आसिफ बागवान
Apple Event September 2022 : तुम्ही अॅपलच्या आयफोनचे वापरकर्ते असाल वा नसाल, पण अॅपलच्या नवनवीन उत्पादनांची घोषणा करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सप्टेंबर इव्हेंट’ची उत्कंठा तुम्हालाही असेल. याचं कारणही सरळ आहे. अॅपलची ही वार्षिक परिषद केवळ त्या कंपनीच्याच नव्हे तर तंत्रज्ञान जगतातील भविष्याची दिशा ठरवणारी असते. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी या वार्षिक परिषदेची प्रथा सुरू केली आणि त्यांच्या कार्यकाळात या परिषदेला तंत्रजगतात कमालीचे महत्त्व लाभले. ही परंपरा जॉब्स यांच्या निधनानंतरही खंडित झालेली नाही. मात्र, आजच्या अॅपलच्या कार्यक्रमाबाबत तंत्रजगतात विशेष हवा निर्माण झाली आहे. आज होणाऱ्या कार्यक्रमात अॅपल नवीन आयफोन १४ची घोषणा करणार, हे तर निश्चित आहे. मात्र, या आयफोन १४मध्ये अॅपल सॅटेलाइट नेटवर्कची सुविधाही देणार असल्याची चर्चा आहे. ही सुविधा नेमकी कशी असेल, अॅपलच्या कार्यक्रमात काय काय नवीन उत्पादने सादर होतील आणि हा कार्यक्रम कुठे पाहता येईल, आदी प्रश्नांची उत्तरे मांडण्याचा हा प्रयत्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा