iPhone New Charging System: पर्यावरण रक्षणाचे कारण देत आयफोनने आपल्या फोनसह चार्जर देणे बंद केल्यावर जगभरातील ios वापरकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. आता २०२४ मध्ये आयफोनच्या संदर्भातील आणखी एक नवे अपडेट समोर येण्याच्या चर्चा आहेत. युरोपियन युनिअनने (EU) अलीकडेच सर्व ब्रॅंड्सच्या उपकरणांसाठी सिंगल चार्जिंग सिस्टीम वापरण्याचा निर्णय घेतल्यावर आता नियमानुसार ऍपलला सुद्धा आपल्या चार्जरमध्ये बदल करावा लागू शकतो. सध्या आयफोनमध्ये लायटनिंग केबलद्वारे चार्जिंग केले जाते मात्र युरोपियन नियमानुसार यापुढे केवळ टाईप सी प्रकारच्या यूएसबी केबलनेच चार्जिंग केले जावे असे सांगण्यात आले आहे. यानुसार आता आयफोनमध्ये नेमके काय बदल होणार व नवीन चार्जिंग सिस्टीम कशी असणार जाणून घ्या…

युरोपचा कॉमन चार्जर नियम काय आहे?

यावर्षीच्या सुरुवातीला युरोपियन युनिअनने सर्व विद्युत उपकरणांसाठी एकच चार्जर पोर्टल असावे असा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सध्या संसदेत बहुमताने स्वीकारण्यात आला असून आता लवकरच हा नियम अवलंबला जाणार आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड

कॉमन चार्जर नियम कधी लागू होईल?

कॉमन चार्जर नियम हा २०२४ च्या उत्तरार्धात लागू होणार आहे. सर्व मोबाईल उत्पादक कंपन्यांनी सांगितल्यानुसार पुढील काही महिन्यात टाईप सी पोर्टलचे चार्जिंग केबल तयार करण्यासाठी हार्डवेअर उपलब्ध करून दिले जाईल. मोबाईल फोन, टॅबलेट, ई- रिडींग, पोर्टेबल स्पीकर, कॅमेरा, हेडफोन, हेडसेट्स, व्हिडीओ गेम आणि अशी सर्व उपकरणे जी आपण केबलच्या माध्यमातून चार्ज करतो त्यामध्ये हे नवे बदल लागू असतील. २०२४ च्या दुसऱ्या सहा महिन्यात टाईप सी यूएसबी पोर्टल सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे.

कॉमन चार्जर नियमाने कसा फायदा होणार?

युरोपियन संसदेच्या माहितीनुसार, दरवर्षी विविध विद्युत उपकरणांचे ग्राहक २५० युरो केवळ वेगवेगळे चार्जर घेण्यावर खर्च करतात. जर का अशा प्रकारची कॉमन चार्जर सिस्टीम अस्तित्वात आली तर हा विनाकारण खर्च वाचवता येईल. इतकेच नव्हे तर याचा पर्यावरणासाठीही फायदाच होणार आहे. दरवर्षी खराब झालेले, बंद पडलेले चार्जर जे फेकून दिले जातात त्यामुळे ११,००० टन इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो. या नव्या नियमामुळे ग्राहकांचा खर्च वाचवण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मदत होईल असे युरोपियन युनियनचे मत आहे.

कॉमन चार्जर नियम Apple iPhone ला लागू होणार का?

२०१३ मध्ये ऍपलने आयफोन ५ लाँच करताना सोबत लायटनिंग पोर्टल चार्जिंग सिस्टीम जगासमोर आणली होती. पण आता युरोपच्या नियमानुसार ऍपलला सुद्धा टाईप सी यूएसबी पोर्टलने चार्जिंग करण्याची सोय होईल असे बदल फोनमध्ये करावेच लागणार आहेत. टेक जगतातील चर्चांनुसार आयफोनच्या २०२४ मधील नव्या मॉडेलमध्ये टाईप- सी यूएसबी पोर्टल पाहायला मिळू शकते. २०२३ पर्यंत ऍपल या नव्या बदलाची अंमलबजावणी करण्यास सक्षम असेल असेही सांगण्यात आले आहे.

विश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

सर्व आयफोनमध्ये टाईप सी चार्जिंग अनिवार्य होणार का?

हे नवे नियम युरोप व ब्राझीलच्या अख्तयारीत असल्याने कदाचित सर्वच आयफोनमध्ये बदल केले जाणार नाहीत. अन्य देशांनी अद्याप तरी कॉमन चार्जिंग पोर्टलचा निर्णय घेतला नसल्याने ऍपलला लायटनिंग पोर्टल चार्जिंग सिस्टीम पूर्णतः काढून टाकावी लागणार नाही. पण खर्च बघता सर्वच देशात हा नियम पळून कॉमन सिस्टीम निर्माण करणे आयफोन उत्पादकांनाही फायद्याचे ठरेल.

आयफोनने जर टाईप सी पोर्टल आणले नाही तर..

ऍपलला जर आयफोनमध्ये टाईप सी पोर्टल आणायचे नसेल तर पोर्टलेस म्हणजेच विना केबल चार्जिंग सिस्टीम तयार करणे हा एक अन्य पर्याय आहे. युरोपियन युनियनचा नियम हा चार्जिंग केबल संदर्भातील आहे त्यामुळे ऍपल केबल वगळता चार्जिंगची सिस्टीम बनवण्याचा विचार करू शकतो. मात्र युरोप हे आयफोनच्या सर्वात मोठे व्यवसाय क्षेत्र असताना नियमाचे पालन न करण्याचा विचार कदाचित ऍपल करणार नाही.

दरम्यान, जर आयफोन उत्पादकांनी हा नियम मेनी केला तर केवळ फोनमध्येच नव्हे तर ऍपलची सर्व उत्पादने मॅक बुक, आयपॅड याच्या विविध व्हर्जनमध्येही चार्जिंग पोर्टल बदलावे लागेल.

Story img Loader