संजय जाधव
अतिश्रीमंत नागरिक नेमकी कुठे गुंतवणूक करतात, याबद्दल सामान्य नागरिकांना कुतूहल असते. अतिश्रीमंतांचा कल हा मौल्यवान वस्तूंकडे अधिक दिसून येते. यात प्रामुख्याने कला म्हणजे चित्र, शिल्प आदींचा समावेश असतो. त्यानंतर घड्याळे, दागिने आणि नाणी यांचा क्रम लागतो. नाइट फ्रँक या कन्सल्टन्सीने जूनअखेरपर्यंतच्या बारा महिन्यांतील मौल्यवान वस्तूंमधील गुंतवणुकीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. एफटीएसई १०० निर्देशांक वर्षभरात ५ टक्क्यांनी वाढला आहे, तर मध्यवर्ती लंडनमधील घरांच्या किमती एक टक्क्याने वाढल्या आहेत. त्यावेळी मौल्यवान वस्तूंमधील गुंतवणुकीचे मूल्य सरासरी ७ टक्क्यांनी वाढले आहे. अतिश्रीमंताची मौल्यवान वस्तूंची हौस त्यांना फायद्याची कशी ठरते, याचा आढावा.

मौल्यवान वस्तूंतील गुंतवणूक म्हणजे काय?

अनेक अतिश्रीमंत व्यक्तींना मौल्यवान वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. जगातील मौल्यवान वस्तू आपल्या संग्रही असाव्यात, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी ते कितीही पैसा खर्च करण्यास तयार असतात. विशेष म्हणजे, या मौल्यवान वस्तूंसाठी केलेला खर्च त्यांना भविष्यात फायद्याचा ठरतो. कारण या मौल्यवान वस्तूंच्या किमती कायम वाढताना दिसतात. ‘हर्मिस’ची हँडबॅग आणि ‘पाटेक फिलीप’चे मनगटी घड्याळ आपल्याकडे असावे, असे अनेकांना वाटते. अतिश्रीमंत ते खरेदी करतात. भविष्यात कालांतराने या वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसतात. त्यातून ही एक प्रकारची फायदेशीर गुंतवणूकच ठरते.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…

खरेदीचे गणित नेमके कसे?

मौल्यवान वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीसाठी अनेक मंच उपलब्ध आहेत. या मंचावर जास्तीत जास्त किमतीत अशा वस्तूंची विक्री करता येते. अनेक जण हौसेपोटी या वस्तू घेत असले तरी भविष्यात त्यांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे त्यांची गुंतवणूकही किती प्रमाणात वाढत आहे, याचा आढावा निर्देशांकात घेण्यात आला आहे. याबाबत नाइट फ्रँक इंडियाचे संशोधन प्रमुख अँड्य्रू शर्ले म्हणाले की, मौल्यवान वस्तू घेताना त्याबद्दलची आवड महत्त्वाची असते. कारण प्रमुख हेतू हा ती वस्तू आपल्या संग्रही असावी, असा असतो. त्यातून ही गुंतवणूक केली जाते. कालांतराने या गुंतवणुकीचे मूल्य वाढत जाते.

मौल्यवान वस्तू गुंतवणूक निर्देशांक म्हणजे काय?

मौल्यवान वस्तू गुंतवणूक निर्देशांकात १० मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. त्यांच्या मूल्यात झालेला बदल यात मांडण्यात आला आहे. यात सर्वाधिक वाटा कला क्षेत्राच्या बाजारपेठेचा आहे. मागील १२ महिन्यांत मौल्यवान वस्तू बाजारपेठेत कला क्षेत्राचे मूल्य ३० टक्क्यांनी वाढले आहे. त्यावेळी इतर वस्तूंचे मूल्य मध्यम प्रमाणात वाढले आहे. घड्याळे आणि दागिन्यांचे मूल्य प्रत्येकी १० टक्क्यांनी वाढले आहे. नाण्यांचे मूल्य ८ टक्क्यांनी वधारले आहे. मोटारी आणि वाईनचे मूल्य प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढले आहे. रंगीत हिऱ्यांचे मूल्य ४ टक्के आणि हँडबॅगचे मूल्य १ टक्क्याने वाढले आहे. फर्निचरचे मूल्य स्थिर आहे. केवळ दुर्मीळ व्हिस्कीचे मूल्य ४ टक्क्यांनी कमी झाले आहे.

मागणी कशाला जास्त अन् कशाला कमी?

मौल्यवान वस्तू बाजारपेठेत मोटारींचे मूल्य दरवर्षी सरासरी ५ टक्क्यांनी वाढत होते. परंतु, या वर्षी त्यात ७ टक्क्यांनी घट झाली आहे. जुन्या आणि दुर्मीळ मोटारींमधील गुंतवणुकीचे मूल्य मागील वर्षी १५ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, जागतिक पातळीवरील मंदीच्या वाऱ्यामुळे नवीन मोटारीतील गुंतवणूक कमी होऊ लागली आहे. फेरारीचा विचार करता गुंतवणूक १५ टक्क्यांनी कमी झाली आहे. लॅम्बॉर्गिनीच्या गुंतवणूक मूल्यात ९ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी हँडबॅगमध्ये ‘हर्मिस’ हा सर्वांत मौल्यवान ब्रँड ठरला आहे. हर्मिसच्या बॅगमधील गुंतवणुकीचे मूल्य वाढले असून, लिलावांमध्ये त्यांना मोठी पसंती मिळत आहे. ‘शॅनेल’च्या हँडबॅगही लोकप्रिय असून, कंपनीने पुरवठा मर्यादित केल्याने आपोआप लिलावांमध्ये त्यांची किंमत वाढली आहे. यामुळे आपोआप गुंतवणुकीचे मूल्य वाढत आहे.

हेही वाचा : Money Mantra: मिलेनिअल्सनी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक का करावी?

बदल काय होत आहेत?

मागील दहा वर्षांत दुर्मीळ व्हिस्कीच्या मूल्यात वाढ झाली. मात्र, मागील वर्षभरात या गुंतवणुकीचे मूल्य कमी होताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील भूराजकीय तणावामुळे त्यांचे मूल्य कमी झाले आहे. याचबरोबर यामागे सामाजिक आणि आर्थिक कारणेही आहेत. मागील १२ महिन्यांत दुर्मीळ व्हिस्कीतील गुंतवणुकीचे मूल्य १२ टक्क्यांनी कमी झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कला बाजारपेठेचा विचार करता महिला कलाकारांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यांच्या कलाकृतींनी मिळणारे मूल्यही दिवसेदिवस वाढताना दिसत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com