Alexander the great’s purple tunic cloth: एका ग्रीक संशोधकाने असा दावा केला आहे की, ग्रीसच्या उत्तर भागातील एका थडग्यात दशकांपूर्वी सापडलेला जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा कापडाचा तुकडा अलेक्झांडरच्या अंगरख्याचा असू शकतो. हा कापडाचा तुकडा खरोखरच अलेक्झांडरचा आहे का आणि त्याचा भारताशी काय संबंध? इतर तज्ज्ञ काय सांगतात याचा घेतलेला हा आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अलेक्झांडर द ग्रेटच्या वस्त्राचा तुकडा असू शकतो का?
जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक नाजूक कापडाचा तुकडा काही दशकांपूर्वी सापडला. या कपड्याच्या तुकडयाचे वय किमान दोन हजार वर्षांपेक्षा अधिक आहे. पुरातत्त्व अभ्यासकांना तो जीर्ण अवस्थेत सापडला होता. हा जीर्ण कापडाचा तुकडा काही दशकांपूर्वी ग्रीसच्या उत्तर भागातील एका थडग्यात सापडला. हे थडगं ग्रीसच्या थेस्सालोनिकीपासून ७५ किमी पश्चिमेला आहे. या कापडाचा शोध जुना असला तरी सध्या या कापडावरून ग्रीसमधील पुरातत्त्व अभ्यासकांमध्ये नवा वाद पेटला आहे. या महिन्यात डेमॉक्रिटस युनिव्हर्सिटी ऑफ थ्रेसचे पॅलीओअँथ्रोपोलॉजिस्ट अँटोनीस बार्त्सिओकास यांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधात त्यांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. आजपर्यंत ज्या थडग्यात अलेक्झांडरच्या वडिलांचे अवशेष आणि खजिना असल्याचे मानले जात होते; त्यात प्रत्यक्षात अलेक्झांडर द ग्रेट आणि त्याच्या सावत्र भावाचे काही सामान होते असा नवा दावा करण्यात आलेला आहे. यामध्ये एक जांभळा चिटोन (चिटोन हा अंगरख्याचा एक प्रकार आहे, जो खांद्यावर बांधला जातो. प्राचीन ग्रीस आणि रोममधील पुरुष आणि स्त्रिया परिधान करत असत) किंवा ट्यूनिक (अंगरखा) होता.
अधिक वाचा: History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?
पुरातत्त्वशास्त्रज्ञ मनोलिस अँड्रोनिकोस यांचे मत
या दाव्यामुळे ग्रीसचे प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ मनोलिस अँड्रोनिकोस यांच्या संशोधनाला आव्हान दिले जात आहे. अँड्रोनिकोस यांनी १९७७ साली या थडग्याचा शोध लावला होता. १९९२ साली त्यांचे निधन झाले. अँड्रोनिकोस यांनी आपल्या संशोधनात म्हटले होते की, या थडग्यातील अवशेष आणि वस्तू फिलिप दुसरा ऑफ मॅसिडोन या अलेक्झांडरच्या वडिलांच्या आहेत. फिलिप दुसऱ्याने आपल्या सैनिकी विजयांद्वारे प्राचीन ग्रीसला एकत्र आणले आणि आपल्या मुलासाठी इजिप्तपासून ते भारतापर्यंतच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
अँटोनीस बार्त्सिओकास यांचे मत
मात्र, जीवाश्मांचे सूक्ष्म विश्लेषण करण्यात तज्ज्ञ असलेले अँटोनीस बार्त्सिओकास यांचे मत वेगळे आहे. त्यांचा विश्वास आहे की, या थडग्यात अलेक्झांडरच्या सावत्र भावाला म्हणजेच ‘आर्रिडेअस किंवा फिलिप तिसरा’ याला पुरण्यात आले होते. तसेच अलेक्झांडरच्या काही वस्तूंनाही या ठिकाणी स्थान देण्यात आले होते. यामध्ये एक जांभळा चिटोन म्हणजेच अंगरखा होता. या चिटोनमध्ये पांढऱ्या रंगाचा एक थर होता.
जर हे नवे गृहीतक सिद्ध झाले, तर ग्रीसमध्ये दीर्घकाळ मानला गेलेला इतिहास बदलू शकतो. परंतु काही ग्रीक पुरातत्त्व अभ्यासक या नवीन दाव्याला कोणताही आधार नसल्याचे नमूद करतात. तर अँटोनीस बार्त्सिओकास यांनी सांगितले की, त्यांनी या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा आणि थडग्यात सापडलेल्या एका प्राचीन शिल्पफलकाचा विश्लेषणासाठी आधार घेतला आहे. त्यांनी हेही सांगितले की, थडग्यात सापडलेला एक सुवर्ण राजदंड आणि मुकुट फिलिप तिसरा याचा होता. जो त्याने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर धारण केला होता. अलेक्झांडरचे अवशेष कधीच सापडले नाहीत, त्यामुळे त्याच्याशी संबंधित वस्तू सापडणे अधिक महत्त्वपूर्ण ठरते. त्यांच्या नव्या दाव्याचा मुख्य आधार म्हणजे या वस्त्राचा प्रकार आणि रंग. हे जांभळ्या रंगाचे सुती कापड आहे. इ.स.पू. चौथ्या शतकात, अलेक्झांडरच्या काळात, ग्रीसमध्ये हे कापड अत्यंत दुर्मिळ होते. परंतु, हा रंग फारसी राजघराण्यांच्या श्रीमंत वर्गात प्रिय होता. ज्यांना अलेक्झांडरने फारस (पर्शिया) जिंकताना पराभूत केले होते. या शोध निबंधात पांढऱ्या रंगाचा उल्लेख हा पर्शियन शासकांच्या आवडीच्या रंगाशी जोडण्यात आला आहे.
अलेक्झांडर आणि पर्शिया
मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिंपियस यांचा पुत्र म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट. इ.स.पू. ३३६ मध्ये फिलिपचा खून झाला आणि वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मॅसिडॉनच्या गादीवर अलेक्झांडर विराजमान झाला. गादीवर येताच एका वर्षाच्या आतच अलेक्झांडरने उत्तरेला डॅन्यूब नदीपासून पश्चिमेला एड्रियाटिकपर्यंत आपले साम्राज्य विस्तारले. त्यानंतर, थीब्स आणि अथेन्स ही राज्ये बंड करण्याच्या तयारीत होती, त्यांना दडपण्याचा निर्धार अलेक्झांडरने केला. सर्वप्रथम, त्याने थीब्सवर स्वारी करून अनेक नागरिकांना ठार मारले आणि काहींना गुलाम म्हणून विकले. देवळे आणि त्याच्या आवडत्या कवी पिंडरचे घर वगळता सर्व इमारतींचा विध्वंस केला. हे पाहून अथेन्स शरण आले, मात्र स्पार्टाने आत्मसमर्पण केले नाही. यानंतर, अलेक्झांडरने बलशाली आणि समृद्ध इराणी साम्राज्यावर स्वारी करण्याचा निश्चय केला. तिसरा डरायसचा पराभव करून अलेक्झांडर इराणी साम्राज्याचा अधिपती झाला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा भारताकडे वळवला होता. याचमुळे त्याचा संबंध हा सुती जांभळ्या कापडाशी आला असावा असे मत व्यक्त करण्यात आले आहे. कारण प्राचीन भारतच त्या कालखंडात सुती कापडाचा सर्वात मोठा निर्यातदार होता.
इतर पुरावे
अँटोनीस बार्त्सिओकास यांनी थडग्याच्या भिंतींवर रंगवलेल्या एका शिल्पफलकाकडेही लक्ष वेधले आहे. या फलकावर मॅसेडोनियन अभिजनांच्या एका शिकारीचा प्रसंग चित्रित केलेला आहे. बार्त्सिओकास यांच्या मते, या दृश्याच्या केंद्रस्थानी अलेक्झांडर आहे. ज्याने जांभळा चिटोन घातल्याचे दिसत आहे. राजघराण्यातील थडगी १९७७ साली व्हर्जिना शहराबाहेर सापडलेल्या एका प्राचीन शहराच्या परिसराचा भाग होती. हे शहर एकेकाळी प्राचीन मॅसेडोन साम्राज्याची राजधानी होती. पुरातत्त्वशास्त्रज्ञ अँड्रोनिकोस यांना फिलिप दुसऱ्याच्या अंतिम विश्रांती स्थळाचा शोध लावल्याबद्दल श्रेय दिले जाते.
अधिक वाचा: History of Bandhani: सिंधू संस्कृती ते अजिंठा; पाचहजार वर्षांच्या बांधणी-गाठी उलगडतात तेव्हा!
टीकेवर उत्तर
द टाइम्सला दिलेल्या लेखी प्रतिसादात शोधनिबंधावर टीका करणाऱ्यांविषयी विचारले असता अँटोनीस बार्त्सिओकास म्हणाले की, “ते कोणतेही पुरावे न देता आक्षेप घेत राहतील, जसे आजपर्यंत ते करत आले आहेत. हट्ट सोडणे सोपे नाही.” बार्त्सिओकास यांनी दिवंगत पुरातत्त्व अभ्यासक अँड्रोनिकोस यांच्यावर अशा वस्तूंचे पुरावे दडपल्याचा आरोपही केला आहे. बार्त्सिओकास यांनी हे थडगे फिलिप दुसऱ्याचे असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. म्हणूनच बार्त्सिओकास यांच्या थडग्यावरील मताने ग्रीसच्या पुरातत्त्वशास्त्र समुदायात खळबळ माजली आहे परंतु असे होण्याची ही पहिली वेळ नाही.