गेल्या काही वर्षांत शेअर मार्केटला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या शेअर मार्केटने इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा दिला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार अधिक फायदा घेण्यासाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करीत आहेत. काहीवेळा गुंतवणूकदार शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगळा मार्ग स्वीकारतात. भारतातील डब्बा प्रणाली ही एक समांतर प्रणाली आहे, जी गुंतवणूकदारांना स्टॉक एक्स्चेंजच्या बाहेरही स्टॉक खरेदी आणि विक्री करण्यास अनुमती देते. ही शेअर मार्केटला समांतर व्यवस्था असली तरी डब्बा व्यापार बेकायदेशीर आहे. गेल्या आठवड्यात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने ‘डब्बा ट्रेडिंग’मध्ये सामील असलेल्या संस्थांचे नाव घेऊन नोटीस जारी केली. स्टॉक मार्केटमध्ये डब्बा प्रणालीद्वारे कोणीही गुंतवणूक करू नका, कारण ते कायद्याने प्रतिबंधित आहेत. डब्बा प्रणाली चालवणाऱ्या संस्थांना एक्सचेंजद्वारे अधिकृत सदस्य म्हणून मान्यता दिली जात नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा