इस्रायलने गाझामध्ये आपली लढाई सुरूच ठेवली आहे आणि रशियाने युक्रेनमध्ये युद्ध पुकारलेय. या युद्धांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे आता यापुढे ड्रोन जगभरातील लष्करी कारवायांचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत ड्रोनविरोधी तंत्रज्ञान असणे आवश्यक झाले आहे. ही बाब लक्षात घेऊनच भारताने वज्र शॉट गन तयार केली आहे. ही ड्रोनविरोधी प्रणाली समावेशित असलेली बंदूक चेन्नई येथील ‘बिग बँग बूम सोल्युशन्स’ने विकसित केली आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या भारतीय नौदलाच्या नेव्हल इनोव्हेशन ॲण्ड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन (एनआयआयओ) सेमिनार ‘स्वावलंबन २०२४’मध्ये ही बंदूक सादर करण्यात आली होती. तेव्हापासून नवीन शस्त्रे चर्चेचा मुद्दा ठरत आहेत. ही भारतनिर्मित अँटी-ड्रोन गन देशाच्या सशस्त्र दलांसाठी एक मोठे वरदान असल्याचे सांगितले जात आहे. ही बंदूक कसे कार्य करते? त्याची वैशिष्ट्ये काय? त्याविषयी जाणून घेऊ.

वज्र शॉट गन म्हणजे काय?

वज्र शॉट गन ही हाताने चालविण्यात येणारी आणि वापरण्यास अगदी सोईस्कर अशी अँटी-ड्रोन बंदूक आहे. ही बंदूक ड्रोन सिग्नल शोधू शकते, ड्रोनला निकामी करू शकते आणि ड्रोन व ड्रोनचा ऑपरेटर यांच्यामधील संवादात व्यत्ययदेखील आणू शकते. चेन्नईस्थित बिग बँग बूम सोल्युशन्स’ने डिझाईन केलेल्या या बंदुकीची रेंज चार किलोमीटरपर्यंत आहे. सैनिकांना वापरण्यास अगदी सोप्या असलेल्या वज्र शॉट गनचे वजन केवळ साडेतीन किलो आहे. या बंदुकीला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणेही अगदी सोपे आहे. भारतीय बनावटीच्या या अँटी-ड्रोन गनमध्ये एक साधा एलईडी डिस्प्लेदेखील आहे आणि त्यात बॅटरी आहे, जी सतत नऊ तास चालू शकते. वज्र शॉट गनच्या यशाबद्दल बोलताना कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, कंपनीला आतापर्यंत सुमारे २५ दशलक्ष डॉलर्स (२१० कोटी रुपये) किमतीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.

Armenia has emerged as India's leading defence export destination
भारताचा सर्वांत मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आर्मेनिया; भारताला याचा किती फायदा?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?
Give Land Back to the Sea
समुद्राला जमिनीचे दान…! पूरनियंत्रणासाठी इंग्लंडमधील अभिनव प्रयोग काय होता? तो कितपत यशस्वी ठरला?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?

हेही वाचा : इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या ‘पॅलेस्टाइन निर्वासित संस्थे’वर बंदी का घातली?

वज्र शॉट गनची इतर ड्रोनविरोधी प्रणालीशी तुलना

ड्रोनविरोधी क्षेत्रात प्रगती करणारा भारत हा एकमेव देश नाही. अमेरिकेकडे ड्रोन डिफेंडर आहे. ड्रोन डिफेंडर विकसित करणारे डॅन स्टॅम सांगतात की, ड्रोन आणि पायलटमधील रेडिओ कंट्रोल फ्रिक्वेन्सीमध्ये व्यत्यय आणून ही प्रणाली कार्य करते. ड्रोन डिफेंडरचे वजन सुमारे चार किलोग्रॅम असून, ते वज्र शॉट गनपेक्षा अधिक जड आहे. ड्रोन डिफेंडर वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. मात्र, वज्र शॉट गनच्या तुलनेत ते वापरणे जरा किचकट आहे. दरम्यान, चीनकडे स्कायफेंड ब्लेडर आहे. हे एक पोर्टेबल जॅमर आहे, जे विशेषत: लहान मानवरहित हवाई वाहनांना लक्ष्य करते.

वज्र शॉट गन ही हाताने चालविण्यात येणारी आणि वापरण्यास अगदी सोईस्कर अशी अँटी-ड्रोन बंदूक आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

स्कायफेंड‌ ब्लेडरचे वजन वज्र शॉट गनपेक्षा जास्त आहे आणि त्याची जॅमिंग रेंज फक्त १५०० मीटर आहे, जी भारताच्या वज्र शॉट गनपेक्षा खूपच कमी आहे. रशियाकडे वज्र शॉट गनचे स्वतःचे व्हर्जन आहे; ज्याला REX-1 म्हणून ओळखले जाते. हे शस्त्रदेखील हातात पकडून वापरता येते. REX-1 रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स वापरून ड्रोनला नष्ट करू शकते. REX-1 वज्र‌ शॉट गनसारखे असले तरी ते आकाराने अधिक मोठे आहे.

वज्र शॉट गनसारखी शस्त्रे भारतासाठी का महत्त्वाची?

वज्र शॉट गनसारखी शस्त्रे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण- ड्रोनने जागतिक स्तरावर युद्धाची गतिशीलता बदलली आहे. गाझा आणि युक्रेन या दोन्ही देशांत सुरू असलेल्या संघर्षामध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्रोनमुळे वज्र शॉट गनसारख्या ड्रोनविरोधी प्रणालीची किती तातडीने गरज आहे हे स्पष्ट होते. अनेक संरक्षण तज्ज्ञांच्या मते- ड्रोनच्या व्यापक वापरामुळे युक्रेनसारख्या लहान राष्ट्रांना मोठ्या राष्ट्रांशी संघर्ष करणे शक्य झाले आहे. हीच बाब लक्षात घेतली गेल्याने २०१८ ते २०२३ या कालावधीत ड्रोन वापरणाऱ्या देशांची संख्या १६ वरून ४० वर पोहोचल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्याशिवाय ‘व्हिजन ऑफ ह्युमॅनिटी’च्या अहवालात असे दिसून आले आहे की, ड्रोन हल्ले आणि मृत्यूंचे प्रमाणदेखील वाढले आहे. २०२३ मध्ये ड्रोन हल्ल्यांमुळे तीन हजारहून अधिक मृत्यू झाले आहेत. २०१८ पासून ड्रोनमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. ड्रोन हल्ल्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली, २०२३ मध्ये ४,९५७ ड्रोन हल्ल्यांची नोंद करण्यात आली. २०१८ मध्ये हा आकडा केवळ ४२१ होता.

हेही वाचा : हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्यात भारती सिंगसह एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटी रुपयांचा घोटाळा?

तज्ज्ञांच्या मते- ड्रोनच्या वापरामुळे अनेक देशांना संघर्षात मनुष्यबळावरील खर्च कमी करणे शक्य झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल व इराण संघर्ष, पश्चिम आशियातील हमास व हिजबुल्ला यांच्यात सुरू झालेला संघर्ष या सर्वांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. भारतात लष्करी तज्ज्ञ हेही लक्षात घेतायत की, ड्रोन युद्ध पद्धती कशी बदलत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये तत्कालीन भारतीय लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे (निवृत्त) यांनी सांगितले होते की, ड्रोन हे युद्धाचे भविष्य आहे. “एकेकाळी २० व्या शतकातील युद्धभूमीवर मुख्य आधार ठरलेले रणगाडे, लढाऊ विमाने आता तुलनेने कमी महत्त्वपूर्ण ठरत आहेत,” असे भारतीय लष्करप्रमुख म्हणाले. अशा परिस्थितीत भारताने ड्रोनविरोधी युद्धात स्वतःला तयार करणे आवश्यक आहे आणि वज्र शॉट गन हे त्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे.

Story img Loader