पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजेला एक महिन्याहून कमी कालावधी राहिला आहे. ९ ऑक्टोबरपासून लाखो लोक दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतील. पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा हा सर्वांत मोठा उत्सव आहे. या उत्सवात हिलसा माशाला खूप महत्त्व आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहरीच्या तेलात माशांचे विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या माशांची निर्यात बांगलादेशमधून केली जाते. मात्र, दुर्गा पूजेच्या आधी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या लोकप्रिय हिलसा माशाच्या निर्यातीवर बंदी घालून भारतविरोधी धोरण दाखवून दिले आहे.

या निर्यातीवरील बंदीमुळे माशांचा तुटवडा निर्माण होईल आणि किमती वाढतील; ज्यामुळे उत्सवाच्या कालावधीत मध्यमवर्गीय कुटुंबांवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध बिघडण्याचे संकेत आहेत. भारत-बांगलादेशमधील या व्यापाराचे स्वरूप काय? हिलसाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा भारतावर कसा परिणाम होईल? हिलसा डिप्लोमसी काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
woman decomposed body in fridge
श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
दुर्गा पूजेच्या आधी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या लोकप्रिय हिलसा माशाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : जिथून करोना पसरला त्याच वुहान प्रयोगशाळेत तयार झाली लसीची मात्रा, काय आहे याचं महत्त्व?

बांगलादेशने हिलसाच्या निर्यातीवर बंदी का घातली?

या आठवड्याच्या सुरुवातीला, मत्स्यव्यवसाय आणि पशुधन पत्रकार मंचाच्या बैठकीत, बांगलादेशच्या मत्स्यव्यवसाय आणि पशुधन मंत्रालयाच्या सल्लागार फरीदा अख्तर यांनी जाहीर केले की, या वर्षी भारतात कोणतीही हिलसा निर्यात केली जाणार नाही. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने असे पाऊल का उचलले, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “कमी उत्पन्न असलेल्या बांगलादेशमधील नागरिकांना मासे परवडावेत म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. हिलसा या माशाला इलिश म्हणूनही ओळखले जाते. हे बांगलादेशचे राष्ट्रीय मासे आहेत आणि सध्या ते श्रीमंत लोकच विकत घेऊ शकतात.

“मागील सरकारने दुर्गा पूजा उत्सवादरम्यान ही बंदी उठवली होती. ते सरकार बंदी उठवण्याला भेट म्हणायचे. या वेळी आम्हाला भेटवस्तू देण्याची गरज वाटत नाही. कारण- आम्ही असे केल्यास आमचे लोक हे मासे खाऊ शकणार नाहीत. बंदी नसताना या माशांची भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते,” असे अख्तर यांनी बीबीसीला सांगितले. मुख्य म्हणजे जगातील ७० टक्के हिलसा मासे बांगलादेशात आढळतात. बांगलादेशने २०१२ मध्ये तिस्ता नदीच्या पाणीवाटप करारावरील वादामुळे हिलसाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दुर्गा पूजेदरम्यान ही बंदी उठवली होती. २०२२ मध्ये बांगलादेशने ही बंदी पूर्णपणे उठवली आणि त्यानंतरच्या वर्षी नऊ मालवाहू ट्रक (प्रत्येकी पाच टन मासे) पश्चिम बंगालच्या २४ परगणा (एन)मधील बोनगाव येथील पेट्रापोल लॅण्ड पोर्टमार्गे बारिशालहून पाठविण्यात आले होते, असे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले आहे.

हिलसा माशांच्या निर्यातीवर बंदी घातल्याने टंचाई निर्माण होईल. (छायाचित्र-पीटीआय)

बांगलादेशचे सांगणे आहे की, आता उचललेले हे पाऊल केवळ देशातील हिलसा माशांची किंमत कमी करण्याच्या उद्देशाने उचलण्यात आले आहे. तर, इतरांचे सांगणे आहे की, हे बांगलादेशमधील भारतविरोधी भावनांचे आणखी एक उदाहरण आहे. एका सूत्राने ‘टेलिग्राफ’ला सांगितले की, युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या हिलसाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. “किमती कमी होत नसल्या तरी निर्यातबंदीची बातमी इथल्या लोकांना खूश करील. बंदीमागील हेच मुख्य कारण आहे.” ऑगस्टच्या सुरुवातीला शेख हसीना पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर या भावना वाढल्या आहेत. त्यांनी देशातून पळ काढल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशमधील नागरिक नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

परंतु, अंतरिम सरकारमधील अधिकाऱ्याने या दाव्यांचे खंडन केले, “कृपया याला भौगोलिक राजकारण म्हणू नका. यावेळी निर्यातबंदी प्रामुख्याने कमी उपलब्धतेमुळे आहे.” जेव्हा बीबीसीने विचारले की, अंतरिम सरकार सदिच्छा म्हणून सीमेपलीकडे हिलसा पाठवू शकते का, तेव्हा अख्तर म्हणाल्या, “आमच्याकडे इतर सर्व मार्गांनी सद्भावना असेल. ते आमचे मित्र आहेत; पण आमच्या लोकांना अडचणीत टाकून आम्ही काहीही करणार नाही. सद्भावनेचा प्रश्न यापासून वेगळा आहे.”

दुर्गा पूजेदरम्यान काय परिणाम होईल?

हिलसा माशांच्या निर्यातीवर बंदी घातल्याने टंचाई निर्माण होईल. बंगाली लोक निराश होतील. पूजेच्या वेळी सर्व घरांमध्ये शिजविल्या जाणार्‍या हिलसा माशांच्या अभावामुळे मुख्य पदार्थांच्या किमती खूप वाढतील. सध्या एक किलोपेक्षा जास्त वजनाचे हिलसा मासे बाजारात २,००० ते २,२०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जातात. कोलकाता येथील फिश इम्पोर्टर्स असोसिएशनच्या सदस्याने ‘द टेलिग्राफला’ सांगितले, “बांगलादेशी हिलसा उपलब्ध नसल्यामुळे किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.” काही व्यापारी हिलसा मासे म्यानमारमधून आणतील; मात्र त्यामुळे माशांच्या किमती वाढतील. एका किरकोळ विक्रेत्याने ‘इंडिया टुडे’ला सांगितले, “आम्ही बांगलादेशातून मागविलेले एक ते १.३ किलो वजनाचे हिलसा मासे आता २,२०० ते २,४०० रुपये प्रतिकिलोने विकत आहोत. काही महिन्यांपूर्वी त्याची किंमत १,८०० ते २,००० रुपये प्रतिकिलो होती.” ते पुढे म्हणाले की दुर्गा पूजेदरम्यान बांगलादेशी हिलसा मासे उपलब्ध होतील. परंतु, पुरवठ्याच्या समस्यांमुळे किमती वाढतील.

‘हिलसा डिप्लोमसी’ काय आहे

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिलसा माशांच्या निर्यातीवर बंदी घातल्याने ‘हिलसा डिप्लोमसी’चा अंत झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘हिलसा डिप्लोमसी’ची चर्चा होत असे. बंगालच्या उपसागरात आणि आजूबाजूच्या नद्यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारा तेनुलोसा इलिशा नावाचा हा मासा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये मुत्सद्देगिरीचे प्रतीक म्हणून वापरला होता. ही प्रथा १९९६ पासून सुरू झाली. शेख हसीना यांनी पहिल्यांदा पदभार स्वीकारला आणि गंगा पाणीवाटप कराराच्या अगदी आधी तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना हिलसा माशाची भेट दिली.

हेही वाचा : हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?

२०१६ मध्ये ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा हसीना यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्यांना हिलसाची खेप पाठवली. त्यानंतरच्या वर्षी हसीना यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ३० किलो हिलसा मासे भेट म्हणून दिले होते. जूनमध्ये नुकत्याच झालेल्या त्यांच्या भारत भेटीनंतरही, त्यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांना ५० किलो हिलसा मासे पाठविले होते. बंगाली लोकांमध्ये हिलसा माशाला खूप महत्त्व आहे. बंगाली संस्कृतीतही या माशाला विशेष स्थान आहे. बंगाली साहित्यातही या माशांचा उल्लेख आढळतो. उदाहरणार्थ- १९व्या शतकातील कादंबरीकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हिलसाविषयी लिहिल्याचे दिसून येते.

Story img Loader