– प्रशांत केणी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘स्लेजिंग’ म्हणजेच डिवचणे हे ऑस्ट्रेलियाचे प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध वापरण्याचे हुकमी अस्त्र. या अस्त्राचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य असलेला ॲन्ड्र्यू सायमंड्सची आक्रमक फलंदाज ही खासियत. त्याबरोबरच धावा रोखण्याचे काम करणारी मध्यमगती आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी, आणि त्या जोडीला अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे तो अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळखला जायचा. आज टी-२० क्रिकेटमध्ये अशी गुणवत्ता ठायी असणे म्हणजे कोटीच्या कोटी बोलीची हमीच. रविवारी अपघाती निधनामुळे जग सोडलेल्या या रांगड्या क्रिकेटपटूची कारकीर्द जशी त्याच्या अफलातून कामगिरीने गाजली, तशीच वादांमुळेही चर्चेत राहिली. ‘मंकीगेट’ प्रकरणामुळे तो भारतीयांसाठी खलनायक ठरला. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळलेल्या सायमंड्सने ऑस्ट्रेलियाच्या दोन विश्वविजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी (१४६२ धावा आणि २४ बळी), एकदिवसीय (५०८८ धावा आणि १३३ बळी) आणि ट्वेंटी -२० (३३७ धावा आणि ८ बळी) क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सायमंड्सने ‘आयपीएल’चे सुरुवातीचे काही हंगाम आपल्या अष्टपैलू खेळामुळे गाजवले. सायमंड्सच्या कारकीर्दीचा घेतलेला वेध.
सायमंड्स हा मूलवासी (अॅबोरिजिन) ऑस्ट्रेलियन होता का?
नाही. सायमंड्सचा एक जन्मदाता पालक आफ्रो-कॅरेबियन होता आणि दुसरा डॅनिश किंवा स्वीडीश. सायमंड्स तीन महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेणाऱ्या केन आणि बार्बारा या पालकांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले. याच पालकांमुळे क्रिकेटची आवड त्याच्यात जोपासली गेली. पण रॉय नावाच्या एका बास्केटबॉलपटूचा तो चाहता होता, त्यामुळे सायमंड्सचे टोपणनावही ‘रॉय’ असेच पडले.
‘मंकीगेट’ प्रकरण काय होते? यात सायमंड्सचा कशा प्रकारे समावेश होता?
हरभजन सिंग-सायमंड्स यांच्या वादावर आधारित ‘मंकीगेट’ प्रकरण तर आख्यायिका बनले आहे. २ ते ६ जानेवारी २००८ दरम्यान सिडनीला झालेल्या त्या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे कवित्व अद्याप ओसरलेले नाही. हरभजनने आपल्यावर वर्णभेदावर आधारित शेरेबाजी करीत ‘माकड’ संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली. मग हा बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल हरभजनच्या मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीत सचिनची जबानी महत्त्वाची ठरली होती. या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्याला पुरेशी साथ दिली नाही अशी खंत सायमंड्सला वाटत राहिली. बीसीसीआयच्या दबावामुळे हे प्रकरण गुंडाळले गेले, असेही त्याला वाटत राहिले. मात्र नंतर आयपीएलदरम्यान त्याने हरभजनशी मतभेद विसरून जुळवून घेतले हेही सत्य आहे.
आंतरराष्ट्रीय व कौंटी कारकिर्दीत तो कोणत्या कामगिरीमुळे विशेष लक्षात राहिला?
सायमंड्स आणि ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन हे दोघेही क्वीन्सलँड प्रांताचे आणि जानी दोस्त. क्वीन्सलँडकडून खेळताना एका सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने नाबाद १०८ केल्या होत्या. त्याच्या जन्मदाखल्यामुळे सायमंड्सला इंग्लंडकडूनही क्रिकेट खेळता येऊ शकले असते. पण त्याने ऑस्ट्रेलियाला प्राधान्य दिले. कौंटी स्पर्धेत खेळतना त्याने ग्लुस्टरशायरकडून ग्लॅमॉर्गनविरुद्ध एकदा २५४ धावा चोपल्या, ज्यात १६ षटकारांचा समावेश होता. तो त्यावेळी विक्रम होता. २००३मधील विश्वचषक स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध ४ बाद ८६ अशा अवस्थेतून ऑस्ट्रेलियाचा डावा सावरला. सायमंड्सच्या १४३ धावा त्या सामन्यातील विजयी योगदान ठरले. त्याच स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने बहुमोल ९१ धावा केल्या. टी-२० प्रकाराची सुरुवात इंग्लिश कौंटी स्पर्धेत झाली, त्यावेळी केंटकडून खेळताना त्याने एकदा मिडलसेक्सविरुद्ध ४७ चेंडूंमध्ये ११२ धावा तुडवल्या. या प्रकारात फलंदाजी कशी करायची हे त्याला सुरुवातीलाच पक्के समजले होते. अॅशेस मालिकेत मेलबर्नला केलेल्या १५६ धावा आणि २००८मधील वादग्रस्त मंकीगेट सामन्यात सायमंड्सने १६२ धावा केल्या.
‘आयपीएल’च्या दुसऱ्या हंगामातील डेक्कन चार्जर्सच्या विजेतेपदात सायमंड्सचे कोणते योगदान होते?
डेक्कन चार्जर्सनी १३.५० लाख डॉलर रकमेला सायमंड्सला संघात स्थान दिले होते. त्यावेळी ‘आयपीएल’चा तो दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला होता. २००९च्या दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बांधिलकीमुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले होते. परंतु उत्तरार्धातील आठ सामन्यांत २४९ धावा आणि सात बळी अशी अष्टपैलू कामगिरी करीत त्याने संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यातही त्याने ३३ धावा आणि १८ धावांत २ बळी असे योगदान दिले होते. ‘आयपीएल’च्या तिसऱ्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांत मुंगुस बॅटने फलंदाजी करीत त्याने लक्ष वेधले होते.
सायमंड्सची कारकीर्द लवकर का संपुष्टात आली?
मद्यपान आणि अन्य अनेक वादांमुळे २००८मध्ये सायमंड्सवर अनेकदा शिस्तपालनाची कारवाई झाली होती. २००९च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यानही त्याला मायदेशी पाठवण्यात आले होते. वर्षभरातील ही त्याच्यावर झालेली तिसरी निलंबनाची कारवाई झाली होती. परिणामी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा करार स्थगित केला. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी सायमंड्सने कौटुंबिक कारणास्तव निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
निवृत्तीनंतरही सायमंड्स कशा प्रकारे चर्चेत राहिला?
निवृत्तीनंतर सलिल अंकोला आणि विनोद कांबळी यांच्यानंतर ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेला सायमंड्स हा तिसरा क्रिकेटपटू ठरला होता. २०११मध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पतियाळा हाऊस’ या चित्रपटात त्याने एक भूमिका केली होती.