डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी (दि. २० मे) कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा घोळ निस्तरण्यासाठी काँग्रेसने अखेर शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी मनधरणी केली. तत्पुर्वी मुख्यमंत्रीपद नाही मिळाले तर काहीच नको, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. मागच्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही काहीसा असाच पवित्रा घेतला होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर मी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून निरीक्षण करणार असे ते म्हणाले. मात्र भाजपा पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे मान्य केले. उपमुख्यमंत्रीपद हे आघाडी-युतीच्या सरकारांमध्ये तडजोड म्हणून दिले जाते, असे आतापर्यंत राजकारणात दिसून आले आहे किंवा एखाद्या पक्षाला एकाच नेत्याच्या हातात सर्वाधिकार येऊ द्यायचे नसतील तर तो पक्ष मुख्यमंत्र्यांसोबत दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देऊन त्याच्यासमोर पर्याय उभा करतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा