आसिफ बागवान

Apple Event September 2022 : तुम्ही अ‍ॅपलच्या आयफोनचे वापरकर्ते असाल वा नसाल, पण अ‍ॅपलच्या नवनवीन उत्पादनांची घोषणा करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सप्टेंबर इव्हेंट’ची उत्कंठा तुम्हालाही असेल. याचं कारणही सरळ आहे. अ‍ॅपलची ही वार्षिक परिषद केवळ त्या कंपनीच्याच नव्हे तर तंत्रज्ञान जगतातील भविष्याची दिशा ठरवणारी असते. अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी या वार्षिक परिषदेची प्रथा सुरू केली आणि त्यांच्या कार्यकाळात या परिषदेला तंत्रजगतात कमालीचे महत्त्व लाभले. ही परंपरा जॉब्स यांच्या निधनानंतरही खंडित झालेली नाही. मात्र, आजच्या अ‍ॅपलच्या कार्यक्रमाबाबत तंत्रजगतात विशेष हवा निर्माण झाली आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमात अ‍ॅपल नवीन आयफोन १४ची घोषणा करणार, हे तर निश्चित आहे. मात्र, या आयफोन १४मध्ये अ‍ॅपल सॅटेलाइट नेटवर्कची सुविधाही देणार असल्याची चर्चा आहे. ही सुविधा नेमकी कशी असेल, अ‍ॅपलच्या कार्यक्रमात काय काय नवीन उत्पादने सादर होतील आणि हा कार्यक्रम कुठे पाहता येईल, आदी प्रश्नांची उत्तरे मांडण्याचा हा प्रयत्न.

अ‍ॅपलचा आजची दूरसंवाद परिषद कुठे होणार? कशी पाहता येणार?

सालाबादप्रमाणे अ‍ॅपलचा सप्टेंबर कार्यक्रम अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल पार्क या कंपनीच्या मुख्यालयातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये पार पडणार आहे. करोनापूर्वी हा कार्यक्रम जंगी स्वरूपात आयोजित करण्यात येत असे. त्यात जगभरातील प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार, ब्लॉगर्स यांना निमंत्रण असे. मात्र, २०२० पासून हा कार्यक्रम ऑनलाइन होत आहे. यावर्षीही हा कार्यक्रम ऑनलाइन होत आहे. मात्र करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने अ‍ॅपलने मर्यादित मंडळींना कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचे समजते. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होईल. हा कार्यक्रम अ‍ॅपल इव्हेंटच्या (https://www.apple.com/in/apple-events/) संकेतस्थळावरून किंवा यूट्युबवरून पाहता येईल. तुम्ही अ‍ॅपल टीव्हीचे सभासद असाल तर अ‍ॅपल टीव्हीवरून हा कार्यक्रम विनासायास पाहता येईल.

Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
aamir give advice to kiran rao to be nice wife
घटस्फोटानंतर चांगली जोडीदार होण्यासाठी सल्ला देणाऱ्या आमिर खानला किरण राव म्हणाली, “मी…”
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?

आजच्या कार्यक्रमात नवीन काय सादर होणार?

अ‍ॅपलच्या दरवर्षीच्या कार्यक्रमाप्रमाणे यंदाही आयफोनसह अ‍ॅपलच्या इतर काही उत्पादनांच्या नवीन किंवा सुधारित आवृत्त्यांची घोषणा होणार आहे. यामध्ये आयफोन १४ हे प्रमुख आकर्षण असेल. आयफोन १४ मालिकेतील चार किंवा पाच फोनचे सादरीकरण आजच्या कार्यक्रमात होईल. याशिवाय अ‍ॅपल वॉच सिरीज आठ, आयपॅड प्रो, एअरपॉड्स प्रो ही उत्पादनेही आजच्या कार्यक्रमातून जगासमोर मांडली जाणार आहेत.

Apple iphone : ‘या’ देशात आयफोन विक्रीवर बंदी; कारण जाणून तुम्ही व्हाल हैराण

आयफोन १४मध्ये नवीन काय असेल?

आयफोन १३च्या तुलनेत अधिक शक्तिशाली प्रोसेसर, कॅमेरा, अधिक बॅटरी क्षमता आणि झटपट चार्जिंगची सुविधा ही आयफोन १४ची वैशिष्ट्ये असू शकतील. या मालिकेत अ‍ॅपल आयफोन १४, आयफोन १४ प्रो, आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो मॅक्स हे नवीन आयफोन सादर करेल. आयफोनच्या मागील दोन मालिकांमध्ये कंपनीने त्या-त्या श्रेणीत ‘मिनी’ आयफोन आणले होते. मात्र, यावेळी त्याला फाटा देऊन अ‍ॅपल अधिक मोठा डिस्प्ले असलेले आयफोन प्लस आणि प्रो मॅक्स आणणार, अशी चर्चा आहे. या दोन्ही आयफोनचा डिस्प्ले ६.७ इंच इतका असू शकतो.

सॅटेलाइट सुविधेचे काय?

अ‍ॅपलच्या यंदाच्या कार्यक्रमाबद्दलची उत्कंठा वाढण्याचे प्रमुख कारण आयफोनला सॅटेलाइट नेटवर्कची जोड देण्यात आल्याबद्दलची चर्चा आहे. आयफोन १४च्या प्रीमियम किंमत श्रेणीतील मॉडेलमध्ये सॅटेलाइट नेटवर्कींगची सुविधा असेल, अशी शक्यता बळावली आहे. या सुविधेमुळे मोबाइल नेटवर्क टॉवरविना उपग्रहाच्या आधारे आयफोनवरून कोणाशीही संपर्क साधणे शक्य होणार आहे. याचा विशेष फायदा, डोंगरखोऱ्यांतील अतिदुर्गम भागात, जिथे मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसेल, तेथे होणार आहे. ही सुविधा बचाव कार्यासाठी अतिशय फायद्यााची ठरेल, असे म्हटले जात आहे. याबाबत अ‍ॅपलने अधिकृतपणे काही सांगितले नसले तरी त्यासाठीची हार्डवेअर चाचणी कंपनीने पूर्ण केल्याचे समजते. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.