What is an ancient writing symbol?: मानवाने कमीत कमी गेल्या दहा हजार वर्षांपासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपला ठसा उमटवण्याचा प्रत्यत्न केला आहे; परंतु आपण पाहिलेली गोष्ट नोंदवण्याची प्रेरणा नेमकी ‘लेखन’ स्वरूपात कधी विकसित झाली, हे ठरवणे कठीण आहे. इटलीतील बोलोनिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या एका टीमने प्राचीन मेसोपोटेमियन मुद्रांवरील चिन्हांचा संबंध प्रोटो-क्युनिफॉर्म नावाच्या प्राचीन दृश्य संवाद प्रणालीशी जोडला आहे. हा एक कला प्रकार आहे, कालांतराने जगातील पहिल्या लेखन प्रणालींपैकी एकामध्ये तो विकसित झाला.

प्राचीन मुद्रा आणि लेखनाचा संबंध

दक्षिण आशियातील प्राचीन मुद्रांवरील चिन्हांचा लेखन प्रणालीशी संबंध आहे, हे बऱ्याच आधीपासून ज्ञात आहे. मात्र, मुद्रांवरील विशिष्ट प्रतिमा आणि चिन्हांचे स्वरूप, त्यांचा अर्थ आणि त्यांचे लेखन शैलीच्या विकासातील योगदान याचा तपशीलवार अभ्यास फारसा झालेला नाही. “या प्रतिमा प्राचीन मेसोपोटेमियातील पहिल्या लेखन प्रणालीच्या निर्मितीत कशा साहाय्यकारी ठरल्या, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न होता,” असे भाषा अभ्यासक सिल्विया फेरारा सांगतात. त्याच अनुशंगाने या अभ्यासक गटाने आपले संशोधन पुढे सुरु ठेवले.

Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
History of Geography How Big is the Universe
भूगोलाचा इतिहास: विश्वाचा आकार केवढा?
shivani rangole tula shikvin changalach dhada fame actress
“विमान प्रवासात मास्तरीणबाई म्हणून हाक मारली…”, हवाईसुंदरीने लिहिलं शिवानी रांगोळेसाठी खास पत्र, शेअर केले फोटो
Nehrus letters to Edwina Mountbatten
“नेहरूंनी एडविना माऊंटबॅटन यांना लिहिलेली पत्रं परत करावीत”, अशी भाजपाची गांधी कुटुंबाकडे मागणी; पत्रात नक्की काय दडलंय?
Seven historical reasons for the decline of Maharashtra
महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे
the golden road how ancient india transformed the world
‘सुवर्णमार्गा’चा झळाळता इतिहास
the third eye of Indian art
तिसऱ्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न…

आणखी वाचा: Blue Blood: तीन हृदय असणाऱ्या ‘या’ प्राण्याच्या रक्ताचा रंग निळा; काय आहे नेमकं शास्त्रीय कारण?

A large cuneiform inscription found on the south side of the Van Castle hill, four kilometres west of modern-day Van, in eastern Turkey. It's several metres tall and wide, 25 centuries old and the message comes from the Persian king Xerxes. In Old Persian, Babylonian and Elamite, it says (roughly): "Ahuramazda is the great god, the greatest god who created the sky and created the land and created humans Who gave prosperity to the humans Who made Xerxes king King of many kings, being the only ruler of the totality of all lands “I am Xerxes, the great king, the king of kings, the king of the lands, king of all the languages, king of the great and large land, the son of king Darius the Achaemenian” The king Xerxes says: “the king Darius, my father, praised be Ahuramazda, made a lot of good, and this mountain, he ordered to work its cliff and he wrote nothing on it so, me, I ordered to write here. May Ahuramazda protect me, with all the gods and so my kingdom and what I have done."
तुर्कस्तानच्या व्हॅन कॅसल टेकडीच्या दक्षिण बाजूस एक मोठा क्यूनिफॉर्म शिलालेख सापडला (प्रातिनिधिक फोटो: विकिपीडिया)

लेखन प्रणालीचे महत्त्व

लेखन कला ही नियमांची एक जटिल प्रणाली आहे. आपल्याला चिन्हे कशी मांडायची आणि त्यांचा अर्थ कसा लावायचा याबद्दल ती मार्गदर्शन करते. सोप्या कल्पनांपासून ते सूक्ष्म विचारांपर्यंत माहितीची देवाणघेवाण या प्रणालीमुळे शक्य झाली. लेखनाच्या आधी, मातीच्या पाटीवर साध्या चिन्हांद्वारे व्यापाराच्या नोंदी ठेवण्याचा प्रकार प्रचलित होता. हळूहळू ही चिन्हे अधिक वापरात आली आणि ‘प्रोटो-क्युनिफॉर्म’ प्रणालीचा पाया रचला गेला.

दंडगोल मुद्रांवरील चिन्हांचे विश्लेषण

संशोधकांनी प्राचीन दंडगोल आकाराच्या मुद्रांवरील रचनांची ज्ञात प्रोटो-क्युनिफॉर्म चिन्हांशी पद्धतशीरपणे तुलना केली. त्यांनी विश्लेषण केलेल्या दंडगोल आकाराच्या मुद्रांचा काळ हा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये लेखन विकसित होण्यापूर्वीच्या काळापासून ते प्रोटो-लिटरेट कालखंडापर्यंतचा आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, या मुद्रांवर सामान्य वस्तूंचे चित्रण करण्याच्या पद्धतींमध्ये आणि त्यांच्या संबंधित प्रोटो-क्युनिफॉर्म चिन्हांमध्ये साम्य आढळते. उदाहरणार्थ, प्रोटो-क्युनिफॉर्म चिन्हांमध्ये त्रिकोणी आकार दिसतो, ज्यामध्ये ‘कापडा’च्या एका भागावरून खाली जाणाऱ्या अनेक उभ्या रेषा असतात. मेसोपोटेमियन शहर सुसा येथील सिलिंडर मुद्रांवर लोक विणकाम करत असल्याचे चित्रण याच स्वरूपाचे आहे, तसेच उरुक शहरामध्ये सापडलेल्या वस्तूंवरही हेच स्वरूप दिसून येते. या दंडगोलाकार किंवा सिलिंडर आकाराच्या मुद्रांवर जाळ्यात गुंडाळलेल्या भांड्यांचे चित्रण आणि संशोधकांच्या मते समान अर्थ असलेल्या प्रोटो-क्युनिफॉर्म चिन्हांमधील साम्यही पाहायला मिळते.

The newly discovered Tablet V of the Epic of Gilgamesh. It dates back to the old Babylonian period, 2003–1595 BC, and is currently housed in the Sulaymaniyah Museum, Kurdistan Region, Iraq.
(प्रातिनिधिक फोटो: विकिपीडिया)

लेखनाचा ऐतिहासिक संदर्भ

“पूर्व-लेखन प्रतिकात्मकतेपासून लेखनापर्यंत पोहोचण्याची संकल्पनात्मक उडी ही मानवी बौद्धिक तंत्रज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे,” असे फेरारा म्हणतात. “लेखनाचा शोध हा इतिहासपूर्व काळ आणि इतिहास यांच्यातील संक्रमण चिन्हांकित करतो, आणि या अभ्यासातील निष्कर्ष या दरीला जोडणारे आहेत. त्यांनी हे दाखवून दिले की, इतिहासपूर्व काळातील काही प्रतिमांचा उपयोग जगातील पहिल्या लेखन प्रणालींपैकी एकामध्ये कसा करण्यात आला.”

आणखी वाचा: China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?

लेखनाच्या साधनांचा विकास

प्रोटो-क्युनिफॉर्म प्रथम पुरातत्त्वीय पुराव्यांमध्ये व्यापारी नोंदींसाठीचे माध्यम म्हणून दिसते. यामुळे लोकांना दैनंदिन वस्तूंच्या, विशेषतः कृषी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादन व व्यापाराचा मागोवा घेता आला. परंतु मेसोपोटेमियामध्ये साक्षरतेपूर्वी, दंडगोलाकार मुद्रा हीच भूमिका बजावत होती. लोक मातीच्या पाटीवर नोंदींचे ‘छाप’ घेऊन व्यापाराची नोंद ठेवत होते. “आमचे निष्कर्ष असे दर्शवतात की, दंडगोलाकार मुद्रांवर कोरलेल्या रचना दक्षिण इराकमधील प्रोटो-क्युनिफॉर्मच्या विकासाशी थेट जोडलेल्या आहेत,” फेरारा सांगतात. “याचप्रमाणे, या रचनांशी सुरुवातीपासून जोडलेला अर्थ लेखन प्रणालीत कसा समाविष्ट करण्यात आला, हेही स्पष्ट होते.”

आधुनिक भाषाशास्त्राशी संबंध

प्रोटो-क्युनिफॉर्म चिन्हांचा अभ्यास आजच्या भाषाशास्त्रासाठीही महत्त्वाचा आहे. यामुळे लेखन कसे विकसित झाले, आणि मानवी विचारसरणीवर त्याचा कसा परिणाम झाला, याचा अभ्यास करता येतो.

Cylinder of Antiochus I Soter with translation (Color)
(प्रातिनिधिक फोटो: विकिपीडिया)

लेखन प्रणालीचा जागतिक प्रभाव

लेखन प्रणालीने जगभरातील संस्कृतींना जोडले. मेसोपोटेमियातील लेखन प्रणालीने इजिप्त, भारत आणि चीनसारख्या प्राचीन संस्कृतींना प्रेरणा दिली. रेशीम मार्गावरील व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे लेखनाच्या पद्धती एकमेकांशी जोडल्या गेल्या.

लेखनाचा शोध हा मानवी इतिहासातील क्रांतिकारी टप्पा होता. प्राचीन मेसोपोटेमियातील दंडगोल मुद्रांवरील चिन्हे फक्त व्यापाराच्या नोंदींसाठीच नव्हे, तर मानवी विचारांना शब्दरूप देण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल ठरली. या प्रणालीचा विकास आजच्या आधुनिक भाषांच्या उगमामध्ये महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Story img Loader