Shaivite and Buddhist sculptures in Odisha: ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात शैव आणि बौद्ध देवतांच्या प्राचीन मूर्तींचा शोध लागला आहे. या पुरावशेषांचा कालखंड इ.स. ६ वं किंवा ७ वं शतक असा प्राथमिक निष्कर्ष आहे. भांडारीपोखरी ब्लॉकमधील मणिनाथपूर गावात बैतरणी नदीजवळ हे अवशेष सापडले आहेत. या शोधामुळे या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाची महत्त्वपूर्ण झलक पाहायला मिळते.

शोधाचा तपशील

२०२४ च्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सकाळी फिरत असताना स्थानिक रहिवासी विवेकानंद यांना एक मूर्ती सापडल्याने हा शोध समोर आला. त्यांनी त्या मूर्तीचे महत्त्व ओळखून तात्काळ भारतीय कला व सांस्कृतिक वारसा ट्रस्ट (INTACH) आणि स्थानिक संशोधक बिस्वंभऱ राऊत यांना याची माहिती दिली. स्थळाला भेट दिल्यानंतर राऊत यांनी १८ प्राचीन मूर्तींची तपासणी केली. त्यापैकी काही शैव आणि बौद्ध देवतांच्या दुर्मीळ मूर्ती होत्या. या मूर्ती परिसरात विखुरलेल्या अवस्थेत होत्या. या मूर्तींशिवाय मंदिरांच्या लहान प्रतिकृती आणि ‘अर्घ स्तूप’ही सापडले आहेत.

Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात रत्नागिरीत सापडण्यामागचा अर्थ काय?
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ

अधिक वाचा: औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित का?

शिल्प आणि त्यांचे महत्त्व

या मूर्तींमध्ये संशोधकांना शिव, पार्वती आणि गणेश या शैव देवतांच्या तसेच बौद्ध मूर्तींमध्ये बुद्ध, तारा आणि पद्मपाणी यांच्या मूर्ती सापडल्या आहेत. खोंडालाइट (Khondalite) दगडातून तयार केलेले हे पुरावशेष केवळ त्यांच्या कलात्मक कौशल्यासाठीच महत्त्वाचे नाहीत, तर ६ व्या ते ८ व्या शतकादरम्यान या प्रदेशातील धार्मिक आणि सांस्कृतिक एकता दर्शवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ सुनील पटनायक यांनी या स्थळाची तपासणी करून या शोधाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले आहे. त्यांनी या मूर्तींवरील जटिल नक्षीकामाचे कौतुक केले. या मूर्तींमध्ये नृत्य करत असलेल्या व्यक्ती आणि भैरवाच्या मूर्तींचाही समावेश आहे. शोध घेण्यात आलेली काही लहान मंदिरे ४.५ फूट उंच असून त्यामुळे या शोधाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

संरक्षण आणि पुढील संशोधन

सध्या या मूर्तीं संरक्षण आणि प्रदर्शनासाठी बौद्ध विहार संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकचे जिल्हा सांस्कृतिक अधिकारी तनुजा सिर्का सिंह यांनी या मूर्ती योग्य पद्धतीने संग्रहालयात नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या पुरावशेषांकडे आता इतिहासकार आणि संशोधकांचे लक्ष वेधले गेले आहे. या शोधामुळे प्राचीन काळात या प्रदेशातील शैव आणि बौद्ध परंपरांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संवाद अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी पुढील उत्खनन केले जाण्याची शक्यता असून या मूर्ती या भागातील धार्मिक प्रथा आणि कलात्मक परंपरांवर अधिक प्रकाश टाकतील अशी आशा आहे.

ओडिशा आणि बौद्ध धर्म

ओडिशा आणि बौद्ध धर्माचा संबंध प्राचीन भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. बौद्ध धर्माच्या उदयापासूनच ओडिशा (पूर्वीचे कलिंग) हे या धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. या भागातील सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आणि बौद्ध धर्माचे अत्यंत दृढ नाते आहे. सम्राट अशोकाने कलिंगावर विजय मिळवल्यानंतर झालेल्या विध्वंसाने त्याच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला. या युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि धर्माच्या प्रसारासाठी योगदान दिले. अशोकाने कलिंगातील लोकांमध्ये बौद्ध धर्माचा उपदेश दिला. त्याच्या धम्मस्तंभांवर (Edicts) बौद्ध तत्त्वज्ञानाची शिकवण कोरलेली आहे. धौली येथील अशोकाचा शिलालेख हे याचे उत्तम उदाहरण आहे. धौली शांती स्तूप, रत्नागिरी, ललितगिरी, उदयगिरी, पुष्पगिरी विहार यांसारख्या बौद्ध स्थळांसाठी ओडिशा प्रसिद्ध आहे. ओडिशामधील बौद्ध मूर्ती आणि शिल्पकला प्रसिद्ध आहेत. येथे बुद्ध, तारा, पद्मपाणी, अवलोकितेश्वर यांसारख्या बौद्ध देवतांच्या सुंदर मूर्ती सापडतात. ही कलाकृती खोंडालाइट आणि चंद्रखल दगडांवर कोरलेली असते.

ओडिशा आणि शैव परंपरा

ओडिशा (प्राचीन कलिंग) शैव परंपरेचा समृद्ध वारसा जपणारा प्रदेश आहे. शैव धर्माच्या प्रभावाखालील वास्तुकला, मूर्तिशिल्प आणि धार्मिक परंपरा येथे आजही पाहायला मिळतात. ओडिशातील अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्पकृती शैव परंपरेच्या प्राचीन इतिहासाच्या साक्षीदार आहेत. कलिंगच्या राजांनी शैव धर्माला प्रोत्साहन दिले. या प्रदेशातील शैव परंपरा गुप्त आणि शैल्य कालखंडांपासून सुरू झाली, परंतु ती सोमवंशी आणि गंग राजवटीत बहरास आली. या राजवंशाच्या शिवभक्तीमुळे या भागात अनेक शिव मंदिरे उभी राहिली.

अधिक वाचा: Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील सत्य नेमके काय?

लिंगराज मंदिर

१० व्या-११ व्या शतकात सोमवंशी राजांनी बांधलेले लिंगराज मंदिर भुवनेश्वरचे एक प्रमुख शैव तीर्थस्थान आहे. हे मंदिर नागर शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. १० व्या शतकातील मुक्तेश्वर मंदिर, रावळेश्वर मंदिर शैवपरंपरेचा सखोल वारसा दर्शवतात. ओडिशामध्ये शिवलिंगाची पूजा ही शैव धर्माचा केंद्रबिंदू होती. लिंगराज मंदिरातील शिवलिंगाला ‘स्वयंभू’ मानले जाते. ओडिशाच्या शैव मंदिरांमधील नृत्यमुद्रा, शिवाच्या तांडव नृत्याचे चित्रण आणि गजासुर वध यांसारख्या कथांचे कोरीवकाम विशेष उल्लेखनीय आहे.

संतांचेही शिवस्तवन

ओडिशातील संतांनी शिवाचे स्तवन करणारी अनेक भक्तिगीते आणि शास्त्रीय ग्रंथ लिहिले आहेत. गंग राजवंशाने (११ व्या-१५ व्या शतकात) शैव धर्माला अधिक बळ दिले. त्यांनी भुवनेश्वर आणि पुरी येथे भव्य मंदिरांची निर्मिती केली. याच काळात शैव धर्म आणि वैष्णव परंपरांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध दिसून येतो. ओडिशाचा शैव इतिहास हा या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेतील भव्य मंदिरे, मूर्तिशिल्प आणि धर्मपरंपरा ओडिशातील शैव धर्माच्या वैभवाचा साक्षात्कार घडवतात. ओडिशातील शैव धर्माचा वारसा फक्त भूतकाळात मर्यादित नसून आजही ओडिशाच्या धार्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

त्यामुळेच या नवीन शोधामुळे प्राचीन भारतातील शैव आणि बौद्ध परंपरांमधील परस्पर संबंध, धार्मिक प्रथा आणि कलात्मक परंपरांबद्दल महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात. तसेच, या मूर्ती भारतातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यास मोठे योगदान देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Story img Loader