंद?

महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास एप्रिल महिन्यापर्यंत १९७७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच काळात महिलांविरोधात घडलेल्या २०७८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये घट पाहायला मिळत आहे.

बलात्कार, अपहरण विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यांची स्थिती काय?

मुंबईत यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ३२५ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील २०७ गुन्ह्यांमधील तक्रारदार अल्पवयीन आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तुलनेने कमी म्हणजे ३०४ बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. म्हणजे या वर्षी बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. याशिवाय महिला व मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ४०७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ३५७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे महिला व मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास एप्रिल महिन्यांपर्यंत ७१३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी याच काळात विनयभंगाच्या ८३७ गुन्ह्यांची नोंद मुंबईत झाली होती. म्हणजे विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये घट पहायला मिळत आहे.

पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे का?

अल्पवयीन मुलींविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मात्र यावर्षी वाढ झालेली दिसत आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत मुंबईत पोक्सो कायद्यांतर्गत ३७१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी या गुन्ह्यांत वाढ झालेली दिसत आहे. पोक्सो कायद्यांतर्गत ३९० गुन्ह्यांची नोंद झालेली दिसून येत आहे. बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत २०७ गुन्हे, विनयभंग व पोक्सो अंतर्गत १६६ गुन्हे, छेडछाड व पोक्सो अंतर्गत सात व इतर भादंवि कलमांसह पोक्सो गुन्ह्यांअंतर्गत १० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

यापूर्वी घडलेल्या गंभीर घटना कोणत्या?

वडाळा येथे राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीची ९ऑगस्ट २०१२ रोजी तिच्याच इमारतीत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या सज्जाद याने बलात्काराचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या करून पळ काढला होता. मुंबई पोलिसांनी एका दिवसात त्याला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पकडले होते. जुलै २०१४मध्ये मोगुलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला नाशिक येथे तुरुंगात ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये आपली आई गंभीर आजारी असून तिला जम्मूला भेटायला जाण्यासाठी ३० दिवसांची पॅरोल रजा मिळवून मोगुल बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो परतलाच नव्हता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय निकम व त्यांच्या पथकाने श्रीनगरमध्ये त्याला अटक केली होती. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणातही डिसेंबर, २०२८ मध्ये त्याला दोषी ठरवून एक वर्ष कारावास व पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

साकीनाक्याच्या घटनेने मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडले. गतवर्षी सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना १० सप्टेंबर २०२१ मध्यरात्री हा क्रूर प्रकार घडला. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास खैरानी मार्गावरील ‘एस. जे. फिल्म स्टुडिओ’जवळ संबंधित स्त्री आरोपीला भेटली. त्यांच्यात आधी शाब्दिक वाद झाला. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली. या मारहाणीत ती बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिला फरफटत एका टेम्पोजवळ नेले. टेम्पोत तिच्यावर बलात्कार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी घुसवून तिच्यावर अमानुष अत्याचार केला. तिला जखमी अवस्थेत तिथेच सोडून आरोपी तेथून पळून गेला. हा सगळा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

खैरानी मार्गावरील पुठ्ठ्याच्या कंपनीतील सुरक्षा रक्षकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून आरोपी एका स्त्रीला बेदम मारहाण करत असल्याची माहिती कळवली. त्याची दखल घेऊन नियंत्रण कक्षाने तत्काळ संबंधित पोलीस ठाण्याकडे या घटनेबाबत कळवून तेथे जाण्यास सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एका टेम्पोत पीडिता बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्यांनी तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचारही सुरू झाले. मात्र आरोपीने तिच्यावर केलेल्या अमानुष अत्याचारांमुळे दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली.

महिलांबाबतच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना करण्यात आल्या?

निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलांच्या सुरेक्षासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांना मोबाईल डेटा टर्मिनल अंतर्गत पेट्रोलिंग गाडी आणि ५०० टॅबलेट देण्यात आले आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून गस्त घालणाऱ्या गाडीचे लाईव्ह लोकेशन नियंत्रण कक्षाला प्राप्त होते. त्यामुळे एखाद्या घटनास्थळाजवळ ही गस्त गाडी असेल, तर तिला तत्काळ याबाबतची माहिती गस्ती पथकाला देण्यात येते. यामुळे पोलिसांना प्रतिसादाचा वेळ कमी करण्यात यश आले आहे. पारंपरिक पद्धतीने नियंत्रण कक्षाकडून माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी ९ मिनिटांचा कालावधी लागायचा. तो या मोबाईल डेटा टर्मिनलमुळे सात मिनिटांपेक्षा कमी झाला आहे. आता या टर्मिनलमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिसादाचा वेळ आणखी कमी करण्यात पोलिसांना यश येईल.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच संवेदनशीलता वाढवण्यासाठी टॅक्‍सी व रिक्षा चालकांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. त्यात महिला प्रवाशांशी कसे वागावे याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी काही महत्त्वपूर्ण उपाय खासगी टॅक्‍सी, काळ्या-पिवळ्या टॅक्‍सी चालकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील मुंबईतील चौपट्यांवर गस्त घालण्यासाठी पोलिसांना सॅगवे पुरण्यात आली आहेत. मरिन ड्राईव्ह, वरळी चौपाटीवर त्याद्वारे गस्त घालण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. पण त्यांचा वापर अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : विश्लेषण : बलात्काराची प्रकरणे का वाढत आहेत? बलात्काराची मानसिकता आणि ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय ? 

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भयाफंड व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या आधारे पोलिस दलाचे अद्ययावतीकरण करण्याबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात ट्रॅक मी अॅप्लिकेशन, राईड शेअरींग अॅप्लिकेशन सारख्या विशेष अॅप्लिकेशनचा समावेश करण्यात आला होता. त्याशिवाय मुंबईतील काळोख्या व निर्जनस्थळांची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली होती. अशा १६० ठिकाणांवरील सीसीटीव्हींची संख्या वाढण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. याशिवाय बलात्कार ,अॅसिड हल्ला, लैंगिक अत्याचार अशा महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या तपासाला तात्काळ गती मिळण्यासाठी मुंबई पोलिसांना अद्ययावत न्यायवैद्यक संच पुरवण्यात येणार होते. घटनास्थळी जाऊन माहिती संकलीत करण्यासाठी थ्रीडी स्कॅनर, जैविक पुरावे गोळा करण्याचे साहित्य, अंगुलीमुद्रा घेण्याचे साहित्य, बलात्कारासंबंधीत गुन्ह्यांमध्ये आवश्‍यक पुरावे गोळा करण्याचे, साहित्य यांचा समावेश होता. त्याशिवाय मुंबईतील सीसीटीव्हींची जाळे वाढवण्यात आले आहे. लवकरच त्यात आणखी सीसीटीव्हींची भर पडणार आहे.

Story img Loader