– चंद्रशेखर बोबडे

केंद्रीय निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार नोंदणी करावी यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासाठी ‘मिशन युवा इन’ हाती घेतले आहे. ते नेमके काय आहे आणि त्यातून काय साध्य होणार आहे, याबाबत उत्सुकता आहे.

Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

‘मिशन युवा इन’ म्हणजे काय?

जास्तीत जास्त युवकांनी मतदार नोंदणी करावी यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुरू केलेली विशेष मोहीम म्हणजे ‘मिशन युवा इन’ होय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर केंद्रित ही योजना असून प्रत्येक महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनी मतदार नोंदणी करावी यासाठी या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहे. अशा प्रकारचा हा पहिला उपक्रम आहे.

मिशनसाठी काय तयारी करण्यात आली?

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक महाविद्यालयांशी संपर्क साधून तेथील व्यवस्थापनाला या मिशनबाबत माहिती दिली. या कामासाठी प्रत्येक महाविद्यालयात युवा ॲम्बेसिडर नियुक्त करण्यात आले. याशिवाय प्राचार्य, प्राध्यापक, वर्गशिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यात या मिशनमध्ये महाविद्यालयाची भूमिका आणि नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती देण्यात आली. पुढचा टप्पा हा विविध भागात शिबिरे आयोजित करण्याचा आहे.

‘मिशन युवा इन’चा फायदा काय?

नागपूर जिल्ह्यात ३७ लाख मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी म्हणून आता वर्षातून चार वेळा विशेष मोहीम राबवली जाते. तरीही नोंदणीत युवावर्गाची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे यासाठी जनजागृती करावी आणि या माध्यमातून नोंदणी वाढावी म्हणून महाविद्यालयीन स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मतदार नोंदणीची माहिती नसणारे, किंवा याबाबत उदासीन असणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. विशेषत: शिक्षित तरुण यात अधिक आहेत. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थांना गाठून त्यांची नोंदणी करणे या उपक्रमामुळे शक्य होणार आहे.

नवमतदार नोंदणीचे लक्ष्य किती?

नवमतदार नोंदणीत जिल्हाधिकाऱ्यांनी ७५ हजार नोंदणीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने हा आकडा निश्चित करण्यात आला. जिल्ह्यात २९२ महाविद्यालये आहेत. तेथे विशेष जनजागृती कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. ‘युवा महोत्सव’ यासारखे उपक्रमही राबवले जात आहेत. विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष स्टॉल लावले जात आहेत.

हेही वाचा : पदभरतीसाठी दुप्पट परीक्षा शुल्क आकारून लूट! तलाठी भरतीच्या निमित्ताने सरकारी धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप

राज्य निवडणूक आयोगाचे प्रयत्न काय?

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अचूक करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देतील. आपल्या या भेटींमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांचा वैयक्तिक तपशील, पत्ता आणि छायाचित्रांची पडताळणी करतील, मृत आणि स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी असलेले मतदार, मतदारांचाही शोध घेतील, तसेच मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया करतील. यासोबतच नव मतदार, तृतीयपंथी आणि भटक्या विमुक्त जात-जमातीतील मतदार, देहविक्रय करणाऱ्या महिला मतदारांचा शोध घेऊन त्यांची तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांचा शोध घेऊन त्यांची नोंदणीही यादरम्यान करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे म्हणणे आहे.