बांगलादेशात भारताविरुद्धचा रोष कायम आहे. सोमवारी (२६ ऑगस्ट) ढाका येथील व्हिसा केंद्रावर पुन्हा बांगलादेशी नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळाला. स्थानिकांनी व्हिसा मिळण्यात विलंब झाल्याने आणि कथित छळवणुकीबद्दल संताप व्यक्त केला. शेख हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशात भारतविरोधी द्वेषाची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. यापूर्वी बांगलादेशातील फेनी येथील स्थानिकांनी आरोप केला होता की, भारताने जाणीवपूर्वक त्रिपुरामधील धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे बांगलादेशात पूरस्थिती निर्माण झाली; पण नक्की बांगलादेशमध्ये काय घडतंय? व्हिसा कार्यालयाबाहेर निषेध का करण्यात आला? आणि बांगलादेशात भारताविरुद्ध एवढा रोष का आहे? याविषयी सविस्तर समजून घेऊ.

व्हिसा कार्यालयाबाहेरील निषेधाचे कारण काय?

सोमवारी (२६ ऑगस्ट) शेकडो बांगलादेशींनी सातखिरा येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रावर गोंधळ घातला. अनेक अर्जदारांना लांबच लांब रांगेत थांबूनही व्हिसा मिळू न शकल्याने स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. वटारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मजहरुल इस्लाम यांनी ‘न्यू एज’ला सांगितले की, सकाळी १०.३० च्या सुमारास आंदोलने सुरू झाली आणि दुपारी १ वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोकांनी त्यांची कागदपत्रे घेण्यासाठी व्हिसा केंद्राबाहेर रांग लावली होती. ही रांग जवळजवळ एक किलोमीटर लांब होती. मात्र, केंद्रातील कर्मचाऱ्यांनी व्हिसाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे सांगताच स्थानिक संतप्त झाले आणि “भारतीय सहकाऱ्यांनो, सावध राहा. आमची एक मागणी आहे की, आम्हाला व्हिसा हवा आहे,” अशी घोषणाबाजी त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
सोमवारी (२६ ऑगस्ट) शेकडो बांगलादेशींनी सातखिरा येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रावर गोंधळ घातला. (छायाचित्र-शौमिक साहेब/एक्स)

हेही वाचा : टेलीग्रामच्या संस्थापकाला फ्रान्समध्ये अटक; कोण आहेत पावेल दुरोव्ह? दुबईतील महिलेचा त्यांच्या अटकेशी काय संबंध?

आंदोलकांपैकी एक असलेल्या रुस्तम अलीने बांगलादेशी दैनिक ‘ढाका ट्रिब्यून’कडे आपली निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, “भारतीय व्हिसा मिळणे ही नशिबाची बाब झाली आहे. तुमच्या शेवटच्या प्रयत्नाला दोन महिने उलटून गेल्याशिवाय तुम्ही पुन्हा अर्ज करू शकत नाही. अर्जाची फी ८७५ रुपये आहे आणि व्हिसा १५ दिवसांच्या आत जारी करायचा असला तरी अनेकदा दोन-तीन महिने लागतात आणि तरीही व्हिसा येत नाही किंवा पासपोर्टही परत मिळत नाही. वैद्यकीय कारणांसाठी भारतात जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक बांगलादेशी वैद्यकीय आणि शैक्षणिक कारणांसाठी भारतात प्रवास करतात. भारताची आरोग्य सेवा इतर देशांच्या तुलनेने चांगली आहे; ज्यात स्वस्त दरात विशेष उपचार, शस्त्रक्रिया आणि आरोग्य सेवांचा लाभ घेता येतो. तथापि, बांगलादेशातील गोंधळाचा दुष्परिणाम बांगलादेशातून भारतात येणाऱ्या जनप्रवाहावर झाला आहे.

दुसऱ्या स्थानिकानेही या परिस्थितीवर आपला संताप व्यक्त केला. “मी माझा पासपोर्ट तीन महिन्यांपूर्वी जमा केला होता; पण आता तो व्हिसाशिवाय परत करण्यात आला आहे. ते नाकारण्याचे कारणही देत ​​नाहीत. त्याशिवाय व्हिसा कार्यालयातील कर्मचारी आमच्याशी उद्धटपणे वागतात. थोडीशीही चूक झाली तरी ते पासपोर्ट बुक आमच्याकडे फेकून देतात,” असे त्यांनी ‘ढाका ट्रिब्यून’ला सांगितले. व्हिसा केंद्राचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी कर्मचारी मात्र हादरले आहेत. या परिस्थितीमुळे भारतीय उच्चायुक्तांनी ढाका येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या सूचना पत्रात म्हटले आहे की, कोणतीही तोडफोड किंवा कोणताही शारीरिक हल्ला झाला नसला तरी व्हिसा केंद्रातील कर्मचारी घाबरले आहेत आणि त्यांना मर्यादित सेवांसह हे केंद्र चालू ठेवणे कठीण झाले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने ढाका केंद्रात मर्यादित कामकाज पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार पडल्यानंतर अस्थिर परिस्थितीमुळे केंद्रे बंद होती. मात्र, पुन्हा या निषेधाने परिस्थिती बिघडली आहे आणि केंद्रे बंद राहण्याची शक्यता आहे.

पूरस्थितीसाठीही ठरवले भारताला जबाबदार

बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी भावना आहेत. अशातच व्हिसा प्रक्रिया केंद्रावर हा गोंधळ झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्रिपुरातील गोमती नदीवरील धरणातून पाणी सोडल्यामुळे पूर्व बांगलादेशात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दावे समोर आल्यानंतर बांगलादेशींनी भारताबाबत संताप व्यक्त केला. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील दोन विद्यार्थी प्रतिनिधींपैकी एक नाहिद इस्लाम यांनी पत्रकारांना सांगितले होते, “भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता, धरण उघडून अमानुषता दाखवली.”

या आठवड्याच्या सुरुवातीला त्रिपुरातील गोमती नदीवरील धरणातून पाणी सोडल्यामुळे पूर्व बांगलादेशात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दावे समोर आल्यानंतर बांगलादेशींनी भारताबाबत संताप व्यक्त केला. (छायाचित्र-रॉयटर्स)

एका वेगळ्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “जी पिढी भारताला आपला शत्रू समजते, ती राष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मुले आहेत. हे बांगलादेशातील दिग्गज राजकारण्यांपैकी एक दिवंगत मौलाना अब्दुल हमीद खान भाशानी यांनी वारंवार केलेले विधान आहे.” भारत बांगलादेशला सीमापार नद्यांच्या पाण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप त्यांनी अनेकदा केला होता. बांगलादेशातील नागरिकांमध्ये इतका रोष होता की, ज्यांच्या घरांमध्ये हे पाणी शिरले, ते ओरडताना दिसले आणि “हे भारतीय पाणी आहे. आम्ही भारताचा द्वेष करतो”, असे म्हणताना दिसले.

भारताने हे सर्व दावे फेटाळून लावले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “बांगलादेशच्या पूर्व सीमेवरील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याविषयी आम्ही चिंता व्यक्त केली आहे.” त्यांनी बांगलादेशातील पूर धरणाच्या खाली असलेल्या मोठ्या पाणलोटांमुळे आल्याचे निदर्शनास आणले. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांतून वाहणाऱ्या गोमती नदीच्या पाणलोट क्षेत्रात अलीकडच्या काही दिवसांत जास्त पाऊस झाला. या नदीवर डंबूर धरण बांधलेले आहे. या धरणाच्या खाली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने बांगलादेशात पूर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतविरोधी भावना

भारताचा शेजारी देश बांगलादेशने अलीकडच्या काळात भारताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग पुन्हा सत्तेवर आल्यानंतर याची सुरुवात झाली. विरोधकांनी सोशल मीडियावर भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्याची मोहीम सुरू केली. त्यावेळी हसीना यांच्या अनेक विरोधकांचा असा विश्वास होता की, भारताने आपल्या प्रभावाचा वापर करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना हसीना यांच्याबाबत अधिक अनुकूल भूमिका स्वीकारण्यास भाग पाडले. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या संघटक सचिव शमा ओबेद यांनी ‘द हिंदू फ्रंटलाइन’ला सांगितले, “भारताच्या हस्तक्षेप आणि समर्थनामुळे निवडणुकीत हेराफेरी करून, हसीना सत्तेवर राहिल्याचा समज वाढत आहे.”

हसीना यांच्या पतनानंतर ही भारतविरोधी भावना आणखीनच वाढली. देशातून पळून गेल्यानंतर माजी पंतप्रधानांना भारतात आश्रय देण्यात आला, या वस्तुस्थितीने अनेकांना अस्वस्थ केले आहे. एका विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने ‘द प्रिंट’ला सांगितले, “त्यांनी (शेख हसीना) आपल्या लोकांबरोबर काय केले हे जाणूनदेखील भारताने त्यांना आश्रय दिला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांवर अत्याचार केले, निवडणुकीत फेरफार केला, सर्व विरोधी नेत्यांना अटक केली आणि भारताने त्यांचे स्वागत केले. का?,” असा प्रश्न त्या विद्यार्थ्याने केला.

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे नेते अब्दुल मोईन खान यांनी यावर बोलताना म्हटले, “बांगलादेशी रागावलेले नाहीत, तर दुखावले गेले आहेत. कारण- त्यांनी याची कधीच अपेक्षा केली नव्हती.” त्याशिवाय, काही भारतीय माध्यमांनी विद्यार्थी चळवळीचे चित्रण हिंदूंवर हल्ला असे केल्याने बांगलादेशी नाराज झाले आहेत. निवृत्त व्यावसायिक एबी सिद्दिकी यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, काही भारतीय प्रसारमाध्यमांनी निषेध आंदोलनाला हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ला, नरसंहार म्हणून दाखवले. परंतु प्रत्यक्षात, निषेध हा विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी होता. त्यात सर्व बांगलादेशी नागरिक होते आणि त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता.

हेही वाचा : बस अडवली, ओळख विचारली अन् २३ जणांना घातल्या गोळ्या; बलुच अतिरेक्यांनी का केले पंजाबी प्रवाशांना लक्ष्य?

मात्र, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे नेते मुहम्मद युनूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांशी संवाद साधला आहे. त्यांनी एकमेकांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ऑगस्ट रोजी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसैन म्हणाले की, अंतरिम सरकार द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी भारताबरोबर काम करू इच्छित आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांसह विविध समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे वचनही त्यांनी दिले.