900-year-old door guardian statues in Angkor Thom: भारतीय संस्कृतीचा प्रसार भारताबाहेर आग्नेय आशियात मोठ्या प्रमाणात झाला होता, याचे अनेक पुरावे पुरातत्त्वीय उत्खननात सापडतात. प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डालरिंपल यांनी अलीकडेच इंडियन एक्स्प्रेसने आयोजित केलेल्या आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात सांगितले की, बौद्ध धर्मीयांनी समुद्र प्रवासाला विरोध केला नाही, यामुळे बौद्ध व्यापाऱ्यांनी समुद्र प्रवासाला लवकर सुरुवात केली. हिंदू व्यापारीही त्यांच्याबरोबर नंतरच्या कालखंडात सामील झाले. त्यामुळे कंबोडियाच्या मध्यभागातून जाणाऱ्या मेकोंग नदीपर्यंत पोहोचल्यावर, तो प्रदेश परक्या भूमीसारखा नव्हे तर भारताचा एक भाग म्हणून पाहिला जात होता. विविध पुराणांमध्ये आणि मनुस्मृतीच्या कायद्यांमध्ये समुद्र ओलांडण्यास मनाई केलेली आहे, परंतु असे दिसते की, मोठ्या संख्येने लोकांनी त्याचे उल्लंघन केले. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचा प्रसार भारताबाहेर मोठ्या प्रमाणात झाला. त्याचीच प्रचिती देणारा एक शोध सध्या कंबोडियात लागला आहे. त्याचाच घेतलेला हा आढावा.

कंबोडियात नक्की काय सापडले?

कंबोडियातील अंकोर थॉमच्या आयकॉनिक रॉयल पॅलेसच्या परिसरात उत्खनन करत असताना पुरातत्त्व अभ्यासकांना सॅण्ड स्टोनमध्ये कोरलेल्या द्वारपालांच्या १२ मूर्ती सापडल्या आहेत. एपीएसएआरए नॅशनल अथॉरिटी ही कंबोडियातील अंगकोर पुरातत्त्व उद्यानाचे व्यवस्थापन करणारी सरकारी संस्था आहे. या संस्थेकडून या शोधासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्या निवेदनात या शोधाविषयी माहिती देण्यात आली आहे. अभ्यासकांनी या द्वारपालांच्या मूर्ती ख्मेर शैलीत असल्याचे मत व्यक्त केले आहे. या मूर्तींचा कालखंड हा ११ व्या शतकातील अंकोर थॉम पॅलेसच्या बांधकामाशी मिळताजुळता आहे, असे एपीएसएआरए नॅशनल अथॉरिटीचे प्रवक्ते छाय फन्नी यांनी निवेदनात म्हटले आहे.

prithvik pratap and prajakta lovestory
प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
tirupati Devasthanam
तिरुपती देवस्थानात हिंदू कर्मचारीच हवे, नवनियुक्त अध्यक्ष बी. आर. नायडू यांची भूमिका
Buldhana rebels Mahayuti, Mahavikas Aghadi rebels Buldhana, Sindkhed Raja, Buldhana, Mahayuti Buldhana , Mahavikas Aghadi Buldhana,
सिंदखेड राजा, बुलढाण्याचा तिढा मुंबईतच सुटण्याची चिन्हे, अपक्षांचीही मनधरणी
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
South gate of Angkor Thom along with a bridge of statues of gods and demons. Two rows of figures each carry the body of seven-headed naga.
अंगकोर थॉमचा दक्षिण दरवाजा (विकिपीडिया)

अधिक वाचा: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

ख्मेर साम्राज्य

अंकोर थॉम हे पूर्व-आधुनिक काळातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते आणि हे शहर ख्मेर साम्राज्याची शेवटची राजधानी होती. ख्मेर साम्राज्य हे हिंदू-बौद्ध प्रभाव असलेले एक शक्तिशाली साम्राज्य होते, इसवी सन ८०२ ते १४३१ हा या साम्राज्याचा कालखंड आहे. त्यांनी आग्नेय आशियावर राज्य केले. आधुनिक कंबोडिया, थायलंड, लाओस आणि दक्षिण व्हिएतनामच्या मोठ्या भागावर त्यांचे राज्य होते.

अंगकोर शहर

अंगकोर शहर हे ख्मेर साम्राज्याचे सर्वात प्रसिद्ध केंद्र होते. या शहरात अनेक भव्य मंदिरे बांधली गेली, ज्यात अंगकोर वाट हे हिंदू आणि नंतर बौद्ध मंदिर जगप्रसिद्ध आहे. ख्मेर साम्राज्य हिंदू आणि बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली होते त्यामुळेच धार्मिक श्रद्धांचे मिश्रण त्यांच्या कलाशैली आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये दिसून येते. तर अंगकोर थॉम हे एक मोठे प्राचीन शहर आहे, जे अंगकोर वाटच्या उत्तरेला स्थित आहे.

Bayon
बायॉन, अंगकोर थॉम (विकिपीडिया)

अंगकोर थॉम

अंगकोर थॉमचे बांधकाम १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात राजा जयवर्मन सातवा याने केले. हे एक पूर्ण विकसित शहर होते. अंकोर थॉम हे ठिकाण आता कंबोडियाच्या अंगकोर पुरातत्त्व उद्यानाचा भाग आहे. या स्थळाला जागतिक वारसा वैभवाचा (युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट) दर्जा आहे. हे स्थळ आशियातील सर्वात महत्त्वाच्या पुरातत्त्व आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

अंगकोर पुरातत्त्व उद्यान

अंगकोर पुरातत्त्व उद्यान हे कंबोडियातील एक जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यात प्राचीन ख्मेर साम्राज्याच्या अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तुशिल्पांचा समावेश आहे. हे उद्यान सीएम रीप शहराजवळ स्थित आहे आणि त्यामध्ये अंगकोर वाट, अंगकोर थॉम, बायोन मंदिर, ताप्रोम मंदिर, आणि इतर अनेक भव्य मंदिरे आणि वास्तूंचा समावेश होतो. हे स्थळ एकोणिसाव्या शतकात परत सापडले आणि त्यानंतर त्याच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि स्थापत्यविषयक महत्त्वामुळे ते जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

अंगकोर थॉमचा उत्तर दरवाजा (विकिपीडिया)

अधिक वाचा: China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?

अंगकोर थॉम येथे नव्याने सापडलेल्या मूर्तींची वैशिष्ट्ये काय आहेत?

९०० वर्षे जुन्या या मूर्तींमध्ये विशिष्ट दाढीचे अलंकार दर्शवण्यात आले आहेत आणि त्यांचा आकार व उंची वेगवेगळी आहे; काही मूर्ती ३९ इंच लांब आहेत तर काही ४३ इंच, असे असोसिएटेड प्रेसचे सोफेंग चिअंग यांनी सांगितल्याचे स्मिथसोनियन मासिकाने म्हटले आहे. या मूर्ती सुमारे ४.५ फूट खोल सापडल्या असल्या तरी त्यातील काही मूर्ती चांगल्या स्थितीत आहेत, तर काही भग्न अवस्थेत आहेत. त्यातील काही मूर्तींच्या उजव्या हातात काठीसारखी वस्तू दिसते. अंकोर थॉममध्ये पुरातत्त्वज्ञांचे शोधकार्य सुरूच आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये बंतेय प्री मंदिरात सॅण्ड स्टोन मधील द्वारपालाची मूर्ती सापडली होती. अंगकोर पुरातत्त्व उद्यानाच्या आकारमान आणि भौगोलिक रचनेमुळे संशोधकांना ख्मेर संस्कृतीवर प्रकाश टाकणारे अवशेष आणि संरचना शोधण्यात यश येत आहेत, असे आर्टनेटसाठी रिचर्ड व्हिडिंगटन यांनी सांगितले होते.

ख्मेर कलाकृती

गेल्या काही दशकांत ख्मेर कलाकृती परत मिळविण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही कलाकृती १९७०च्या दशकात ख्मेर रूजच्या कम्युनिस्ट राजवटीच्या हिंसा आणि अस्थिरतेच्या काळात लुटल्या गेल्या होत्या, असे असोसिएटेड प्रेसच्या वृत्तात नमूद केले आहे. परंतु अंगकोर पुरातत्त्व उद्यानाची साफसफाई करण्याच्या कंबोडियाच्या प्रयत्नांवर अलीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होताना दिसते. यामागील मुख्य कारण म्हणजे २०२२ साली सरकारने १०,००० पेक्षा अधिक कुटुंबांना या ठिकाणाहून सक्तीने हटवले त्यानंतर ही टीका होण्यास सुरुवात झाली असे प्रथमदर्शनी दिसत आहे.

अधिक वाचा: भारताने त्याच्या इतिहासात गुंतवणूक करायला हवी!

भारत आणि आग्नेय आशिया

आग्नेय आशियात सर्वत्र भारतीय संस्कृतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळतो. परंतु वास्तविक पातळीवर या देशांमधून भारतीय संस्कृतीचा प्रभाव पूर्णतः कधीच मान्य केला जात नाही. या संदर्भात विल्यम डालरिंपल यांनी सांगितले की, १९३० आणि ४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी इतिहासकारांचा नवउदयाचा काळ होता, ज्यात विशेषतः आर. सी. मजुमदार यांनी भारत आणि आग्नेय आशियातील संबंधांना ‘हिंदू वसाहती’ या दृष्टिकोनातून चित्रित केलं. यामध्ये भारताच्या उच्च संस्कृतीने तलवारीच्या बळावर निम्न आग्नेय आशियायी संस्कृतींवर विजय मिळवला, अशी मांडणी केली गेली. या दृष्टिकोनाचा आग्नेय आशियायी अभ्यास क्षेत्रात मोठा प्रतिकार केला गेला आणि ‘भारतीयकरण’ हा शब्द तिथल्या विद्यापीठांमध्ये अप्रिय ठरला. मूलतः ऐतिहासिकदृष्ट्या हे चुकीचं होतं की, भारताने युद्धाद्वारे विजय मिळवला. १९३० आणि ४० च्या दशकातील ‘मिलिटंट ग्रेटर इंडिया’ किंवा बळजबरीच्या भारतीयकरणाच्या कल्पनेमुळे मूळ भारतीयकरणाची संकल्पना खूप काळ अप्रचलित राहिली. म्हणूनच यावर विद्वत्तापूर्ण चर्चा सुरू आहे की, भारतीय प्रभाव किती प्रमाणात आणि कोणत्या स्वरूपात पसरला. कारण आग्नेय आशियातील हिंदू धर्म भारतातील हिंदू धर्मापेक्षा लक्षणीय रीतीने भिन्न होता. रवींद्रनाथ टागोर यांनी अंगकोरला भेट दिल्यावर म्हटलं होतं की, “सगळीकडे मला भारत दिसत होता, पण मी त्याला ओळखू शकत नव्हतो.” हे उत्तर त्या प्रश्नासाठी योग्य आहे – ती संस्कृती भारतीय आहे, तरीही ती पूर्णपणे भारतीय नाही!