डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी (दि. २० मे) कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा घोळ निस्तरण्यासाठी काँग्रेसने अखेर शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी मनधरणी केली. तत्पुर्वी मुख्यमंत्रीपद नाही मिळाले तर काहीच नको, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मागच्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही काहीसा असाच पवित्रा घेतला होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर मी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून निरीक्षण करणार असे ते म्हणाले. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे मान्य केले. उपमुख्यमंत्रीपद हे आघाडी-युतीच्या सरकारांमध्ये तडजोड म्हणून दिले जाते, असे आतापर्यंत राजकारणात दिसून आले आहे किंवा एखाद्या पक्षाला एकाच नेत्याच्या हातात सर्वाधिकार येऊ द्यायचे नसतील तर तो पक्ष मुख्यमंत्र्यांसोबत दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देऊन त्याच्यासमोर पर्याय उभा करतो.

उपमुख्यमंत्री पद म्हणजे नेमके काय?

राजाच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात संविधानामध्ये अनुच्छेद १६३(१) मध्ये व्याख्या करण्यात आली आहे. यानुसार, मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री नेतृत्व करेल. मंत्रिमंडळ राज्यपालांना सल्ला देऊन त्यांच्या कामात मदत करेल. तसेच अनुच्छेद १६४ च्या उपकलम १ अनुसार, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतील, तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल इतर मंत्र्यांची नेमणूक करतील. या दोन्ही अनुच्छेदामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख केलेला नाही.

After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Shinde group displeasure with NCP over Ladaki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेतील ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब; राष्ट्रवादी काँग्रेसवर शिंदे गटाची नाराजी
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws
UPSC ची तयारी : घटकराज्यांचे शासन  
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
Raj Thackeray, Raj Thackeray Banner,
महाराष्ट्रात आणखी एक भावी मुख्यमंत्री….
Karnataka Chief Minister Siddaramaiah addresses the Legislative Party meeting
कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्र्यांकडून गुरुवारी विधिमंडळ पक्ष बैठक; राज्यपालांच्या भूमिकेने वाद

हे वाचा >> विश्लेषण : उपमुख्यमंत्रीपदाला संवैधानिक महत्त्व किती? काय आहेत अधिकार? वाचा…

राज्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा हा इतर कॅबिनेट मंत्र्यांएवढाच असतो. कॅबिनेट मंत्र्याला जो पगार आणि भत्ता मिळतो, तेवढाच उपमुख्यमंत्र्यांनाही मिळत असतो.

कोणकोणत्या राज्यात उपमुख्यमंत्रीपद?

कर्नाटकात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे एकाच पक्षाचे आहेत. तर इतर राज्यांत जसे की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि हरयाणामध्ये दुष्यंत चौटाला हे आघाडीच्या सरकारमध्ये असल्यामुळे उपमुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेशमध्ये केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, हिमाचल प्रदेशमध्ये मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री आहेत. ईशान्य भारतातील चार राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यासह पाच उपमुख्यमंत्री आहेत.

उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास

भारतातील पहिले उपमुख्यमंत्री म्हणून बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा यांची नोंद आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रजपूत जातीमधून येणारे सिन्हा बिहारमधील काँग्रेसचे एक प्रमुख नेते होते.१९६७ नंतर काँग्रेसचे राजकारणावरचे एकहाती वर्चस्व कमी होत गेल्यानंतर अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यास सुरुवात झाली. यापैकी काही उदाहरणे पाहू.

बिहार : सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री म्हणून अनुग्रह नारायण सिन्हा यांचे नाव घेतले जाते. ते १९५७ साली त्यांचे निधन होईपर्यंत या पदावर होते.

१९६७ साली बिहारमध्ये पहिल्यांदा महामाय प्रसाद सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली बिगरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले. त्यांच्या सरकारमध्ये कर्पुरी ठाकूर हे १९६७ साली देशातील आणि बिहारमधील द्वितीय उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर जगदेव प्रसाद आणि राम जयपाल सिंह यादव यांनाही उपमुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली २००५ साली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, या पदावर ते १३ वर्षे काम करीत होते. त्यांच्यानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांनी दोनदा उपमुख्यमंत्रीपद भूषविले. यासोबतच तारकिशोर प्रसाद आणि रेनू देवी या भाजपाच्या नेत्यांनीही हे पद भूषविले आहे.

उत्तर प्रदेश : भारतीय जन संघाचे नेते राम प्रकाश गुप्ता हे १९६७ साली संयुक्त विधायक दलाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी चौधरी चरण सिंह होते.

उपमुख्यमंत्रीपदाचा हा प्रयोग नंतर आलेल्या काँग्रेसच्या सरकारनेही कायम ठेवला. १९६९ साली काँग्रेसच्या चंद्रा भानू गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत कमलापती त्रिपाठी यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आताच्या कर्नाटक पेचाप्रमाणे तेव्हाही गुप्ता आणि त्रिपाठी यांना मुख्यमंत्रीपद हवे होते.

२०१७ साली योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. मौर्य यांना २०२२ नंतरही या पदावर कायम ठेवण्यात आले. तर त्यांच्या जोडीला २०२२ साली ब्रजेश पाठक यांची नेमणूक करण्यात आली.

मध्य प्रदेश : १९६७ साली सर्व विधायक दलाच्या सरकारमध्ये गोविंद नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये भारतीय जन संघाचे नेते वीरेंद्र कुमार साक्लेचा यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले.

त्यानंतर १९८० साली, अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये भानू सोलंकी उपमुख्यमंत्री बनले. तर त्यानंतर दिग्विजय सिंह यांच्या कार्यकाळात सुभाष यादव आणि जमुना देवी उपमुख्यमंत्रीपदावर होत्या.

हरयाणा : हरयाणामध्ये खूप आधीपासून उपमुख्यमंत्रीपदाची परंपरा राहिली आहे. राव बिरेंद्र सिंह यांच्या सरकारच्या काळात रोहतक येथील आमदार, जाट नेते चौधरी चांद राम यांनी पहिल्यांदा हरयाणाचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.

माजी मुख्यमंत्री भजल लाल यांचे सुपुत्र चंदर मोहन यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली २००५ ते २००८ मध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषविले. तर २०१९ पासून भाजपाच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्रीपदावर आहेत.

पंजाब : शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल हे त्यांचे वडील प्रकाश सिंह बादल मुख्यमंत्री असताना २००९ ते २०१७ या काळात उपमुख्यमंत्रीपदावर होते. काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या सहा महिन्यांच्या सरकारमध्ये सुखजिंदर सिंह रंधवा आणि ओमप्रकाश सोनी उपमुख्यमंत्रीपदावर होते. .

महाराष्ट्र : १९७८ साली मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. फक्त पाच महिने ते या पदावर होते. त्यांच्यानंतर १८ जुलै १९७८ मध्ये सत्ताबदल झाला. मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्या वेळी सुंदरराव सोळंके यांची उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली. त्यानंतर १९८३-८५ या काळात रामराव आदिक, १९९५-९९ या काळात गोपीनाथ मुंडे, १९९९-२००३ पर्यंत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये छगन भुजबळ यांनी हे पद भूषविले. २००३-०४ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील, २००४-२००८ पर्यंत आर. आर. पाटील आणि २००८ ते २०१० मध्ये पुन्हा छगन भुजबळ या पदावर होते.

२०१० पासून चार वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मागच्या वर्षी जून २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत.

उपपंतप्रधान

भारतात आजवर अनेक उपपंतप्रधानही झालेले आहेत. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे पद पहिल्यांदा भूषविले होते. नेहरू आणि पटेल हे त्या वेळच्या काँग्रेसमधील दोन मोठे नेते होते. तसेच काँग्रेस पक्षात दोघांच्याही विचारधारांमध्येही फरक होता. मोरारजी देसाई, चरण सिंह, चौधरी देवी लाल, यशवंतराव चव्हाण आणि लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील हे पद भूषविले आहे.