संदीप नलावडे

साखरेचे प्रमाण वाढल्याने मानवी शरीरावर मधुमेह, वजन वाढणे, रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, हृदयरोग आदी दुष्परिणाम होतात. त्यामुळे आधुनिक जगात साखरेला पर्याय म्हणून नॉन-शुगर स्वीटनर (एनएसएस) म्हणजेच कृत्रिम साखरेचा वापर केला जातो. अनेक मधुमेही रुग्ण एनएसएसचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एनएसएसचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एनएसएसमध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नसून हा पदार्थ शरीरासाठी धोकादायक असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. कृत्रिम साखरेबाबत एसएसने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी…

BRI method for measuring obesity
What is BRI: निरोगी शरीर ओळखण्याची नवी पद्धत, जाणून घ्या BRI म्हणजे काय? BMI पेक्षा ते वेगळं कसं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
women entrepreneurs
Loan For Women Entrepreneurs : बँक कर्ज नको, सरकारी योजना माहीत नाहीत; महिला उद्योजकांना कुठून मिळतं भांडवल? सर्वेक्षणातून बाब उघड!
control your blood sugar level
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत! जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
superbugs 4 million death till 2050
सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?
triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
actress Bhagyashree shared recipe of unpeeled potato
‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

नॉन-शुगर स्वीटनर म्हणजे काय?

साखरेला पर्याय म्हणून नॉन-शुगर स्वीटनर हा पदार्थ तयार करण्यात आला. हा साखरेसारखाच गोडपणा प्रदान करतो, मात्र त्यात साखरयुक्त गोड पदार्थांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी अन्नऊर्जा असते. त्यामुळे त्याला शून्य कॅलरी किंवा कमी कॅलरी स्वीटनर म्हणातात. कृत्रिम गोड पदार्थ वनस्पतींच्या अर्कांच्या निर्मितीद्वारे किंवा रासायनिक संश्लेषणाद्वारे तयार केले जाऊ शकतात. साखरेची पर्याय उत्पादने लहान गोळ्या, पावडर आणि द्रव पदार्थ या स्वरूपात उपलब्ध असतात. कॅलरी न जोडता तयार वापरण्यात येणाऱ्या या गोड पदार्थामध्ये कोणतेही पोषण मूल्य नसते. साखरेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी बहुधा याचा वापर केला जातो. मान्यताप्राप्त कृत्रिम स्वीटनर्समुळे कर्करोग होत नाही. आहारविषयक व्यावसायिकांनी असा निष्कर्ष काढला आहे की साखरेला सुरक्षित पर्याय म्हणून पोषक नसलेल्या गोड पदार्थांचा मध्यम वापर केल्याने ऊर्जासेवन मर्यादित करण्यात मदत होते आणि रक्तातील ग्लुकोज आणि वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

विश्लेषण : भारतातील चलनबंदीची गाथा…

‘डब्ल्यूएचओ’ने नॉन-शुगर स्वीटनरबाबत काय मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत?

जागतिक आरोग्य संघटनेने १५ मे रोजी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. नॉन-शुगर स्वीटनर म्हणजेच एनएसएस हा आहारातील आवश्यक घटक नाही आणि त्यांमध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नसल्याने ते टाळण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे. साखरेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी एनएसएसचा वापर केला जातो, मात्र याच पर्यायामुळे आपल्या शरीरावर अत्यंत भीषण परिणाम होऊ शकतात. एनएसएसच्या वापरामुळे शरीरातील चरबीमध्ये दीर्घकालीन घट होत नाही. याच पदार्थांच्या वापरामुळे उलट शरीरातील चरबीचा धोका वाढू शकतो. साखरेच्या या पर्यायांमध्ये एस्पार्टम, मोंक फ्रूट एक्स्ट्रॅक्ट, सॅकरिन, सुक्रॅलोज, स्टीव्हिया, सायक्लेमेट, एसेसल्फेम के, स्टीव्हिया डेरिव्हेटिव्हज आदी घटकांचा समावेश असतो. हे सर्व घटक शरीरासाठी धोकादायक आहेत. टाइप-२ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार वाढण्याचा धोका एनएसएसमुळे वाढू शकतो. त्याशिवाय प्रौढांमध्ये मृत्यूचाही धोका वाढू शकतो, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

‘एनएसएस’ला पर्याय काय?

आरोग्यविषयक तयार करण्यात आलेली ही मार्गदर्शक तत्त्वे आहाराची गुणवत्ता सुधारणे आणि असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करणे या उद्देशाने तयार करण्यात आली आहेत, असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आयुष्याच्या सुरुवातीपासूनच आहारातील गोडवा पूर्णपणे कमी केला पाहिजे, असे डब्ल्यूएचओने म्हटले असून साखरयुक्त पदार्थांचा वापर कमी करणे याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक पदार्थांपासून मिळणारी साखर म्हणजेच फळे, गोड न केलेले अन्न व पेये हे पर्याय उपलब्ध आहेत. साखर न टाकता तयार करण्यात आलेले फलरसही उपयुक्त आहेत.

यूकेने रशियाच्या हिऱ्यांवर बंदी का घातली? हिऱ्यांच्या व्यापारात भारताची भूमिका महत्त्वाची का?

कृत्रिम साखरेच्या धोक्यांविषयी याआधीचे इशारे कोणते?

क्लीव्हलँड क्लिनिक लर्नर रिसर्च इन्स्टिट्यूटने ‘नेचर मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकेत एक लेख प्रसिद्ध करून नॉन-शुगर स्वीटनरमध्ये असलेल्या एरिथ्रिटॉल आरोग्यासाठी कसे धोकायदायक आहे याची माहिती दिली आहे. हृदयविकाराच्या रुग्णांना एरिथ्रिटॉलमुळे धोका दुप्पट होऊ शकतो. रक्तात एरिथ्रिटॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढू शकतो, असे हे संशोधन सांगते. एरिथ्रिटॉलमुळे रक्तातील प्लेटलेट्सच्या अधिक सहजपणे गुठळ्या होऊ शकतात, जे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, असे संशोधकांनी सांगितले आहे. ‘इंडियन जर्नल ऑफ़ डायबिटीज एंड एंडोक्रिनोलोजी’ने केलेल्या संशोधनानुसार कृत्रिम साखरेमध्ये सुक्रालोजचे प्रमाण अधिक असते, ज्याला क्लोरिनयुक्त साखर असेही म्हणतात. ही कृत्रिम साखर अधिक धोकादायक असून रक्तवाहिन्यांसंबंधी आजार त्यामुळे होऊ शकतात. त्याशिवाय साखरेच्या या पर्यायांमध्ये एस्पार्टेम या घटकाचा वापर केला जातो. एस्पार्टेममध्ये ॲमिनो ॲसिड, एसपार्टिक ॲसिड, फेनिलालेनाइन ही संयुगे असतात, जी धोकादायक असल्याचे संशोधक सांगतात.