– राखी चव्हाण

हवामान बदलाचा एक प्रतिकूल परिणाम म्हणजे समुद्राचा बदलत असलेला रंग. गेल्या दोन दशकांत जगातील अर्ध्याहून अधिक समुद्रांचा रंग हिरवा झाला. याबाबतचा अभ्यास निसर्ग शोधपत्रिकेत नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचे अर्थ काय, याचा हा वेध.

Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती

हवामान बदलाचा महासागरांवर किती परिणाम?

पर्यावरणात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, कर्बउत्सर्जनाचे प्रमाणही वाढत आहे. या बदलाचा परिणाम आता स्पष्ट दिसायला लागला असून, गेल्या दोन दशकांमध्ये जगातील ५६ टक्क्यांहून अधिक महासागरांचा रंग लक्षणीयरीत्या बदलला आहे. रंगांमधील हा बदल मानवी डोळ्यांना दिसून येत नाही, असे अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ आणि इतर संस्थांच्या संशोधकांनी निसर्ग शोधपत्रिकेत प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

महासागरातील पाण्याचा रंग हिरवा कशामुळे होतो?

विषुववृत्ताजवळील प्रदेशात हा रंग हळूहळू हिरवा झाला असून, महासागरांच्या पृष्ठभागाच्या परिसंस्थेत बदल झाल्याचे त्यातून स्पष्ट होते. महासागराच्या पाण्याचा हिरवा रंग ‘फायटोप्लँक्टन’ या वनस्पतीसारख्या सूक्ष्मजीवांत असलेल्या ‘क्लोरोफिल’या हिरव्या रंगद्रव्यामुळे होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ ‘फायटोप्लँक्टन’चा हवामान बदलाला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी त्यांचे निरीक्षण करण्यास उत्सुक आहेत. हवामान बदलाचा कल लक्षात येण्यापूर्वी ‘क्लोरोफिल’मधील बदलांचा मागोवा घेण्यासाठी सुमारे तीन दशकांचा कालावधी लागेल, असे संशोधकांनी यापूर्वीच्या संशोधनाच्या आधारे सांगितले. कारण ‘क्लोरोफिल’मधील नैसर्गिक, वार्षिक बदल हे जनजीवनावर प्रभाव टाकतील, असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.

संशोधकांनी या अभ्यासासाठी कोणती पद्धत वापरली?

राष्ट्रीय समुद्रविज्ञान केंद्रातील संशोधक बी. बी. कैल आणि त्यांच्या चमूने २००२ ते २०२२ दरम्यान उपग्रहांनी टिपलेल्या निरीक्षणातून पृथ्वीवरील महासागरांच्या रंगांचे संख्यात्मक विश्लेषण केले. एका वर्षात प्रादेशिकदृष्ट्या ते कसे बदलतात, हे पाहून त्यांनी सुरुवातीला रंगांच्या नैसर्गिक फरकांचा अभ्यास केला. नंतर दोन दशकांमध्ये वार्षिक तफावतीत कसा फरक पडला, याचा अभ्यास केला. या सर्व बदलांवर हवामान बदलांचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरील महासागरांचे हरितगृहवायूंसह आणि हरितगृहवायूंशिवाय असे दोन आराखडे तयार केले. यापैकी हरितगृहवायूंच्या आराखड्याने निम्म्या महासागरांचा रंग २० वर्षांत बदलण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तो कैल यांनी वर्तवलेल्या उपग्रह डेटाच्या विश्लेषणाच्या जवळपास जाणारा होता.

महासागराचा बदलणारा रंग चिंताजनक आहे का?

समुद्राच्या परिसंस्थेचे प्रतिबिंब म्हणून पाण्याच्या रंगाकडे पाहिले जाते. त्यामुळेच समुद्राचा हा बदललेला रंग चिंताजनक आहे. कारण पाण्याचा रंग बदलला म्हणजेच परिसंस्थाही बदलली आहे. अंतराळातून समुद्राच्या पाण्याचा रंग जसा दिसतो, त्यावरून समुद्राच्या वरच्या थरात काय चालले आहे, याचे चित्र स्पष्ट होते. जेव्हा समुद्राचा रंग दाट निळा दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर फार जीवसृष्टी नसल्याचे मानले जाते. पण जेव्हा पाण्याचा रंग हिरवा झालेला दिसतो, तेव्हा पृष्ठभागावर बऱ्याच घडामोडी चालल्याचा अंदाज काढला जातो. विशेषत: समुद्रातील जिवाणूंची प्रकाशसंश्लेषण क्रिया सुरू असल्याचे यातून दिसते. ज्याप्रमाणे वनस्पतींच्या पानांमध्ये सूर्यप्रकाश शोषण्यासाठी हरित द्रव्य असते, त्याच प्रकारचे हरित द्रव्य या जिवाणूंमध्ये दिसते.

हेही वाचा : समुद्राचा रंग हिरवा का होत आहे? याचा अर्थ आणि परिणाम काय?

काही महासागरांच्या पाण्याचा रंग वेगळा का असतो?

महासागरातील पाण्याचा रंग नेहमीच सारखा नसतो. तो निळ्या रंगापासून हिरवा किंवा काही बाबतीत पिवळा, तपकिरी किंवा लाल रंगातही बदलू शकते. सूर्यप्रकाशाचा पाण्यातील पदार्थ आणि कणांशी संयोग होतो यावर समुद्राच्या पाण्याचा रंग अवलंबून असतो. जेव्हा सूर्यप्रकाश महासागरात प्रवेश करतो, तेव्हा त्यातील काही प्रकाशकिरणे पृष्ठभागावर परत परावर्तित होतात, तर काही पाण्यात खोलवर जातात. प्रकाश जितका खोल जातो तितका तो पाण्यातील रेणू आणि इतर गोष्टींद्वारे शोषला जातो किंवा विखुरला जातो.

हवामान बदलामुळे समुद्रावर आणखी काय परिणाम होतो?

हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील अतिरिक्त उष्णता समुद्रात शोषली जाईल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढेल. पाणी गरम असल्यास त्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते आणि सागरी जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader