Did the Mahabharata really happen? भारतीय संस्कृतीत रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामायण किंवा महाभारत खरंच घडलं का? या प्रश्नावरून नेहमीच वाद होताना दिसतो. परंतु या महाकाव्यांचा भारतीय संस्कृतीवरील प्रभाव वगळून चालणार नाही. म्हणूनच या दोन्ही महाकाव्यांशी संबंधित इतिहासाचा आढावा वारंवार घेतला जातो. अलीकडेच दिल्लीचा पुराना किला पर्यटन मंत्रालयाच्या ‘ॲडॉप्ट अ हेरिटेज’ योजनेंतर्गत, दालमिया ग्रुपच्या सभ्यता फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान या स्थळाचा संबंध महाभारताशी असल्याचे वारंवार नमूद करण्यात आले. तसेच या स्थळावरील उत्खननादरम्यान या स्थळावर जे पुरातत्त्वीय अवशेष सापडले, त्यांचे प्रदर्शन देखील या कार्यक्रमादरम्यान भरविण्यात आले होते. यात प्रामुख्याने पेंटेड ग्रे वेअर किंवा राखाडी रंगाची मृदभांडी हे प्रमुख आकर्षण होते.

अधिक वाचा: श्रीकृष्णाच्या गोवर्धन पर्वताजवळ सापडले तब्बल २५०० वर्षांपेक्षा जुने ‘यज्ञकुंड’; पुरातत्त्वीय उत्खननात नेमके काय सापडले?

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

हेरिटेज अँड इव्हेंट्स ऑफ सभ्यता फाऊंडेशनचे सीईओ अजय वर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, इथले सर्व पर्यटन कार्यक्रम, म्युझियम, इंटरप्रिटेशन सेंटर आणि वारसा वॉक हे महाभारताभोवती केंद्रित असतील. हुमायूनने किला बांधला, परंतु या स्थळावर पांडवांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे आमच्यासाठीही तेच महत्त्वाचे असेल. शिवाय भारतीय पुरातत्त्व खात्याने घोषित केल्याप्रमाणे येणाऱ्या काही महिन्यात या स्थळावर सातव्यांदा उत्खनन करण्यात येणार आहे.

याच ठिकाणी २०१४ साली झालेल्या उत्खननात पुरातत्त्व अभ्यासकांना पेंटेड ग्रे वेअरचे अवशेष सापडले. आणि या स्थळाचा संबंध महाभारताशी जोडला गेला. अयोध्येतील उत्खननासाठी प्रसिद्ध असेलेल्या बी.बी. लाल यांनी या स्थळावर १९५४ साली सर्वप्रथम उत्खनन केले होते. बी बी लाल यांनी पेंटेड ग्रे वेअर या मृदभांड्यांचा संबंध महाभारताच्या काळाशी जोडला होता. त्याच पार्श्वभूमीवर पेंटेड ग्रे वेअर (PGW) आणि महाभारत यांचा नेमका संबंध काय हे जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरावे.

पेंटेड ग्रे वेअर

पेंटेड ग्रे वेअर किंवा PGW ही एक पातळ, गुळगुळीत, राखाडी रंगाची अत्याधुनिक फायरिंग तंत्राद्वारे तयार केली गेलेली मृदभांडी होती. राखाडी रंगावर काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या मदतीने भौमितीय आकृत्या हे या मृदभांड्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या भांड्यांमध्ये मुख्यत्त्वे वाट्या, डिश यांचा समावेश होतो. ही मृदभांडी इंडो-गँजेटिक मैदानी प्रदेश, सतलज खोरे आणि अप्पर गँजेटिक मैदानी प्रदेशात आढळतात. PGW या मृदभांड्यांचा अंदाजे काळ इसवी सन पूर्व ११०० ते इसवी सन पूर्व ५००/४०० या दरम्यानचा आहे. महाभारत नेमके कधी रचले गेले या संदर्भात अभ्यासकांमध्ये एकवाक्यता नसली तरी काही अभ्यासक हे महाकाव्य इसवी सन पूर्व ४०० ते इसवी सन ४०० या कालखंडादरम्यान रचले गेल्याचे मनात. तर इतर काही अभ्यासक ते इसवी सन पूर्व दुसरे ते इसवी सन पहिल्या शतकादरम्यान केव्हातरी लिहिले गेले असावे असे मानतात.

या विशिष्ट प्रकारच्या मातीच्या भांड्यांचा महाभारताशी काय संबंध आहे?

ASI चे पुरातत्त्वशास्त्रज्ञ वसंत स्वर्णकर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, हस्तिनापूर, तिलपत आणि कुरुक्षेत्र यांसारख्या पुरातत्त्वीय स्थळांवर बी बी लाल यांनी उत्खनन केले होते. या प्रत्येक स्थळाचा संबंध महाभारताशी आहे. या स्थळांचा उल्लेख या महाकाव्यामध्ये सापडतो. तसेच या सर्व स्थळांवर PGW चे अवशेष सापडले आहेत. आणि पुराना किला येथेही तेच अवशेष सापडणे त्यांचा महाभारताशी असलेला संबंध विशद करतो. ते पुढे म्हणाले, या स्थळावरील उत्खननात आम्हाला PGW चे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आम्ही निश्चितच सांगू शकतो की, दिल्लीचा इतिहास इसवी सनपूर्व १२०० वर्षे मागे जातो. बी बी लाल यांनी महाभारत आणि पीजीडब्ल्यू या मृदभांड्यांचा नेमका संबंध काय आहे, हे सिद्ध केले आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की, या ठिकाणी महाभारतकालीन वस्ती झाली असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर उत्खननासाठी प्रसिद्ध असलेले पुरातत्वशास्त्रज्ञ आरएस बिश्त (ASI चे निवृत्त संयुक्त महासंचालक) यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की “PGW आणि महाभारत यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यामागे एकमेव कारण आहे. ते म्हणजे PGW सापडलेल्या स्थळांचा संदर्भ महाकाव्यात येतो.” तर एएसआयचे विद्यमान महासंचालक वायएस रावत यांनी PGW-पीजीडब्ल्यू आणि महाभारत यांच्यातील संबंधाबाबत साशंकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणले “पीजीडब्ल्यूला महाभारताशी जोडणे कठीण आहे. कारण महाभारतातील घटना प्रत्यक्षात घडल्या की नाहीत हे आम्हाला माहीत नाही.” ते पुढे म्हणाले लाल यांनी उत्खनन केलेल्या अनेक स्थळांवर पीजीडब्ल्यूपेक्षा जुने सांस्कृतिक स्तर आढळले आहेत. एक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून मी हे महाभारताचे ठिकाण आहे असे म्हणणार नाही.”

इतिहासकार उपिंदर सिंग स्पष्ट करतात की, महाभारतातील कथेशी संबंधित स्थळांवर PGW सापडणे म्हणजेच या स्थळांवर “सुमारे इसवी सन पूर्व १००० पासून वस्ती होती आणि तेथे राहणारे लोक समान संस्कृतीशी संबंधित होते” इतकेच सूचित करते. त्या पुढे अधोरेखित करतात, ‘महाभारत कथेशी संबंधित नसलेल्या ही अनेक स्थळांवर PGW ही मृदभांडी सापडलेली आहेत. दिल्ली आणि दिल्लीच्या सभोवतालच्या परिसरातील सलीमगड, मजनू-का-टिला, भोरगड, मंडोली, खारखरी नाहर, झटीक्रा, बादली की सराईजवळ गॉर्डन हायलँडर्स कॉलम, बँकनेर आणि छनसा शिवाय सिही (गुडगाव), बिसरख (ग्रेटर नोएडा), लोनी (गाझियाबाद) आणि भोपनी (फरीदाबाद) यासारख्या अनेक महाभारताशी संबंध नसलेल्या स्थळांवरही ही मृदभांडी सापडली आहेत. त्यामुळे PGW म्हणजेच महाभारताशी संबंध असे नाही, तर या मृदभांड्यांचा आढळ हा समान आणि समकालीन संस्कृतीचा द्योतक आहे.

पुराना किला येथे PGW शोधण्याचे पूर्वीचे प्रयत्न

इतिहासकार उपिंदर सिंग म्हणतात की, पांडवांच्या प्राचीन राजधानीचा म्हणजेच इंद्रप्रस्थ आणि पुराना किला यांचा संबंध नेहमीच लावण्यात आला आहे. १६ व्या शतकात मुघल साम्राज्याचा वजीर अबुल फझल याने ‘ऐन-ए-अकबरी’ या ग्रंथात “महाभारतातील घटनांचा सारांश दिला आहे आणि म्हटले आहे की दिल्लीला प्रथम इंद्रपत म्हटले गेले आणि हुमायूने ​​या शहराची पुनर्बांधणी केली. हा किला आणि त्याचे नाव दिनपनाह ठेवले. पुढे, १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत, इंद्रपत नावाचे गाव पुराना किला भिंतीच्या आत वसलेले होते.
पुराना किल्याची शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करून त्याचा संबंध महाभारताशी जोडणारे पहिले अभ्यासक बी बी लाल हेच होते. २०२२ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी एक वर्ष आधी त्यांचे ‘इंद्रप्रस्थ: द अर्लीस्ट दिल्ली गोइंग बॅक टू महाभारत टाइम्स’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, महाभारताशी संबंधित स्थळांची आजही प्राचीन नावे आहेत.

अधिक वाचा: विश्लेषण: महाभारत खरंच घडले होते का? काय सांगतात पुरातत्त्वीय पुरावे?

सध्याच्या उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर ही कौरवांची राजधानी, कृष्णाचे जन्मस्थान मथुरा आणि हरियाणातील कुरुक्षेत्र हे पांडव आणि कौरवांमधील युद्धाचे ठिकाण असल्याचे मानले जाते. केवळ इंद्रप्रस्थ, युधिष्ठिर आणि त्याच्या भावांनी स्थापन केलेल्या शहराला एक नवीन नाव मिळाले, त्यामुळे हे कोडे इतिहासकारांना गोंधळात टाकणारे आहे. त्यामुळे लाल यांनी १९५४ साली या ठिकाणी दक्षिणेकडील भागात एक छोटा चाचणी खड्डा खोदला. यातून कुशाण, शुंग कालीन पुरावे समोर आले. तसेच नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेअर सारखे मृदभांड्यांचे पुरावे उघड झाले. त्यावरूनच या स्थळावर इसवी सनपूर्व १००० पासून मानवी वस्ती असल्याचे सिद्ध झाले. परंतु लाल यांना पेंटेड ग्रे वेअरचे जे पुरावे सापडले त्यासाठी कोणताही स्तरीय पुरावा नव्हता. म्हणूनच १९६९-७० आणि पुन्हा १९७१-७२ मध्ये, लाल यांच्या नेतृत्वाखालील ASI च्या टीमने पुराना किलाच्या दक्षिण-पूर्व भागात, पूर्वीच्या जागेच्या थोड्या उत्तरेस असलेल्या ठिकाणी उत्खनन केले. या दोन्ही उत्खननात PGW चे अवशेष सापडले नाहीत. “पुराना किला ही महाभारताशी संबंधित एकमेव जागा होती जिथे PGW चे अवशेष सापडले नाहीत,” असे स्वर्णकर स्पष्ट करतात. ४० वर्षानंतर २०१३ साली स्वर्णकार स्वतः ASI च्या दिल्ली सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असताना उत्खननाचे काम हाती घेतले. २०१४ साली केलेल्या उत्खननात त्यांना PGW भांड्यांचे तुकडे सापडले. २०१७ च्याही उत्खननात सापडले. २०२२ साली झालेल्या उत्खननात कुंती मंदिराजवळ, पुराना किल्याच्या मध्यभागी असणारी जागा निवडण्यात आली. मौर्य ते कुशाण असा कालखंड उघड झाला. या वर्षाच्या उत्तरार्धात सुरू होणाऱ्या उत्खननात PGW कालखंडापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हे स्थळ खरोखरच महाभारताशी संबंधित आहे का हे समजण्यास मदत होणार आहे.