India’s dark chocolate market is growing भारतीयांकडून अधिकाधिक डार्क चॉकलेटला पसंती मिळते आहे, त्याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेमध्ये डार्क चॉकलेटची मागणी वाढली आहे, परंतु विशेष म्हणजे या बाजारपेठेवर राज्य करणारे कोणी जागतिक दर्जाचे मोठे ब्रॅण्ड्स नाहीत तर स्थानिक ‘भारतीय’ ब्रॅण्डच्या चॉकलेटने ही बाजी मारली आहे. ‘युरोमॉनिटर फर्म’ने दिलेल्या मार्केट रिसर्चच्या आकडेवारीनुसार भारतातील डार्क चॉकलेट बाजारपेठ गेल्या पाच वर्षात ४१ दशलक्ष डॉलर्सवरून ८६ दशलक्ष डॉलर्स झाली आहे, म्हणजेच वर्षामागे यात १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मिल्क चॉकलेट सेगमेंटमध्ये दरवर्षी ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. नेस्ले, मोंडेलेझ आणि हर्षेज् यांसारखे आंतरराष्ट्रीय चॉकलेट ब्रॅण्ड्स सध्या देशांतर्गत मिल्क चॉकलेट बाजारपेठेमध्ये आघाडीवर आहेत, तर अमूल सारखे स्थानिक ब्रॅण्ड्स दुसऱ्या क्रमांकावर परंतु डार्क चॉकलेटच्या मार्केटमध्ये जलद गतीने विस्तारत आहेत. ५८.३ टक्के मार्केट शेअरसह ६३९ दशलक्ष डॉलर्स मिल्क चॉकलेट सेगमेंटचे भारताच्या एकूण चॉकलेट बाजारपेठेवर वर्चस्व आहे. सध्या डार्क चॉकलेट्सचा बाजारातील हिस्सा जवळपास ८ टक्के आहे, पण तो वाढत आहे.

अधिक वाचा: पहिल्या ‘आधार कार्ड वुमन’चे दुर्दैवाचे दशावतार! कार्ड आहे पण बँक खात्यात मात्र… 

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Prostitution risen in Nagpur
नागपुरात खुनाच्या घटनाच नव्हे, देहव्यापारही वाढला…गल्लोगल्ली उभारलेल्या मसाज-स्पामध्ये…

नेस्ले, मोंडेलेझ आणि हर्षेज् सारखे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स हे युरोपच्या २६ अब्ज डॉलर्सच्या डार्क चॉकलेट बाजारपेठेमधील अव्वल खेळाडूंपैकी आहेत, त्यांनी भारतातील मिल्क चॉकलेट बाजारपेठेमध्ये विस्तार करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे, त्यामुळेच डार्क चॉकलेट बाजारपेठेमध्ये ते मर्यादित स्वरूपात आहेत, सध्या त्यांनी ग्रामीण बाजारपेठेत मास प्रॉडक्शनवर लक्ष केंद्रित केले आहे. याउलट अमूल, आयटीसीचे फॅबेले, चोकोला आणि मेसन यांसारखे भारतीय ब्रॅण्ड्स प्रयोगशील दिसून येत आहेत. फक्त कोकोचा वापर करून निर्माण करता येतील, अशा उत्पादनांवर या कंपन्या भर देत आहेत. अमूल सारखी कंपनी १७ प्रकारच्या डार्क चॉकलेटस् बारची निर्मिती करते आहे. मिल्क चॉकलेटच्या उलट डार्क चॉकलेट महाग असते, तसेच त्यात ५० ते ९० टक्के कोको असल्याने ते कडूही असते. त्यामुळे बहुतेक ग्राहकांसाठी ती एक वैशिष्ट्यपूर्ण चव असते.

जागतिक ब्रॅण्ड्स नेमके काय करत आहेत?

नेस्ले इंडियाच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये डार्क चॉकलेट बार नाहीत, जे उत्पादन घेतले जाते ते डार्क चॉकलेट- कोटेड वेफर किट कॅट डार्कपर्यंत मर्यादित आहे. हर्षेज् काही उत्पादनांची निर्मिती करते, तर मोंडेलेझच्या कॅडबरी श्रेणीमध्ये फक्त पाच गडद चॉकलेट बार आहेत. भारतीय डार्क चॉकलेट मार्केटमध्ये नेस्लेची मर्यादित उपस्थिती प्रीमियम ऑफरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अतिसंवेदनशील ग्रामीण बाजारपेठेत प्रवेश वाढवून विकासाला चालना देण्याच्या धोरणाशी सुसंगत दिसते. या ग्रामीण भागातील वाढीच्या धोरणामुळे डार्क चॉकलेट बारसारख्या किमती उत्पादनांसाठी फारशी जागा उरली नाही. नेस्लेच्या किट कॅट डार्कची किंमत ४१.५ ग्रॅमसाठी १२० रुपये आहे, ही भारतीय बाजारपेठेतील सरासरी मिल्क चॉकलेट बारच्या किमतीपेक्षा खूप जास्त आहे.

नेस्ले प्रमाणे हर्षेज् हे देखील भारतात डार्क चॉकलेटची निर्मिती करते, ज्यात ४९ टक्के कोको असते. या चॉकलेटबारच्या ४० ग्रॅमसाठी ६० रुपये मोजावे लागतात. या शिवाय याच ब्रॅण्डचे आणखी एक उत्पादन आहे. जे एक्झॉटिक डार्क म्हणून ओळखले जाते. यात फळे आणि सुक्यामेव्याबरोबर फ्लेवर्ड डार्क चॉकलेटचा थर असतो. मोंडेलेझच्या कॅडबरीकडे बॉर्नव्हिल रेंजचा/श्रेणीचा एक भाग म्हणून डार्क चॉकलेट बारमध्ये पाच पर्याय आहेत, परंतु ७० टक्के कोको सामग्रीसह रिच कोको बार वगळता ते त्यापैकी कोणत्याही बारमधील कोको सामग्री किती आहे, हे उघड करत नाहीत.

घरच्या खेळाडूंची डार्क चॉकलेटवर बाजी

तर दुसऱ्या बाजूला गुजरातमधील अमूल ही कंपनी डार्क चॉकलेटचे १७ पर्याय देते, या सर्व पर्यायांमध्ये कोकोच्या प्रमाणापासून ते चवीमध्ये फरक आहे, अमूलच्या क्लासिक डार्क चॉकलेटच्या श्रेणीत ५५ ते ९९ टक्के कोकोचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्यातही चवी आणि प्रमाणानुसार चार पर्याय आहेत. अमूलचे डार्क चॉकलेट बार देखील किमतीच्या बाबतीत लोकप्रिय मिल्क चॉकलेट बारशी स्पर्धा करतात. उदाहरणार्थ, ९९ टक्के कोको सामग्री असलेल्या डार्क चॉकलेट बारची किंमत १.२८ रुपये प्रति ग्रॅम आहे, तर कॅडबरीचे लोकप्रिय दूध चॉकलेट उत्पादन, डेअरी मिल्क सिल्क, १.३३ रुपये प्रति ग्रॅम आहे. अमूलकडे पाच डार्क चॉकलेटचे फ्लेवर्स आहेत, त्यात ऑरेंज आणि मोचासह व्हेनेझुएला, कोलंबिया, आयव्हरी कोस्ट आणि मादागास्कर यांसारख्या देशांत मिळणाऱ्या कोको बीन्सचा वापरकरून सिंगल-ओरिजिन डार्क चॉकलेट बारच्या आठ प्रकारांचा समावेश होतो.

सोशल मीडियाची ताकद

“आम्ही १५० ग्रॅमच्या स्लॅबसह १०० रुपयांत, मोहक पॅकेजिंग आणि शून्य मार्केटिंगसह, केवळ सोशल मीडियाची ताकद वापरून या बाजारात प्रवेश केला. आज, आम्ही देशातील डार्क चॉकलेटचे सर्वात मोठे उत्पादक आहोत,” अमूलची मूळ कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी नोव्हेंबरमध्ये आयोजित इंडियन एक्स्प्रेस आयडिया एक्सचेंजमध्ये सांगितले. अमूल आपल्या डार्क चॉकलेट पोर्टफोलिओचे प्रीमियम पॅकेजिंगमध्ये विविध वितरण चॅनेलवर परवडणाऱ्या किमतीत मार्केटिंग करत आहे, त्यांची उत्पादने २०० शहरांमधील किराणा स्टोअर्समध्ये आणि एअरपोर्ट लाऊंजसारख्या विशेष जागांवर उपलब्ध आहेत. याखेरीज अमूलच्या कार्यकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘जे प्रौढ आपल्या आहारात संतुलन ठेवण्यास इच्छूक आहेत, खेळ आणि फिटनेसला प्राधान्य देणारे, ज्यांना साखर कमी खाण्यासारखे पथ्य पाणी सांभाळायचे आहे, जे किटो डायट किंवा इतर तत्सम डायट करत आहेत अशा वर्गाला समोर ठेवून आम्ही ही उत्पादनं निर्माण केली आहेत. डार्क चॉकलेटच्या पॅकेजिंगवर “अँटीऑक्सिडंट्सचे नैसर्गिक स्रोत” असे स्पष्ट लिहिलेले असते, तसेच अमूलच्या कोको हा एकमेव घटक आणणाऱ्या श्रेणीसाठी पॅकेजिंगवर टेस्ट प्रोफाइल असते, या प्रोफाइलमध्ये कारमेल, मसाले, आंबटपणा, कटुता आणि तुरटपणा यासह १२ पॅरामीटर्स समाविष्ट आहेत.

अधिक वाचा: हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?

मेसन

पाँडिचेरीमधील मेसन ही कंपनी गेल्या दशकापासून डार्क चॉकलेट्सचे उत्पादन करते आहे. शिक्षित, नोकरदार, शहरी आणि दुहेरी उत्पन्न असलेले त्यांचे मुख्य ग्राहक आहेत. मेसन येथील मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मानसी रेड्डी सांगतात, डार्क चॉकलेटची चव वेगळी असते. ती तशी का असते? त्याचा आस्वाद कसा घ्यावा? किंमत जास्त का असते? हे लोकांना समजून देणे गरजेचे आहे. आमचा विश्वास आहे की, भारतात डार्क चॉकलेटला मोठा वाव आहे, विशेषत: सध्या बहुतांश लोकसंख्या मधुमेहासारख्या विकारांचा सामना करत आहे. डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण खूपच कमी असते आणि ते मिल्क चॉकलेटपेक्षा श्रेयस्कर असते. कंपनीकडे सध्या १४ विविध प्रकारचे डार्क चॉकलेट बार आहेत, ज्यामध्ये कोकोचे प्रमाण ४९ टक्के ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. दक्षिण भारतातील लागवडीतून मिळालेल्या सर्व कोको बीन्ससह मेसन आणि कंपनी उत्पादन सामग्री सेंद्रिय आणि वनस्पती-आधारित असल्याचा दावा करते. हे सध्या ई-कॉमर्स चॅनेलद्वारे आणि अपस्केल कॅफेमध्ये विकले जातात.

चोकोला आणि फॅबेले

चोकोला हे डार्क चॉकलेटच्या सहा प्रकारच्या बारची निर्मिती करते, त्यात ५४ ते ७५ टक्के कोको असते, शिवाय काश्मिरी कहवा, नटी हेझलनट हे त्यांचे काही सिग्नेचर फ्लेवर आहेत, ही उत्पादने विमानतळांवर आणि नवी दिल्लीच्या खान मार्केटसारख्या व्यावसायिक ठिकाणी स्टोअर्सही उपलब्ध आहेत. आयटीसी चे फॅबेले घानामधून मिळणाऱ्या कोको बीन्सचा वापर करून डार्क चॉकलेट तयार करते. मेसन अँड कंपनी, चोकोला आणि फॅबेले यांसारखे ब्रँडची किमंत २.२५ रुपये ते ५.६ रुपये प्रति ग्रॅम चॉकलेटसाठी आहे, जी अमूलच्या तुलनेत जास्त आहे. एकूणात सध्या भारतीय स्थानिक ब्रॅण्डसनी डार्क चॉकलेटच्या बाजारपेठेवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला दिसतो आहे.

Story img Loader