Ancient Egyptian beliefs: प्राचीन इजिप्तमध्ये मृत्यूनंतरचे जग या संकल्पनेला महत्त्व होते. याच संकल्पनेने प्राचीन इजिप्तमधील धार्मिक विधी, कला आणि दैनंदिन जीवनाला आकार दिला. त्यांच्या या दृढ विश्वासाचे प्रतिबिंब त्यांच्या संस्कृतीच्या प्रत्येक अंगातून दृष्टिपथास पडत असे. मग तो भव्य पिरॅमिड असो किंवा मृतांबरोबर दफन केलेले लहानसे ताईत असोत प्रत्येक पुरावा हा महत्त्वाचा ठरतो. काहिरोच्या (Cairo) दक्षिणेस मिन्या (Minya) भागात अलीकडेच झालेल्या एका पुरातत्त्वीय उत्खननामुळे इजिप्तच्या इतिहासात आणखी एक अद्भुत प्रकरण जोडले गेले आहे. इजिप्तशियन आणि स्पॅनिश चमूने संयुक्तरित्या केलेल्या उत्खननात काही दफनं उघडकीस आली आहेत. या दफनांमध्ये सोन्याच्या जिभा आढळून आल्या आहेत. इतकंच नाही तर या दफनांमध्ये पवित्र ताईत आणि इतर गोष्टीही सापडल्या आहेत. एकूणच हा शोध इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकातील टॉलेमी कालखंडातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो.

View this post on Instagram

A post shared by Ministry Tourism & Antiquities (@ministry_tourism_antiquities)

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Homo juluensis
Homo Julurensis: अखेर आशियातील ‘मोठ्या डोक्याच्या लोकां’चा शोध लागला; काय सांगते नवीन संशोधन?
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
vidarbha development issues address in maharashtra winter session
हिवाळी अधिवेशनाने विदर्भाला काय दिले? सरकार विदर्भाविषयी गंभीर होते का?
bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!

टॉलेमी युगातील मृत्यूनंतरचा प्रवास

मिन्या भागातील उत्खननाने ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या एका दफन संकुलाचा उलगडा केला. या शोधातील सर्वात ठळक गोष्ट म्हणजे मृतांच्या तोंडात ठेवलेल्या १३ सोनेरी जीभा. ओसिरिस (Osiris) हा प्राचीन इजिप्शियन धर्मातील एक प्रमुख देव आहे. ओसिरिस हा मृत्यू, पुनर्जन्म, शेती आणि फलप्राप्ती यांचा अधिपती मानला जातो. ओसिरिस हा प्राचीन इजिप्शियन पौराणिक कथांतील सर्वांत महत्त्वाच्या देवतांपैकी एक आहे. त्याला मुख्यतः मृतांचा आणि पुनर्जन्माचा अधिपती म्हणून पूजले जात असे. मृत्यूनंतरच्या जीवनासाठी पाताळात विराजमान असणाऱ्या याच ओसिरिसशी संवाद साधण्यात मदत करण्याच्या उद्देशाने मृतांच्या तोंडात सोन्याच्या जिभा देण्यात आल्या होत्या, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. ही अद्वितीय प्रथा प्राचीन इजिप्तमधील मृत्यूनंतरच्या जगावरील विश्वासाची प्रचिती देते. त्यामुळेच हा पुरातत्त्वीय शोध महत्त्वाचा मानला जात आहे. सोन्याच्या जीभा या फक्त सजावटीसाठी नव्हत्या. त्या मृतांना मृत्यूनंतरच्या जीवनात संवाद साधण्याची क्षमता प्रदान करीत होत्या. या जीभा विशेषतः ओसिरिससारख्या देवांसमोर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी मदत करत अशी धारणा होती. अंतिम न्यायाची देवता असणाऱ्या ओसिरिससमोर मृत्युपश्चात जीवनातील सुखसंपत्ती मिळवण्यासाठी हे आवश्यक मानले जात असे. ही प्रथा इजिप्तमधील सजीव आणि गतिमान मृत्युपश्चात जीवनाच्या श्रद्धेला अधोरेखित करते.

The family of Osiris. Osiris on a lapis lazuli pillar in the middle, flanked by Horus on the left and Isis on the right (Twenty-second Dynasty, Louvre, Paris)
The family of Osiris, Louvre, Paris (फोटो: विकिपीडिया)

अधिक वाचा: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

पवित्र ताईतांचे समृद्ध प्रतिकात्मक अर्थ

सोनेरी जीभांबरोबरच पुरातत्त्वज्ञांना २९ ताईत सापडले आहेत. या वस्तूंमध्ये खोल आध्यात्मिक प्रतिकात्मकता दडलेली आहे. ताईतांवर संरक्षणमंत्र किंवा पवित्र चित्रे कोरलेली आहेत. मृतांच्या प्रवासात त्यांचे रक्षण करण्यासाठी हे वापरले जात. यात Heart Scarabs आहेत. Heart Scarabs हे डुंग बीटल (Scarabaeus sacer) या पवित्र कीटकाच्या आकारात कोरलेले दगड किंवा तावीज होते. इजिप्तमध्ये भुंगे पुनर्जन्म आणि नवजीवनाचे प्रतीक मानले जात आणि अंत्यसंस्काराच्या परंपरांमध्ये त्यांना महत्त्व होते. यामध्ये जीवन-मृत्यूच्या चक्रीय दृष्टीकोनाचे प्रतिबिंब दिसते. या उत्खननात सापडलेली प्रत्येक वस्तू टॉलेमी युगातील इजिप्तमधील आध्यात्मिक विचारसरणीची झलक देते. या वस्तू केवळ सजावटीसाठी नसून त्या मृतांना संरक्षण देणे, मार्गदर्शन करणे यासाठी महत्त्वाच्या मानल्या जात. उदाहरणार्थ, Heart Scarabs हे मृताच्या हृदयाच्या जागी ठेवले जात. त्यांच्यावर प्राचीन इजिप्शियन धर्मग्रंथ ‘बुक ऑफ द डेड’ मधील मंत्र आणि मजकूर कोरला जात असे. हा मजकूर मृत व्यक्तीला न्यायाच्या दिवशी मदत करण्यासाठी होता अशी धारणा होती.

वेन नेफरचे थडगे

या संकुलातील एका थडग्याचा संबंध वेन नेफर नावाच्या उच्चपदस्थ व्यक्तीशी होता. त्याचा दफन कक्ष त्या युगातील आध्यात्मिक जीवनाचे जिवंत चित्रण करतो. थडग्याच्या भिंतींवर वेन नेफर आणि त्याचे कुटुंब ‘अनूबिस (मृत्यू, मरणोत्तर जीवन, आणि मृतांच्या आत्म्यांच्या रक्षणाशी संबंधित देव) आणि पुनर्जन्म व न्यायाचा देव ओसिरिस’ यांना पूजत असल्याचे चित्रित केले आहे. वेन नेफरच्या थडग्याच्या छतावर आकाशदेवता नट यांचे ताऱ्यांनी आणि पवित्र नौकांनी वेढलेले चित्रण आहे. नट या देवतेला नेहमी पृथ्वीवर झुकलेल्या अवस्थेत दर्शवले जाते. या कलात्मक आणि आध्यात्मिक चित्रणांमुळे प्राचीन इजिप्तचा ब्रह्मांडशास्त्राची गहन संबंध दिसून येतो.

Anubis
अनूबिस (फोटो: विकिपीडिया)

सामूहिक थडगी आणि सामुदायिक श्रद्धा

या दफनस्थळावर सामूहिक दफन कक्ष देखील आढळले आहे. ही दफन परंपरा केवळ इजिप्तमधील लोकांच्या मृत्युपश्चात जीवनावरील श्रद्धेला अधोरेखित करत नाही, तर टॉलेमी कालखंडातील दफन परंपरांतील सामाजिक आणि आर्थिक गतीशीलताही दर्शवतात. एका ममीच्या चेहऱ्यावर सोन्याचा थर आढळला आहे. देवतांचे शरीर मानल्या जाणाऱ्या सोन्याला अमरत्व आणि अविनाशीपणाचे प्रतीक मानले जात असे. मृतांच्या चेहऱ्यावर सोने लेवून मृत व्यक्तीला दैवी गुणांशी जोडल्याने त्यांच्या मृत्युपश्चात जीवनाकडे जाणारा प्रवास अधिक सुकर होईल अशी धारणा होती.

टॉलेमी युग आणि त्यातील धार्मिक समन्वय

टॉलेमी युगात ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीचे मिश्रण आढळते. अलेक्झांडर द ग्रेटचा सेनापती टॉलेमी पहिल्या सोटरच्या वंशज असलेल्या टॉलेमी राजवंशाने इजिप्शियन धार्मिक प्रथा स्वीकारल्या आणि त्याचबरोबर या भागात हेलिनिस्टिक संस्कृतीच्या घटकांची ओळख करून दिली. मिन्या दफन संकुलावर याचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो. वेन नेफरच्या थडग्यातील आकाशाशी संबंधित चित्रे आणि तपशीलवार अंत्यसंस्काराची कला प्राचीन इजिप्शियन परंपरांचा वारसा स्पष्टपणे दाखवतात. टॉलेमी राजवटीने ग्रीक आणि इजिप्शियन धार्मिक विचारांचा एकत्रितपणे प्रचार केला. सांस्कृतिक बदल होत असतानाही इजिप्शियन आध्यात्मिकता कायम टिकून राहिली होती, हेच सोनेरी जीभा आणि अशा वस्तूंचा शोध सांगतो.

अधिक वाचा: Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?

या शोधाचे महत्त्व

मिन्या येथे सापडलेल्या सोनेरी जीभा, ताईत आणि सजवलेली थडगी हा एक केवळ पुरातत्त्वीय चमत्कार नाही. तर हे पुरावे प्राचीन श्रद्धा, सामाजिक संरचना आणि कला यांची कथा सांगतात. या शोधामुळे टॉलेमी युगाविषयीच्या ज्ञानात भर पडतेच परंतु प्राचीन इजिप्शियनांच्या त्यांच्या आध्यात्मिक जगाशी असलेल्या गाढ संबंधाचा पुन:प्रत्यय सुद्धा येतो. इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञांसाठी हा शोध अमूल्य आहे. ते अशा प्रथांचा ठोस पुरावा देतात. ज्यांचा पूर्वी मुख्यतः ग्रंथ आणि कलात्मक चित्रणांद्वारे अभ्यास केला जात होता. देवता, आकाशीय प्रतीकं आणि दफनविधींसाठी वापरल्या गेलेल्या वस्तूंच्या तपशीलवार चित्रणांमुळे प्राचीन इजिप्शियन चिरंतनतेची कल्पना कशी करत याचा सखोल दृष्टिकोन मिळतो.

शाश्वत वारशाचे महत्त्व

प्राचीन इजिप्शियन लोकांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर असलेला ठाम विश्वास मानवाच्या मृत्यूच्या पलीकडे जाण्याच्या आणि त्याला समजून घेण्याच्या कालातीत इच्छेशी नाते सांगतो. त्यांची जटिल अंत्यसंस्कार पद्धती आणि सखोल विश्वरचनेमुळे एका अशा संस्कृतीचा परिचय होतो जी भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांना संतुलित करण्याचा प्रयत्न करत होती. मिन्या येथील शोध प्राचीन इजिप्शियन संस्कृती आणि अध्यात्मिक वारशाचे स्थिर महत्त्व अधोरेखित करणारा आहे. सोनेरी जिभा ते पवित्र अ‍ॅम्युलेट्सपर्यंत प्रत्येक पुरावा भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील एक पूल आहे. जो आजही विस्मयकारक आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या या संस्कृतीशी जोडतो.

Story img Loader