अनिश पाटील
कृत्रिम बुद्धिमत्ते’चा (आर्टिफिश्यल इंटेलिजन्स – एआय) वापर करून अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे तयार करणाऱ्या एका तरुणाला मध्यंतरी अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली. ‘एआय’च्या माध्यमातून करण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास असे आढळते, की सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. ‘एआय’च्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्येही आणखी प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
‘एआय’ माध्यमातून घडलेला गुन्हा काय आहे?
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा (आर्टिफिश्यल इंटेलिजन्स – एआय) वापर झालेला राज्यातील पहिला गुन्हा नुकताच विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. ‘एआय’च्या मदतीने अल्पवयीन मुलींची अश्लील छायाचित्रे तयार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील जीत निजाई (१९) याने अनेक मुलींची अश्लील छायाचित्रे तयार करून त्याआधारे बनावट ‘इन्स्टाग्राम’ खाती तयार केली होती. त्याआधारे जीत आणि त्याचा भाऊ यश यांच्यावर विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा, बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) आदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.आरोपी जीत याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तरुणींची अश्लील छायाचित्रे तयार केली. त्याचा वापर करून इन्स्टाग्रामवर बनवाट खाती उघडून मुलींची बदनामी केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींना सोमवारी रात्री जीत आणि भाऊ यश (२२) यांनी मारहाण केली. तक्रारीनंतर पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशी दरम्यान ‘एआय’चा वापर करून दोघांनी तरुणींची अश्लील छायाचित्रे तयार केल्याचे उघड झाले.
‘डीप फेक’ यंत्रणा म्हणजे काय?
‘एआय’ यंत्रणेमध्ये एखादे छायाचित्र अपलोड केल्यास त्यात आपल्याला अपेक्षित बदल करता येतात. एखाद्या व्यक्तीचे शरिरसौष्ठवपटू म्हणून छायाचित्र कसे असेल, अशी सूचना दिल्यास त्याप्रमाणेत छायाचित्रात बदल करून नवीन छायाचित्र आपल्यापुढे सादर केले जाते. याच पद्धतीचा गैरवापर करून कोणाचेही अश्लील छायाचित्र तयार केले जाऊ शकते. त्याचा पुढे गैरवापरही केला जाऊ शकतो. सायबर भामटे एक पाऊल पुढे जाऊन ‘डीप फेक’ प्रकाराचा वापर करून मोठे गैरव्यवहार करत आहेत. ‘डीप फेक’ हे ‘डीप लर्निंग’ व ‘फेक मीडिया’ यांचे एकत्रीकरण म्हणता येईल. त्यात आवाज, चित्रफीत यांच्यात ‘एआय’च्या मदतीने बदल केला जातो. प्रसिद्ध व्यक्ती, चित्रपटसृष्टीतील कलाकार, राजकारणी यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्यासाठी त्याचा वापर होतो. अशाच यंत्रणेचा वापर करून सायबर भामट्यांनी ब्रिटनमधील एका वीज कंपनीला २०१९ मध्ये हंगेरी येथील बँक खात्यात एक कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले होते.
विश्लेषण: चंद्रयान-३च्या यशानंतर आता सूर्यावर स्वारी! ‘आदित्य एल-१’ मोहीम काय आहे?
‘एआय’च्या माध्यमातून एखाद्याचा पासवर्डही मिळवता येतो का?
अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार हॅकर्स ‘एआय’चा वापर करून अचूकरीत्या पासवर्ड चोरू शकतात. ‘अकॉस्टिक साइड-चॅनल अटॅक’ हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. त्यात संगणक किंवा उपकरणातून येणारे विविध आवाज किंवा कंपनांचा (व्हायब्रेशन) वापर संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी केला जातो. पासवर्ड टाईप करताना मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा गैरवापर केला जातो. त्यात टायपिंगसाठी लागलेला वेळ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वापर आणि ध्वनी तरंगांचे विश्लेषण करून एखादा पासवर्ड ही यंत्रणा शोधते. त्याचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी होऊ शकतो. याशिवाय हॅकिंगमध्येही ‘एआय’द्वारे मदत घेतली जाऊ शकते. त्यात संगणकीय यंत्रणा किती सक्षम आहे, त्यात कोणत्या त्रुटी आहेत, अशी विविध माहिती ‘एआय’द्वारे हॅकर्सला मिळू शकते. त्या माहितीच्या आधारे यंत्रणा हॅकही केली जाऊ शकते.
कंपन्यांच्या सायबर फसवणुकीसाठी ‘एआय’चा वापर होऊ शकतो का?
व्यवसायातील अनेक व्यवहार, विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्याचे व्यवहार ईमेलद्वारे होतात. ‘एआय’ यंत्रणा अल्गोरिदम संप्रेषण पद्धतीचा वापर करून ईमेलची पद्धत आणि इतर बाबींचे विश्लेषण करू शकतात. त्याद्वारे कंपनीचा उच्चाधिकारी, परदेशी वितरक यांच्या नावाने ईमेल पाठवले जाऊ शकतात. त्याद्वारे कंपन्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जाऊ शकते. याशिवाय कंपन्यांची गुप्त माहिती यंत्रणेद्वारे लॉक करून त्याद्वारे कंपन्यांकडून खंडणी उकळण्याचे कामही ‘एआय’ यंत्रणेद्वारे केले जाऊ शकते.
चांद्रयान-३: भारतीय संस्कृतीतील चंद्राच्या, शिवापासून ते रामापर्यंतच्या पौराणिक कथा
सायबर सुरक्षेचे काय?
‘एआय’द्वारे होणारे संभाव्य सायबर हल्ले रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांनी त्यांची खासगी माहिती समाज माध्यमांवर अपलोड करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी छायाचित्र समाज माध्यमांवर देताना ते यंत्रणेद्वारे लॉक करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर करणार नाही. याशिवाय पोलीस व इतर सायबर यंत्रणांनाही काळानुसार अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे.